हे शीर्षक थोडं अतीच लांब झाले आहे खरं, पण पर्याय नव्हता. नुसतेच “मराठी लोकं कंजुष का” चूक झाले असते [ म्हणजे पोस्टच्या संदर्भात म्हणतीय मी.. , एरवीचे.. जाऊदे!] “मराठी लोकं ब्लॉगिंगमधे कंजुषी का करतात?” हे तर साफ चुकले असते,मराठीब्लॉग्सला जोडलेल्या ब्लॉग्सची संख्या पाहून! म्हणून असे शीर्षक!
आज एकदम हा का विषय बुवा? ..तुम्हा वाचकांना माझ्या एकंदरीत Blogging Activity वरून एक समजले असेल. मी हल्ली खूप लिहीते. कधीकधी भंगारही लिहीते. कधी विषय असे धुमकेतूसारखे उगवतात, कधी मी एकदम Technical होते. आणि कायमच Blog Templates/ Themes आणि Widgets च्या शोधात असते. थोडक्यात मी या ब्लॉग्स प्रकरणात पूर्णपणे बुडून गेले आहे. Read the rest of this entry »
Popularity: 88% [?]

[ I guess I have lost the tempo of writing about my East Coast trip, which I was planning to finish ASAP. त्यामुळे आता ती सिरीज कधीतरी नंतर पूर्ण करीन मी..सद्ध्यातरी मी मनात येईल तसे लिहीणे फारच मिस करतीय! :D त्यामुळे आता काही दिवस मैदान मोकळे, विषयाचे बंधन नाही! :)]
