नमस्कार!

नव्या ब्लॉगवर सर्वांचे स्वागत! :)
आता कसं ऐसपैस मोकळं ढाकळं वाटतंय!


लिहीण्यासारखे खूप काही आहे! नुकतीच मी इस्ट कोस्टला जाऊन आले..
६ दिवसात बाल्टीमोर, वॉशींग्टन डीसी, न्युयॉर्क आणि नायगरा.. अधली मधली लागणारी स्टेशन्स वेगळीच!

खूप पाहीले.. खूप फिरले.. खूप चालले.. खूप क्लिक-क्लिकले! :D

खरंम्हणजे हे प्रवासवर्णन प्रकार थोडासा बोरच! आठवून आठवून आणि माहीतीपूर्ण काहीतरी लिहावं लागतं! लेखणी सैल सोडून मनातले विचार येतायत तसे उतरवणे इथे अलाऊड नाही!  पण ती सगळी मजा मला तुमच्याबरोबर शेअर करायचीच आहे व माझ्यासाठीसुद्धा ती लिहून ठेवणे उत्तम! त्यामुळे लिहीन हे नक्की!

आत्ता एव्हढंच बास! नव्या ब्लॉगच्या कोर्‍या करकरीत पानावरचा श्रीगणेशा समजू याला..
पुढचा धडा – अमेरिकेचा पुर्वरंग .. :)

भाग्यश्री.

Popularity: 28% [?]

काय म्हणता, "मस्त पोस्ट आहे?" अहो मग सबस्क्राईब करा तुमचा इमेल आणि मिळवा नवीन पोस्ट्स थेट तुमच्या इमेलबॉक्समध्ये!!

Delivered by FeedBurner

Published: September 15th, 2009 at 17:27
Categories: Blog
Tags: