माझे विचार…

विचारांना शब्दांत बांधायचा प्रयत्न !

ब्रेक

Tags:

सॅच्युरेशन…
इंटरनेट, ब्लॉग्स, टेम्प्लेट्स,कमेंट्स, नवीन ब्लॉगपोस्टचा विषय…

अजीर्ण झालंय अगदी.
हल्ली काही म्हणजे काहीच सुचत नाही लिहायला.
अगदी “काहीही” सुद्धा नाही!
जवळजवळ रोजच हे पान उघडून बसतीय.
पण एक शब्द देखील उमटत नाहीये.
विचित्रच फेज म्हणायची ही.

अचानक असे वाटू लागलेय, डोक्यात येणारा प्रत्येकच विचार हा कागदावर लिहीण्याची गरज नसते.
किंवा प्रत्येक गोष्ट, आवडती लिंक, व्हीडीओज शेअर करत बसल्याने काय वेगळं होणार? इंटरनेटच्या जगात आज नाहीतर उद्या ती कोणालातरी आवडलेली गोष्ट पसरतेच वार्‍यासारखी. मग आपण त्या वाहत्या गंगेत हात धुतल्याने काय (चांगला) फरक पडतो?
आवडती पुस्तके,चित्रपट, सिक्रेट रेसिप्या,दैनंदिन जीवनात येणारे अनुभव लिहीणारे कितीतरी आणि चांगले ब्लॉग आहेत.

मग मी लिहून काय वेगळं होतंय.
आणि यापेक्षा वेगळं मला काय येतं?
त्यामुळे नकोच ते.
ब्रेक घेते आता.
जाऊदे.

कदाचित पुढच्याच आठवड्यात लिहीन किंवा नाहीच लिहीणार.
तात्पुरता टाटा सर्वांना.

Popularity: 22% [?]

तो पाऊस.. हा पाऊस..

Tags:

फार सुंदर, अप्रतिम, संततधार, मुसळधार, धोधो वगैरे पाऊस पडतोय.
रवीवारपासून शुक्रवार पर्यंत.
रस्त्यावर तळी साचली आहेत..
जस्ट पुण्यातून परतल्यामुळे मला होमसिक वाटू नये म्हणूनच की काय असा पाऊस पडतोय.

मी .. खिडकीपाशी बसून .. ते सर्व पाहतीय.. गेले ३ दिवस.. आणि पाहीन पुढील ३ दिवस..

पाऊस.. !

का मला वेड लागतं पाऊस पाहून काही कळत नाही!
माझ्या जीटॉकवर असणार्‍यांनी नक्कीच जानेवारीच्या सुमारास its raining! हे स्टेटस पाहीले असेल ! :))
आता त्यात काय नाचायचे? पण होतो आनंद..

लहानपणी पाऊस पडला की आम्ही चौघं सगळे गाडीतून भटकायला निघायचो. घरून पापड्स, चिप्स वगैरे घेऊन मस्त गाणी ऐकत, पाषाण बिषाण या तेव्हाच्या लांब जागांना भटकून यायचो!
वाटेत भजी,समोसा, पिझ्झा बिझ्झाही खायचो ! बाबांना खरंतर पाऊस आवडत नाही. आई अन मी अत्यंत पाऊस वेड्या. दादाचे काय मत होते कोणास ठाऊक? पण त्याला भटकायला आवडत असेल कदाचित. बाबा मग, आम्हा सर्वांसाठी काढायचे गाडी. नाहीतर त्यांचा प्रेफरंस नक्कीच पांघरूण घेऊन झोपण्याला व नंतर उठून चहा भुरकण्याला असला असता..

पावसाळ्यात शाळेतून घरी येताना बर्‍याचदा धोधो पाऊस लागायचाच. त्यात मी, मानसी व विशाखा सायकलवरून निघायचो. माझा व मानसीचा रेनकोट अगदी स्सेम ! खरंतर कोणाएकीकडेच असता तर तो फार युनिक पीस झाला असता! पण असो. आम्हा दोघींकडे सारखाच “युनिक”(?) पीस होता!! (माझ्यामते) पीस्ता व (मानसीच्यामते) नीळा असलेला तो जाडसर व थोडा ट्रान्स्परंट रेनकोट अम्हाला फार आवडायचा! त्यामुळे साहजिकच पावसाची वाटच बघायचो आम्ही! आणि नंतर दोघींनी सेम रेनकोट घातलाय, किती मंद दिसत असू , म्हणून खिदळत जाणे तर नेहेमीचेच. पाऊस म्हटला की नळस्टॉपचा रस्ता, संध्याकाळची गर्दीची वेळ, तरीही गर्दीतसुद्धा जसं काही रस्त्यावर आम्हीच फक्त आहोत अशा आविर्भावात सायकल हाकणार्‍या आम्ही , मैत्रिणींनी(?????) माझे ओले कुरळे केस पाहून म्हटलेले “ओ हसीना जुल्फोवाली” गाणे?!?!,  ते वेड्यासारखे खिदळणे, पावसाळ्यातल्या सायकलीचे ब्रेक्स कामातून गेले असतानाच्या सायकल-रेसेस… huh.. काय काय नाही आठवत ? कसं पावसाला पाहून, हे आठवून वेड लागणं शक्य नाहीये?

७-८वीत असताना, एकदा असाच मुसळधार पाऊस आला होता. सावनी मला भिजायला बोलवायला आली होती. मी गेले. ती मी व दिप्ती. कॉलनीतून उन्हात फिरत असल्यासारख्या धोधो पावसात चालत गप्पा मारत फिरलो होतो. व नंतर सावनीच्या घरच्या गच्चीवर जाऊन पाय बुडतील एवढ्या पाण्यात मांडी घालून मी त्यांना मृत्युंजय कादंबरी व कर्णाची झालेली उपेक्षा यावर अनेक तास लेक्चर दिले होते.. !

११-१२वी मध्ये असताना, पहिल्या पावसाला, आख्खा क्लास, शिक्षकांसकट, ग्राउंडवर जमून पावसात भिजला होता ! पावसातच बास्केटबॉल अन काय काय गेम्स खेळलो होतो.. शिवाय अजुन मजा.. घर आणि कॉलेजमध्ये केवळ ४ बिल्डींग्सचे अंतर असल्याने मी नेहेमी आरामात भिजतच घरी यायचे. कॉलेजम्धल्या १-२ ओळखीच्या मुलांनी माझे घर माहीत नसल्याने चक्क तेवढ्याश्या अंतरावर लिफ्ट हवीय का विचारल्यावर मी केवळ खदाखदा हसून त्यांना समोरचे माझे घर, माझे आई बाबा सुद्धा दाखवल्याचे आठवतेय!! :))

थोडं मोठं झाल्यावर, इंजिनिअरिंगचा पाऊस वेगळाच होता. मैत्रिणींबरोबर कुठेतरी हॉटेल मध्ये बसून चहा पीत गप्पा मारणे हेच मुख्य आमचे काम. पावसाच्या बॅकग्राऊंडवर गप्पा अगदी खुलतात! वर्तमानकाळात न जगायचा तो काळ ! कायम भविष्याची चिंता व स्वप्ने.. कदाचित स्वप्नेच जास्त..!
मी व  स्वीटी, माझ्या स्कुटीवरून रेनकोट न घालता चिंब भिजत जाणे हा दुसरा उद्द्योग ! नंतर मी परत तशी कधी भिजले की नाही, पडणार्‍या त्या पावसाच्या पाण्याला कधी इतकी मनापासून भेटले की नाही कोणास ठाऊक ! कॉलेजचे दिवस म्हणूनच सतत आठवतात.. इंस्टिंक्ट्सवर डिंपेंड होऊन सर्वात वेडगळासारख्या गोष्टी आपण तेव्हा करतो, ज्या नंतर आपण प्रॅक्टिकल वागण्यात मिस करत बसतो..

आणि आता हा.. कॅलिफोर्नियातला पाऊस. कधी मधी उगवणारा. दुष्काळी कॅलिफोर्नियाला दिलासा देणारा. वाळलेले गवत, झाडं लखलखीत पुसून हिरवी करणारा.. त्याचबरोबर आपली मनं देखील हिरवीगार करणारा.. पूर्वीसारखे भिजायचा प्रयत्न करायला गेलो तर अतिशय थंडगार पाणी येणार चेहेर्‍यावर..!

त्यामुळे बरेचदा घरातल्या खिडकीतूनच पाहायचा हा पाऊस..

पण म्हणून काय झाले?
पाऊस तो पाऊसच !
वेड लावणारच तो !!

:)

Popularity: 39% [?]

टॅग – टॅग ..

TAGS: None

नमस्कार वाचकहो..

सद्ध्या भारतवारीवर असल्यामुळे ब्लॉगिंग अगदी बंदच आहे. तिथे अमेरिकेत केव्हढाल्ला रिकामा वेळ असतो आणि  इथे कसा वेळ जातो हेच कळत नाही!  :)

असो..

आता भारत वारी संपतही आली त्यामुळे जिवश्च-कंठश्च मैत्रिणीची आठवण यावी तशी ब्लॉगची आठवण आली ! पेंडिंग कमेंट्स पाहताना लक्षात आले की , मंदार आणि अनिकेत* या दोघा ब्लॉगर्सनी मला एका प्रश्नावलीसाठी टॅग केलं आहे त्यामुळे ते कळल्याबरोबर व वेळ मिळाल्याबरोबर लगेचच ब्लॉग उघडला..

* एक छोटी मिस्टेकची दुरूस्ती .. मंदार आणि विरेंद्र या दोघांनि टॅग केले होते. कमेंट्स पाहून लेख लिहायला घेईपर्यंत नावांचा गोंधळ केला.. :(

८-१० दिवसांत नियमित ब्लॉगिंग सुरू होईलच असे दिसते आहे.. :)
तेव्हा भेटू परत..

तोवर ही माझी उत्तरं ! Read the rest of this entry »

Popularity: 31% [?]

अमेरिका पूर्वरंग – व्हाईट हाऊस !

Tags: ,

माझ्या परवा लक्षात आले, मी  डीसी मध्येच अडकून पडलीय की! अज्जुन  पुढे किती पल्ला गाठायचा आहे .. बापरे..  डीसी नंतर , निनादची युनिव्हर्सिटी, न्युयॉर्क, नायगरा इतके सगळे पाहीले. सगळ्यावरच लिहीन असे नाही , पण पुढे सरकले पाहीजे आता. मलाही बोर व्हायला लागले आता इतके निवांतपणे लिहीणे.. :)

ओके.. So, मॉन्युमेंट झाल्यावर आमच्यात त्राण नव्हते. दिवस संध्याकाळकडे कलू लागला तसे आम्ही निघालो. आता व्हाईट हाऊस पाहून पटकन मेट्रो पकडायची असे ठरवले. जवळच आहे असे वाटणारे व्हाईट हाऊस चांगलंच लांब होते. कसे तरी लंगडत, थांबत थांबत गेलो एकदाचे तिकडे ! खरं म्हणजे मी आपले दिल्लीतले राष्ट्रपती भवन सुद्धा पाहीले नाहीये त्यामुळे व्हाईट हाऊस म्हटल्यावर मी कंटाळा टाकून परत फ्रेश झाले. चुकून माकून ओबामा दिसलाच तर बरंय ना? ;) Read the rest of this entry »

Popularity: 52% [?]

अमेरिका पूर्वरंग – वॉशिंग्टन मॉन्युमेंट

Tags: , , ,

[खूप दिवसांनी वळले परत प्रवासवर्णनांकडे . ]

अमेरिकेच्या पहिल्या President – अमेरिकेच्या राष्ट्रपित्याची आठवण म्हणून बांधलेले हे वॉशिंग्टन मॉन्युमेंट. तसे ते कुठूनही दिसतच होते आम्हाला. मात्र त्याच्या जवळ गेल्यावर, त्याच्या पायथ्याशी उभे राहील्यावर त्याची भव्यता कळली. पॅरिसचा आयफेल टॉवर होण्याआधी हेच मॉन्युमेन्ट जगातील सर्वात उंच स्ट्रक्चर असे बिरूद मिरवत होते. परंतू आयफेल टॉवर नंतर ते गेले. शिवाय वॉशिंग्टन डीसी मधील ही सर्वांत उंच इमारत.. नको.. स्ट्रक्चरच म्हणूया आपण. या स्ट्रकचरमागे किती इतिहास आहे पाहा : Read the rest of this entry »

Popularity: 58% [?]

Szła dzieweczka आणि बरेच काही !? ..

Tags: ,

युट्युबवर फिरताना ही मजा सापडली!

आधी हा व्हीडीओ पाहा..

ओळखली चाल? :) Read the rest of this entry »

Popularity: 100% [?]

आपण मराठी लोकं Blogs/कमेंट्स/ इत्यादींमधे कंजुषी का करतो?

TAGS: None

हे शीर्षक थोडं अतीच लांब झाले आहे खरं, पण पर्याय नव्हता. नुसतेच “मराठी लोकं कंजुष का” चूक झाले असते [ म्हणजे पोस्टच्या संदर्भात म्हणतीय मी.. , एरवीचे.. जाऊदे!] “मराठी लोकं ब्लॉगिंगमधे कंजुषी का करतात?” हे तर साफ चुकले असते,मराठीब्लॉग्सला जोडलेल्या ब्लॉग्सची संख्या पाहून! म्हणून असे शीर्षक!

आज एकदम हा का विषय बुवा? ..तुम्हा वाचकांना माझ्या एकंदरीत Blogging Activity वरून एक समजले असेल. मी हल्ली खूप लिहीते. कधीकधी भंगारही लिहीते. कधी विषय असे धुमकेतूसारखे उगवतात, कधी मी एकदम Technical होते. आणि कायमच Blog Templates/ Themes आणि Widgets च्या शोधात असते. थोडक्यात मी या ब्लॉग्स प्रकरणात पूर्णपणे बुडून गेले आहे. Read the rest of this entry »

Popularity: 88% [?]

SSKचे दिवस ! :D

Tags: , , , ,

ssk परवा मिथूशी फोनवर बोलताना अपरिहार्यपणे विषय ११वी – १२वी पाशी आला. मग कलमाडी  ज्युनियर कॉलेज, आ्मचा ग्रुप असा फिरत  फिरत  अपरिहार्यपणेच SSK पाशी आला…
SSK ? काय आहे हे SSK??  तर , ते आहेत आमच्या सरांचे नावाचे इनिशिअल्स. S.S.Kulkarni ! Sunil S. Kulkarni !

इंजिनिअरींगला ऍडमिशन घेतली. सगळी नव्याची नवलाई संपली आणि थोड्याच दिवसात काहीतरी भयंकर नावं कानावर पडू लागली! M1, Graphics, App-mech इत्यादी. या सर्व विषयांना क्लास मस्ट आहेत असे हुषार मैत्रिणींकडून समजले. काही तर चक्क जाऊ सुद्धा लागल्या होत्या! आम्ही (म्हणजे मी, मिथू वगैरे) , इंजिनिअरिंगला तेही आवडत्या Computer Engineering ला ऍडमिशन मिळाल्याच्या आनंदात आणि एव्हरेस्ट सर केल्याच्या आविर्भावात बसलो होतो. परंतू सुवीने ऑल्रेडी क्लासेस सुरू केलेत म्हटल्यावर आम्हाला पण टेन्शनच आले. व चौकशा करून आम्हीही पैसे घेऊन गेलो SSK सरांच्या क्लास मधे ! ( आधी वगैरे पैसे भरल्याचे मला आठवत नाहीये , डायरेक्ट पहील्या दिवशी पैसे घेऊन गेलो.. :) ) Read the rest of this entry »

Popularity: 90% [?]

वर्डप्रेसवर देखील गुगल फ्रेंड कनेक्ट!

Tags: , , , ,

वा.. हे छान झाले!

Google Official Webmaster Blog वाचत असताना कळले की आता कुठल्याही साईटवर तुम्ही गुगल फ्रेंड कनेक्ट टाकू शकता!मी लगेच ते टाकून पाहीले. २ मिनिटांचे काम होते फक्त!  पूर्वी फक्त ब्लॉगस्पॉटवरच टाकता येत होते. आता ते वर्डप्रेसवर टाकता आले.

गुगलच्या ऑफीशिअल ब्लॉगवर दिली आहे माहीती . तरी थोडक्यात इथे टाकते.

You will have to visit :  http://www.google.com/friendconnect and provide your information. It will generate an HTML code. You will have to add that code as a widget. I guess you can add HTML code in Text area. and that’s it! Smile

I hope it works for wordpress.com too..
Update : It does not work for wordpress.com blogs. :(

पूर्वी ब्लॉगरवर एकेकाळी ३९ फॉलोअर्स होते.. त्या सगळ्यांना गोळा केले पाहीजे इथे! :)
इथेच उजवीकडे आहे ते विजेट..  लोकहो, व्हा आता जॉईन त्याला! :)

-भाग्यश्री.

Popularity: 71% [?]

8 Movies I liked the Most

Tags: , , , , , , , , ,

आज मी माझे काही आवडते चित्रपट इथे नोंदवत आहे.. तशी लिस्ट खूप मोठी आहे. पण सद्ध्या इतकेच.

अगदी डिटेलवार Review लिहायला कधी वेळच नाही मिळाला आणि बेसिकली हे बरेचसे फेमस आहेत ! सो रिव्ह्यु लिहीण्यात काय पॉईंट ?

My Cousin Vinny :

आपल्या “कायद्याचे बोला” या मुव्हीचा ओरिजिनल ! अतिश्शय भारी आहे! माझ्या नवर्‍याला तर ह्याचे डायलॉग्स, त्या विनीच्या ऍक्सेंटसकट पाठ आहेत! माझेही होतील आता. इतक्या वेळेला लागतो टीव्हीवर, व आम्ही नेहेमी नेहेमी पाहतोच !! ( Rating : 5/5 )

Read the rest of this entry »

Popularity: 81% [?]

Get Adobe Flash playerPlugin by wpburn.com wordpress themes

© 2009 माझे विचार…. All Rights Reserved.

This blog is powered by Wordpress and Magatheme by Bryan Helmig.