You are here: Home > Uncategorized > ब्रेक

ब्रेक

सॅच्युरेशन…
इंटरनेट, ब्लॉग्स, टेम्प्लेट्स,कमेंट्स, नवीन ब्लॉगपोस्टचा विषय…

अजीर्ण झालंय अगदी.
हल्ली काही म्हणजे काहीच सुचत नाही लिहायला.
अगदी “काहीही” सुद्धा नाही!
जवळजवळ रोजच हे पान उघडून बसतीय.
पण एक शब्द देखील उमटत नाहीये.
विचित्रच फेज म्हणायची ही.

अचानक असे वाटू लागलेय, डोक्यात येणारा प्रत्येकच विचार हा कागदावर लिहीण्याची गरज नसते.
किंवा प्रत्येक गोष्ट, आवडती लिंक, व्हीडीओज शेअर करत बसल्याने काय वेगळं होणार? इंटरनेटच्या जगात आज नाहीतर उद्या ती कोणालातरी आवडलेली गोष्ट पसरतेच वार्‍यासारखी. मग आपण त्या वाहत्या गंगेत हात धुतल्याने काय (चांगला) फरक पडतो?
आवडती पुस्तके,चित्रपट, सिक्रेट रेसिप्या,दैनंदिन जीवनात येणारे अनुभव लिहीणारे कितीतरी आणि चांगले ब्लॉग आहेत.

मग मी लिहून काय वेगळं होतंय.
आणि यापेक्षा वेगळं मला काय येतं?
त्यामुळे नकोच ते.
ब्रेक घेते आता.
जाऊदे.

कदाचित पुढच्याच आठवड्यात लिहीन किंवा नाहीच लिहीणार.
तात्पुरता टाटा सर्वांना.

Popularity: 30% [?]

Tags: break

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • Twitter
  • RSS
  • मला तर मनात जे काही येईल ते लिहिल्याशिवाय चैन पडत नाही , बरेचदा ब्लॅंकनेस येतो तेंव्हा असंही वाटतं की आता बंद करावं, पण काहीतरी सुचतं लिहायला..किती दिवस चालते ते बघु ..
  • असं मलाही वाटतं खुपदा. प्रत्येक शब्दाशी सहमत
  • mazi hi awastha tashich zaliy .. :D
    btw blog ch template mast ahe !!
blog comments powered by Disqus
Get Adobe Flash playerPlugin by wpburn.com wordpress themes
WordPress SEO fine-tune by Meta SEO Pack from Poradnik Webmastera