आज मी माझे काही आवडते चित्रपट इथे नोंदवत आहे.. तशी लिस्ट खूप मोठी आहे. पण सद्ध्या इतकेच.
अगदी डिटेलवार Review लिहायला कधी वेळच नाही मिळाला आणि बेसिकली हे बरेचसे फेमस आहेत ! सो रिव्ह्यु लिहीण्यात काय पॉईंट ?
My Cousin Vinny :
आपल्या “कायद्याचे बोला” या मुव्हीचा ओरिजिनल ! अतिश्शय भारी आहे! माझ्या नवर्याला तर ह्याचे डायलॉग्स, [...]
8 Movies I liked the Most
The Migration !
नमस्कार वाचकहो.. !
गेले दोन वर्ष तुम्ही हा ब्लॉग वाचत आहात. सुरवात जरा चाचपडत झाली, पण नंतर मात्र मी ही खूप ब्लॉगींग केले व व्हीजिटर्स, रेग्युलर रीडर्सही खूप मिळाले या ब्लॉगला.. ह्म्म, आता ब्लॉगींग केले म्हणजे फार काही दर्जेदार साहीत्य प्रसवले अशातला भाग नाही.. पण मनात येईल ते लिहीत गेले व लोकांना ते आवडले..
लॉंग ड्राईव्ह.. !
काल स्टारबक्सला भेट द्यावी म्हणून बाहेर पडलो.. कॉफी घेतली, बरोबर कॉफी बेरी केकही घेतला.. आणि बाहेर खुर्च्यांवर गार वार्यात गप्पा मारत बसलो.. कॅलिफॉर्नियामधला उन्हाळा फारच सुंदर! जरा दुपारी दोन एक तास वाईट उकडतं खरं.. पण एरवी सुसह्यच! रात्री तर सुखद!!
असंच इकडचं तिकडचं, दिवसभरातल्या गमतीजमती, ऑफीसमधली कामं तिथल्या गंमती, पुढचे व्हेकेशन प्लॅनिंग असं सर्वांगीण गप्पा [...]
माझी भटकंती – सोल्वॅंग – California’s Little Denmark !
कशुमा लेक नंतर आम्ही निघालो सोल्वॅंगला ! तसं अगदीच जवळ.. १४ माईल्स..
जाताना रस्त्यात सुंदर हिरवी-पोपटी कुरणं लागली.. आणि सोल्वॅंगच्या डॅनिश शब्दाचा अर्थ कळला! Sunny Fields !
माझी भटकंती – कशुमा लेक ( Cachuma Lake )
’माझी भटकंती’ या विषयावर लिहायचे अशी जोर्रात दवंडी पिटवूनही बरेच दिवस काही लिहीणे झाले नाही.. कारण: प्रसिद्ध व तीच ती ठिकाणे टाळणे.. अमेरिकेवर इतक्या लोकांनी , इतकं लिहीलंय की पुढे कोणीच काही नाही लिहीले तरी चालेल खरं.. त्यामुळे पर्याय कमी जरी नसले तरी दुर्मिळ/कमी-प्रसिद्ध पर्याय शोधावे लागतात..
बर्याच दिवसांपासून खास मीना प्रभू स्टाईल फिरण्यासाठी ( [...]
सूर्य-ढगांची लपाछपी
आज लाँग ड्राईव्हला बाहेर पडलो, आणि काहीतरी वेगळं जाणवलं.. वारा,पावसाळी हवा,ढगाळ हवा, उकाडा आहेच असं विचित्र काँबो..थोडं गावाबाहेर पडलो तर असा सीन दिसला!
निरोप आणि रंगरंगिले छैलछबिले!! :)
आज एक फार वाईट गोष्ट घडली.. माझ्या ब्लॉगवरच्या निम्म्याहून अधीक विजेट्स आणि टुल्सना मला निरोप द्यावा लागला.. करणार काय दुसरं? खूप जणांनी सांगितलं.. थोडा स्लो झाला आहे ब्लॉग, लोड टाईम जास्त आहे इथपासून ब्लॉग लोड व्हायला तासन तास लागत आहेत अशा कमेंट्स आल्या मला.. मग निरोप दिलेलाच बरा.. मला स्वत:ला स्लो लोड होणार्या साईट्स बद्दल [...]