You are here: Home > East Coast, Travel, things I love.. > अमेरिका पूर्वरंग – वॉशिंग्टन मॉन्युमेंट

अमेरिका पूर्वरंग – वॉशिंग्टन मॉन्युमेंट

[खूप दिवसांनी वळले परत प्रवासवर्णनांकडे . ]

अमेरिकेच्या पहिल्या President – अमेरिकेच्या राष्ट्रपित्याची आठवण म्हणून बांधलेले हे वॉशिंग्टन मॉन्युमेंट. तसे ते कुठूनही दिसतच होते आम्हाला. मात्र त्याच्या जवळ गेल्यावर, त्याच्या पायथ्याशी उभे राहील्यावर त्याची भव्यता कळली. पॅरिसचा आयफेल टॉवर होण्याआधी हेच मॉन्युमेन्ट जगातील सर्वात उंच स्ट्रक्चर असे बिरूद मिरवत होते. परंतू आयफेल टॉवर नंतर ते गेले. शिवाय वॉशिंग्टन डीसी मधील ही सर्वांत उंच इमारत.. नको.. स्ट्रक्चरच म्हणूया आपण. या स्ट्रकचरमागे किती इतिहास आहे पाहा :

  • मूळात या बांधकामाच्या प्रकाराला Obelisk म्हणतात, जे इजिप्त (Luxor temple , Heliopolis(city of sun) – Cairo) , रोम , USA ( Central Park – New York , Washington Monument – Washington DC) ,  इथिओपिया,अर्जेंटीना अशा बर्‍याच ठिकाणी आढळते.
  • ओबेलिस्कचे बांधकाम म्हणजे एक सरळसोट उंच चौकोनी खांब, व वर छोटा, उंच पिरॅमिड. बर्‍याचदा म्हणजे पूर्वीच्या काळी obelisk हे monolith असायचे. मोनो(एक), लिथ(दगड). थोडक्यात एकाच दगडातून उभा राहीलेला चौकोनी उंच खांब. त्यावर पूर्वीच्या काळी असायचा सोन्याचा पिरॅमिड. [ सोने या धातूला इजिप्शिअयन लोकं 'flesh of god' समजत.] अर्थातच आता तसे नाही. वर सोन्याचा पिरॅमिडही नसतो तसेच एकाच दगडातूनही ते बांधकाम होत नाही. वेगवेगळ्या दगडांनी , संगमरवरांनी बनवलेला असतो. [ वॉशिंग्टन मॉन्युमेंट हे असे आहे. दगड + संगमरवर ]
  • इजिप्शियन एन्शन्ट भाषेमध्ये याला शब्द आहे TEJEN. ज्याचा अर्थ : Protection or Defense. काही संकट येणार असेल तर  ते या obelisk मुळे, त्याच्यावरच्या उंच तोकदार नीडलमुळे दूर होते अशी  त्यांची धारणा.
  • इजिप्शियन देव Ra [rah]  - Sun God, याच्या देवळात मोकळ्या भागात कायम हे उभारले जातात, संरक्षणार्थ. [ रा या देवाच्या नावाबद्दल बरेच संभ्रम आहेत. त्याला ’रे’ असे सुद्धा संबोधले जाते
  • जसे ख्रिश्चन लोकांमध्ये थडगी असतात, तसेच हे Obelisk.  इजिप्शियन संस्कृतीत आणि इजिप्शियन भूमीवर असे बरेच ओबेलिस्क्स उभे आहेत. त्या राजांची आठवण म्हणून बांधलेले. [ Ramses, Hatshepsut इत्यादी ]
  • त्यामुळेच obelisk च्या पाठोपाठ येतो इजिप्शियन देव Osiris. God of death, afterlife. असेही काही समज आहेत, की obelisk वरच्या टोकावर असणारा पिरॅमिड ( जो बर्‍याचदा enlightenmentशी संबंधित असतो ) हा सूर्याची किरणं या ओबेलिस्कवर पोहोचवेल. व सूर्यदेवाच्या किरणात इतकी शक्ती आहे की त्यामुळे obelisk मधील आत्मा पुनर्जन्म घेऊ शकेल. [ Resurrection ]
  • या सगळ्यात थोडेसे वेगळे पण डीसीशी संबंधित असल्याने लिहीलेच पाहीजे. ज्याच्या स्मरणार्थ हे मॉन्युमेंट बांधले – वॉशिंग्टन- तो फ्रिमेझन होता. मेझनरी माहीत नसणार्‍यांनी either गुगल करावे किंवा Dan Brown’s  ’The lost Symbol’ वाचावे. थोडक्यात सांगायचे तर ख्रिश्चन धर्माला (निदान पूर्वीतरी) सायन्सचा प्रचंड राग होता. [ आठवा : गॅलेलिओने प्रसृत केलेली सूर्याच्या भोवती पृथ्वी फिरते ही थिअरी न पटल्यामुळे, व बायबल/ख्रिष्चनिटीच्या विरोधात असल्याने गॅलेलिओला झालेला त्रास. अशी उदाहरणे बरीच असतील. ] यासर्वांमुळे एक सिक्रेट सोसायटी स्थापन झाली ज्यात खूप नामवंत शास्त्रज्ञ, कलावंत, राजकारणी होते. उदा: न्यूटन, गॅलेलिओ, वॉशिंग्टन, रुझवेल्ट, हेन्री फोर्ड, नेपोलिअन बोनापार्ट, आपल्याकडचे स्वामी विवेकानंद, डॉ. राजेंद्रप्रसाद, डॉ. राधाक्रिष्णन, मोतीलाल नेहेरू, परिक्षित साहानी..  … संपणार नाही ही लिस्ट ! आख्ख्या वॉशिंग्टन डीसी मध्ये मेझनिक सिम्बॉल्स आहेत असं म्हणतात. ओह बायदवे, ओम, स्वस्तिक हे मेझनिक सिम्बॉल्स आहेत म्हणे! :)  [ प्रचंड इंटरेस्टींग आहे ते सर्व. पण लिहीत बसले तर सगळा ब्लॉग भरून जाईल. ]

असो.  विषय भरकटायला लागला!

तर.. अशा वेग्वेगळ्या इतिहासाने भरून गेलेल्या ठिकाणी आम्ही होतो. मला हे सगळे अंधुक तुकडे तिकडे आठवत होते. त्या भल्या मोठ्या  555 ft 5⅛ inches इतक्या उंचीच्या मॉन्युमेंटवर नेमकं आम्हाला जाता नाही आले. त्यासाठी भल्या पहाटे वगैरे जावे लागत असावे. आम्हाला तितका वेळही नव्हता. पण तिथेच टेकलो जरा वेळ. मॉन्युमेंट तर संगमरवरात आहेच, पण तेथील व्हीजिटर्स लोकांना बसायचे बाक देखील संगमरवरात आहेत. त्या गार गार मार्बलवर बसून वरचा तो मॉन्युमेंट, समोर दिसणारे कॅपिटॉल हिल बिल्डींग, पाठीमागचे लिंकन मेमोरियल तर डावीकडे झुडुपात लपलेले व्हाईट हाऊस असा दूरवर पसरलेला तो परिसर पाहायला खूप मजा आली !! गंमत म्हणजे कॅपिटॉल हिल, मॉन्युमेंट्स ( लिंकन, वॉशिंग्टन) यांना दिलेल्या परिसराचे क्षेत्रफळ पाहता व्हाईट हाऊस अगदीच छोटूसे आहे ! :) निदान झुडुपात लपल्यामुळे तरी तसेच वाटते!

थोड्यावेळ फोटोसेशन केले व आम्ही निघालो व्हाईट हाऊसकडे. ते सर्व पुढच्या भागात !

काही फोटोज :

monu1

monu2

monu4

monu3

Popularity: 58% [?]

Tags: america, East Coast, monument, washington

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • Twitter
  • RSS
  • bhag41

    adhun madhun vishranti pan ghe g tanvi. khup firaychay ajun ! :D

  • छान वर्णन केलेस....फोटो पण मस्त आहेत....आम्ही पण फिरतोय तुझ्याबरोबर
  • bhag41

    thanks bhagyashree !


    nakki jaun ye tya monument chya top var.. ani photos share kar! :)

  • भाग्यश्री, आता पुन्हा नचिकेतच्या मागे टुमणे लावतेच वॊशिंग्टनला जाण्याचे. फोटोज सही आलेत. बरे झाले सांगितलेस भल्या पहाटे जावे लागते नाहीतर हमखास चुकलेच असते. वाचतेय गं.
  • bhag41

    ho, ya lekhat mahiti ch dyaychi hoti. karan ya monument chi, bandhakamachi history khup ahe, ti mahiti ithe lihavi'ch' asa vatla. shivay to khaamb nusta baghnyashivay amhi kahi kela nahi, varnan kashache karnar na? :D

  • फोटोग्राफ्स सुंदर आहेत. पण लेख मात्र माहिती पत्रकाप्रमाणे वाटतोय.. पहिल्या वेळेस तर नुसता वर वर पाहुन निघुन गेलो होतो, पण आज मात्र पुर्ण लेख वाचला..
blog comments powered by Disqus
Get Adobe Flash playerPlugin by wpburn.com wordpress themes
WordPress SEO fine-tune by Meta SEO Pack from Poradnik Webmastera