काल लायब्ररी मधे ‘मी चार्ली चॅपलीन’ हे पुस्तक मिळाले.. मूळ लेखक अर्थातच चार्ली चॅपलीन आहे, परंतू अनुवादकाचे नाव काही कळले नाही.. (पान फाटले होते!)
२ दिवसांत सगळे पुस्तक वाचून काढले.. खूप दिवसांनी असं दिवस-रात्र वगैरे जागून पुस्तक वाचले.मुळातच मला आत्मचरित्रे वाचायला आवडतात..बर्याचदा ती भंपक ही असतात म्हणा! पण चॅपलीनबद्दल वाचायची उत्सुकता होती.. सगळ्या जगाला हसवणार्या या कलाकराबद्दल खूप काही माहिती नव्हती मला.. फ़क्त त्याचा रंगभूमीवरचा तो (करूण) प्रवेश माहीत होता. म्हणून वाचायला लागले आणि आवडलं पुस्तक.. खूपच छान पुस्तक आहे..
सुरवातीचे चॅपलीनचे गरीबीतले दिवस वाचून काटाच आला.. गरीबी त्यातून आईला अधूनमधून येणारे वेडाचे झटके.. खरं तर ते वेडाचे झटके नसावेत.. ती एका ठिकाणी म्हणतेही.. “तू मला एक कप चहा पाजू शकला असतास तर मी इथे नसते आले!”
इतक्या गरीबीची नुसती कल्पना करणेच अवघड आहे! पण तीला नंतर वेड्याच्या इस्पितळात दाखल करावेच लागते.. दुसरीकडे चार्ली आणि त्याचा भाऊ सिडने यांचा नोकरी मिळवण्यासाठीचा, थोडेफार पैसे मिळवण्याचा संघर्ष दाखवलाय.. चार्ली चॅपलीन चा तो प्रसिद्ध ‘ट्रॅंप’ कसा जन्माला आला, याची कहाणी आहे.. हळुहळु चॅपलीन प्रसिद्ध आणि श्रीमंत होत गेला.. यात त्याच्याकाही महत्वाच्या चित्रपटांची जन्मकथा आहे. त्याला घेतलेले त्यानी कष्ट आहेत.. संघर्ष आहे.. थोडंफार चित्रपट तयार करण्याच्या तंत्राबद्दल देखील माहीती आहे..
पण सगळ्यात उत्कंठेचा भाग आहे तो म्हणजे, जेव्हा बोलपटांचे आगमन झाले आणि दुसर्या महायुद्धाच्या काळानंतरचे.. ज्या कलाकारानी सगळ्या जगाला हसवत ठेवले (आणि हसवता हसवता रडवले देखील) त्या कलाकाराशी अमेरीका नंतर फारच वाईट वागली.. त्याला कम्युनीस्ट ठरवले गेले, बरेच खटले झाले.. आणि सरतेशेवटी अमेरीकेतून हकालपट्टी करण्यात आली! मग तो स्वित्झर्लंड इथे स्थायिक झाला…
२ दिवसांत सगळे पुस्तक वाचून काढले.. खूप दिवसांनी असं दिवस-रात्र वगैरे जागून पुस्तक वाचले.मुळातच मला आत्मचरित्रे वाचायला आवडतात..बर्याचदा ती भंपक ही असतात म्हणा! पण चॅपलीनबद्दल वाचायची उत्सुकता होती.. सगळ्या जगाला हसवणार्या या कलाकराबद्दल खूप काही माहिती नव्हती मला.. फ़क्त त्याचा रंगभूमीवरचा तो (करूण) प्रवेश माहीत होता. म्हणून वाचायला लागले आणि आवडलं पुस्तक.. खूपच छान पुस्तक आहे..
सुरवातीचे चॅपलीनचे गरीबीतले दिवस वाचून काटाच आला.. गरीबी त्यातून आईला अधूनमधून येणारे वेडाचे झटके.. खरं तर ते वेडाचे झटके नसावेत.. ती एका ठिकाणी म्हणतेही.. “तू मला एक कप चहा पाजू शकला असतास तर मी इथे नसते आले!”
पण सगळ्यात उत्कंठेचा भाग आहे तो म्हणजे, जेव्हा बोलपटांचे आगमन झाले आणि दुसर्या महायुद्धाच्या काळानंतरचे.. ज्या कलाकारानी सगळ्या जगाला हसवत ठेवले (आणि हसवता हसवता रडवले देखील) त्या कलाकाराशी अमेरीका नंतर फारच वाईट वागली.. त्याला कम्युनीस्ट ठरवले गेले, बरेच खटले झाले.. आणि सरतेशेवटी अमेरीकेतून हकालपट्टी करण्यात आली! मग तो स्वित्झर्लंड इथे स्थायिक झाला…
या पुस्तकातून चॅपलीनचे इतके पैलू दिसतात! त्याची कॉमेडी थोडी करूणच होती.. मुळात त्याची मनोवृत्ती जरा करूण अशीच असावी.. कुठलीही सुंदर कलाकृती पाहीली किंवा आनंद झाला की चॅपलीनचे डोळे पाण्याने भरून जायचे.. या पुस्तकातले त्याची काही स्वगतं, किंवा महायुद्धाच्या काळात त्याने केलेली भाषणे, ‘द ग्रेट डिक्टेटर’ मधील त्याचे भाषण अतिशय सुंदर आहेत! या पुस्तकात, त्याचे, त्याच्या कुटुंबाचे, चित्रपटसृष्टीतील लोकांचे खूप सुंदर फोटोज आहेत..नाहीतर चार्ली चॅपलीन ला कायम त्या ट्रॅंपच्या भुमिकेतच पाहायची सवय आपल्याला!
हे पुस्तक वाचल्यावर चार्ली चॅपलीन किती थोर होता हे कळतं आपल्याला.. केवळ तो ईंग्लीश होता आणि त्याने कधीच अमेरीकेचे नागरीकत्व स्विकारले नाही म्हणून आणि अशाच कारणांमूळे अमेरीका सोडायला लागली तरी त्याने कधी कटूता नाही ठेवली मनात.. तो स्वतः थोर होताच, परंतू अनेक थोर लोकांना तो प्रत्यक्ष भेटला.. आईनस्टाईन, म. गांधी, नेहरू, रुझवेल्ट, हुवर,पिकासो आणि अशीच अनेक व्यक्तीमत्वं!
एकंदरीत पुस्तक खूपच छान झालंय.. ओघवतं झालंय.. कुठेही रटाळ नाही आहे.. पुस्तक जरूर वाचण्यासारखे आहे, परंतू अनुवादकाचे नावच न कळल्यामुळे नक्की तपशील नाही सांगता येत आहे.. पण मिळालंच तर जरूर वाचा!
Popularity: 5% [?]