माझ्या परवा लक्षात आले, मी  डीसी मध्येच अडकून पडलीय की! अज्जुन  पुढे किती पल्ला गाठायचा आहे .. बापरे..  डीसी नंतर , निनादची युनिव्हर्सिटी, न्युयॉर्क, नायगरा इतके सगळे पाहीले. सगळ्यावरच लिहीन असे नाही , पण पुढे सरकले पाहीजे आता. मलाही बोर व्हायला लागले आता इतके निवांतपणे लिहीणे.. Smile

ओके.. So, मॉन्युमेंट झाल्यावर आमच्यात त्राण नव्हते. दिवस संध्याकाळकडे कलू लागला तसे आम्ही निघालो. आता व्हाईट हाऊस पाहून पटकन मेट्रो पकडायची असे ठरवले. जवळच आहे असे वाटणारे व्हाईट हाऊस चांगलंच लांब होते. कसे तरी लंगडत, थांबत थांबत गेलो एकदाचे तिकडे ! खरं म्हणजे मी आपले दिल्लीतले राष्ट्रपती भवन सुद्धा पाहीले नाहीये त्यामुळे व्हाईट हाऊस म्हटल्यावर मी कंटाळा टाकून परत फ्रेश झाले. चुकून माकून ओबामा दिसलाच तर बरंय ना? Wink Keep reading…

Popularity: 52% [?]

Tags: ,

· · · ◊ ◊ ◊ · · ·

[खूप दिवसांनी वळले परत प्रवासवर्णनांकडे . ]

अमेरिकेच्या पहिल्या President – अमेरिकेच्या राष्ट्रपित्याची आठवण म्हणून बांधलेले हे वॉशिंग्टन मॉन्युमेंट. तसे ते कुठूनही दिसतच होते आम्हाला. मात्र त्याच्या जवळ गेल्यावर, त्याच्या पायथ्याशी उभे राहील्यावर त्याची भव्यता कळली. पॅरिसचा आयफेल टॉवर होण्याआधी हेच मॉन्युमेन्ट जगातील सर्वात उंच स्ट्रक्चर असे बिरूद मिरवत होते. परंतू आयफेल टॉवर नंतर ते गेले. शिवाय वॉशिंग्टन डीसी मधील ही सर्वांत उंच इमारत.. नको.. स्ट्रक्चरच म्हणूया आपण. या स्ट्रकचरमागे किती इतिहास आहे पाहा : Keep reading…

Popularity: 57% [?]

Tags: , , ,

· · · ◊ ◊ ◊ · · ·

एअर अँड स्पेस म्युझियममधून बाहेर पडलो आणि बाहेर येऊन थांबलो. या भागातून एक हॉप ऑन हॉप ऑफ बस टूर फिरत असते. म्हणजे कुठेही बसा, कुठेही उतरा. तिच्या स्टॉपला आम्ही थांबलो. कारण आता वेळ कमी पडत चालला होता! टूरचे ५६ डॉलर्स जास्त वाटले खरं, पण पायांवर तेव्हढा विश्वास बसत नव्हता! त्यामुळे थांब थांब थांबलो.. एकदाची बस आली.. सरळ आत जाऊन बसायच्या ऐवजी आम्ही त्या गाईडला विचारले की भाऊ कशी जातीय ही बस? तर नेमकं त्यांचे व्हाईट हाऊस पाहून झाले होते.. आम्हाला तर ते पाहायचेच होते! मग आम्ही त्यालाच विचारले, बाबारे कसे जाऊ आम्ही? आजचेच ३-४ तास आहेत आमच्याकडे.. सगळं शक्यतो बघायचे आहेच. त्यानेच सांगितले, मेट्रोने फिरा. जास्त स्वस्त जाईल. या टूरमधे पैसे खूप जातील व व्हाईट हाऊस नाहीच! Keep reading…

Popularity: 34% [?]

Tags: , , , ,

· · · ◊ ◊ ◊ · · ·

रविवार सकाळ, दिनांक ६ सप्टेंबर .. सकाळी तसे आरामातच उठलो. खरंतर आमचा सकाळी ८लाच निघायचा प्लॅन होता. पण आम्ही आपले उठून आरामात गप्पा, चहा, कॉफी, ब्रेड ऑम्लेटचा नाश्ता असे करत बसलो होतो. शेवटी निघू निघू म्हणत १०-१०.३० ला घराबाहेर पडलो. मामा आम्हाला मेट्रो स्टेशनवर सोडणार होता, आणि मग तिथून पुढे आम्ही जाणार होतो. Keep reading…

Popularity: 33% [?]

Tags: , , , ,

· · · ◊ ◊ ◊ · · ·

सकाळी ७  वाजता बाल्टीमोर एअरपोर्टवर आमचे विमान उतरले. विमान उतरायच्या आधी वरून दिसणारी हिरवळ पाहून नाही म्हटले तरी डोळे जरा विस्फारलेच गेले! कॅलिफॉर्निया म्हणजे तसा दुष्काळीच भाग! उजाड पिवळे डोंगर, पामची झाडं आणि सतत समुद्र.. त्यामुळे पिवळा व नीळ्या रंगांचेच अधिपत्य! इथे दूरवर पसरलेला हिरवागार रंग फार फार सुरेख वाटला त्यामुळे ! Keep reading…

Popularity: 48% [?]

Tags:

· · · ◊ ◊ ◊ · · ·

दिनांक ४ सप्टेंबर २००९ ..
मायबोलीचा गणेशोत्सव संपला ३ ला.. तरीही नंतरची कामं उरली होती.. ती व एकीकडे प्रवासाची तयारी करत होते… ४ ला रात्री ११ ची फ्लाईट होती .. थोड्यावेळाने माझ्या लक्षात आले की मी नुसतीच भराभरा इकडून तिकडे फिरतीय घरात.. पण काम काही उरकत नाहीये..
शेवटी गणेशोत्सवाच्या कामाचे नॉलेज ट्रान्स्फर केले व तो अध्याय संपवला..

आता फुल्टू बॅगा भरणे वगैरे काम करूया म्हणून लिस्ट करायला घेतली… हसू नका! मी अहोरात्र लिस्टा करत असते..

Keep reading…

Popularity: 40% [?]

Tags: , , , ,

· · · ◊ ◊ ◊ · · ·

या ब्लॉगवरची पोस्ट्स थेट तुमच्या इमेल-बॉक्स मध्ये वाचण्यासाठी तुमचा इमेलऍड्रेस येथे भरा, इमेलमधून पक्का होकार भरा :) आणि झालं काम! इथून पुढच्या नवीन पोस्टस तुमच्या इमेल मध्ये!

Delivered by FeedBurner

Subscribe to माझे विचार... by Email
Friend Connect
visitors..
Visit blogadda.com to discover Indian blogs IndiBlogger - The Indian Blogger Community blogarama.com
Get Adobe Flash playerPlugin by wpburn.com wordpress themes