You are here: Home > Random, Timepass > डबा ऐसपैस !!

डबा ऐसपैस !!

आज एक मजाच सापडली!!!

पद्मगंधा प्रकाशनाचा दिवाळी अंक वाचत होते आज.. द.दि. पुंडे नामक लेखकाचा “डबा ऐसपैस, शब्द ऐसपैस” हा लेख वाचला.. आणि मी उडालेच !

त्यात असा उल्लेख होता की बालभारतीच्या द्न्यानदा नाईक लंडनला गेल्या असताना त्यांना तिथे काही मुलं चक्क डबा ऐसपैस खेळताना आढळली! त्यांच्या लंडनस्थायिक मैत्रिणीशी बोलल्यावर त्यांना कळलं की ती मुलं , “द बॉय ,आय स्पाय यु” हा गेम खेळत होते.. तोच बहुधा आपल्याकडे डबा ऐसपैस म्हणून आला.. !

हा उल्लेख वाचून मी उडाले खरं.. पण असा खरंच गेम आहे का, याची मला उत्सुकता शांत बसू देईना.. थोडं गुगललं तेव्हा हे मिळाले.. I Spy..

म्हणजे असं असण्याची शक्यता नाकारता येत नाही! :)

चला बर्‍याच दिवसांचे कोडे सुटले.. नाहीतरी या खेळात ऐसपैसचा काय संबंध हे मला कळतंच नव्हते!! :)

( अजुन किती अपभ्रंश आहेत हे शोधायचा चाळा लागलाय.. नॉठॅठोम, टैम्प्लीज वगैरे आठवले.. बघु अजुन काय निघतंय! ) :) )

Signature2

Popularity: 9% [?]

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • Twitter
  • RSS
  • Mugdha
    aga amhi yala Dabba express mhanaycho !!!! he he :)
  • Mahendra
    अरे काय मस्त लिहिलंय हो.. नेहेमी का लिहित नाही? जरा रेग्युलरली अपडॆट करित जा..
  • kayvatelte
    Khupach chan lihilay. pudhil likhanasathi shubhecha.
  • Monsieur K
    gammat aahe!
    i miss playing it tho'! :(
  • Raj
    interesting.. kashache muL kashat asel sangata yet nahi :)
  • Vivek Patwardhan
    Interesting really. As a child we too played this game [Dabba, aispais] and never stopped to think why it is called so. Enjoyed.

    Looking forward to interesting posts like this one,
    Vivek
  • सखी
    ' टैम्प्लीज' या शब्दाचा अर्थ अक्षरश: दहावी पर्यंत ठाउक नव्हता, कळल्यावर कुठे जाउन तोंड लपवू असं झालं होतं :D
  • Prakash Ghatpande
    अपभ्रंश तुन व्युत्पत्तीकडे प्रवास आवडला. आमचे कडे पण असेच काही अपभ्रंश
    सिलींडर रजा- surrender leave
    शिरोमणी परेड- ceremonial parade
  • me
    sahi yaar! ekdam awadle, mla lahan astana nawawarun ha khel kadhi khelawasa watala nahi, karan tyachya nawalach kahi arth navata :) thanks for the meaning :)
  • Bhagyashree
    hehe mast re! geet+taar..
    ase barech shabd astil.. :)
  • Yawning Dog
    सहीच शोध लागला :) डब्बा ऐसपैस मधे ऐसपैसचा काय संबंध याचा विचारपण केला नव्हता.

    ह्याच्यावरुन आठवले - काल विमानात शेजारी एक बडबडा अमेरिकन गृहस्थ बसला होता, त्याने मला सांगितले कि गिटार हा मूळ संस्कृत शब्द आहे: गीत+तार.
blog comments powered by Disqus
Get Adobe Flash playerPlugin by wpburn.com wordpress themes
WordPress SEO fine-tune by Meta SEO Pack from Poradnik Webmastera