माझे विचार... » Experience

ल्हानपण देगा देवा !
आज मी खरंतर क्म्प्लीट वेगळ्या विषयावर लिहायला बसले होते. पॅशन्स, आवड्निवडी , माझी नाटकं, ऍक्टींग, डान्स, बॅडमिंटन, थ्रोबॉल.. हे सगळं आठवता शाळा आठवली.. मग अर्थातच माझे लहानपण असा आवडता विचार सुरू झाला..  मनातल्या मनात विचार करायचा कंटाळा आला, एकट्यानेच किती बडबडायचे ना? त्यामुळे म्हटलं (खोटा/व्हर्चुअल का असेना) कागद बराय. निदान मोनोलॉगच्या ऐवजी डायलॉग्स होतायत असे तरी वाटेल.

आज मी अगदी दिल खोलके स्मृतीरंजन करणार आहे. (हे मराठी साईट्स वाचून काय भलतेच शब्द आठवतात.. स्मृतीरंजन कस्लं आलं डोंबलाचे!) असो.

मला किती लहानपणचे आठवतंय असा खेळ करून पाहायची इच्छा झाली एकदम. बहुतेक बालवाडी. अभिनव शाळेत मी होते. तो मरूनीश लाल युनिफॉर्म, फुग्याच्या बाह्या, पांढरे मोजे, लाल वेल्क्रोचे शूज, भरपूर पावडर लावलेली चब्बी चब्बी गालांची मी व डोक्यावर पांढरा हेअरबॅंड व मोगर्‍याचा गजरा, हातात लालच प्लॅस्टीकची जाळीजाळीची डब्याची (स्टीलचा, डबलडेकर डब्बा!   )  व वॉटरबॉटलची पिशवी.. हे तयार होणे, तो सगळा युनिफॉर्म, तो घ्यायला गेलो होतो ते डेक्कनवरचे पूर्ण पोषाख, शाळेत शूज घ्यायला गेलो असताना माझ्या अवाढव्य पायाचा साईझ पाहून पहिलीतल्या मुलाचे शूज मला देणे. सर्व आठवतंय!! कसलं क्युट! तेव्हा आमचा गृप फोटो काढलेला देखील आठवतोय. तो तर महा गोड आहे. इथे द्यायचा मोह होतोय.

सगळ्यात उजवीकडची खालच्या रोमधली मी.   [टॅग करणार्‍याने फारच चित्रकला केलीय त्याबद्दल सॉरी! पण माझ्याकडचा फोटो सापडणे फार मुष्कील आहे.. ]

असो..  तेव्हाच्या प्रगतीपुस्तकावरचे शेरे मला अजुन आठवतात. आठवतात म्हणजे मी वाचते ते. अजुनही जपुन ठेवलंय ते. वेल, त्याला प्रगतीपुस्तक म्हणणे फारच रखरखीत आहे. इतकं गोड पुस्तक आहे ते. मी मोगरा ग्रुपमध्येच होते वाट्टं. बाईंनी लिहीले होते की ही फार मिक्स होत नाही, एकटीच खेळत असते. सर्व वार, आकडे, रंग ओळखू येतात.   सगळ्यांसमोर येऊन गाणी म्हणणे आवडत नाही. बुजते फार. थोडक्यात मोकळी होत नाही पटकन. तेव्हढं पाहा असं पालकांना सांगितले होते.   मला कमाल याची वाटते, की त्या बाईंनी माझा स्वभाव किती परफेक्ट ओळखावा? मी अश्शीच आहे! तेव्हाही मी मुलांच्यात जाऊन खेळण्यापेक्षा एकटंच चित्र रंगवणे, नाहीतर चिकटकाम करणे अशा गोष्टीत इंटरेस्ट घ्यायचे. पुढेही जरा तसेच. अभिनव मध्ये मी ६ वी पर्यंत होते. माझे मित्र-मैत्रिणी म्हणजे – माझ्या शेजारीच बसायच्या म्हणून दिप्ती,बेला मैत्रिणी व एकाच कॉलनीत राहयचो म्हणून आया एकत्र शाळेत पाठवायच्या त्यामुळे झालेले मित्र – ओंकार किशोर. बस्स..   बाकी सर्वांशी बोलत बिलत असीन मी. पण तेव्हा मला मैत्र यांच्याशीच वाटायचे. तसे आजूबाजूला बसणारे देखील माझे फ्रेंड्स होते. माझा मैत्रीचा पल्ला कधीच एक-दोन बेंचेसच्या पलिकडे का गेला नाही हे मला उमगत नाहीये! पण तसं आठवायला गेलं तर मागच्या बेंचवर बसणारा स्कॉलर जंगम(जंगम तू हे वाचत असशील बहुतेक!   ) त्याच्या शेजारी कोण बसायचे आठवत नाही. पण आम्ही एका तासाला जोक्सचे पुस्तक वाचत बसलेलो आठवतंय. किंवा हात फ्रॅक्चर झालेला राजे. अभिनव व पुढे गरवारेला देखील सेम वर्गात , मागच्याच बेंचवर बसाणारा आल्हाद, जबरी लंगडी खेळणारी स्नेहा, प्राची व दिप्ती नावाच्या असंख्य मुली, एकाच रिक्षेतली माझ्यासारखेच कुरळे केस असणारी पुजा, देविका, सायली दिप्ती या जिवाभावाच्या मैत्रिणी, चब्बी गालांची स्वाती, एक(की दोन) ट्विन्सही होत्या नाव विसरले.. .. कितीतरी..  [ अजुनही मला अभिनवचे क्लासमेट्स दिसले की वाटतं मला ओळखत तरी असतील का ते? पण ओळखतात हे ऐकून अजुन मजा वाटते!]  हा फोटो पाहून हे सगळे आठवले.. अवघडे ब्वॉ..

अभिनवचे दिवस फार सही होते. आमच्या कॉलनीतले सगळेच अभिनवला जायचे. त्यामुळे धमाल होती. सकाळी सगळे एकाच फाटक बाईंकडे इंग्लिशच्या क्लासला जायचो. मी,ओंकार,किशोर,बॅडमिंटन चॅम्प विशाखा , माझी बर्थ डेट शेअर करणरा सुरजित, आणि गरवारेची सावनी.. सकाळचा क्लास झाला की घरी येऊन जेवून दुपारी १२ ला शाळेला निघायचे. मी ओंकार किशोर चालत जायचो. ते दोघं अगदी जिवश्च कंठश्च मित्र. कदाचित मला मधेच आईने त्यांच्या बरोबर पाठवण्याने वैतागलेही असतील! पण २-३ वर्षं गेलो एकत्र आम्ही. रस्त्याने गप्पा मारत, उड्या मारत शाळेला जायचे. थोडं मोठं झाल्यावर तर मला आठवतंय   शाळेपाशी आल्यावर आम्ही रस्ते वेगळे करायचो. बाकीची मुलं हसू नयेत म्हणून.. लोल काहीही वागायचो तेव्हा! ..

नंतर शाळा बदलली. व गरवारेला आले. इथे कॉलनीतलीच ती सावनी मैत्रिण झाली. दोघी सायकलवरून जाऊ-येऊ लागलो.  शाळेच्या आधी संस्कृतचा क्लास. सावनीला संस्कृतचा तिरस्कार म्हणता येईल इतपत राग. मला आवडायचे पण टाईमपास जास्त प्रिय! मी रितसर क्लासची फी भरून वगैरे तो बुडवून तिच्या घरी टाईमपास करत बसायचे. :O नंतर अर्थातच समजले आईला. जबरी ओरडा बसला. व एकदाची जाऊ लागले रेग्युलर. [ आणि अर्थातच संस्कृत अजुन आवडू लागले! ती सुभाषितांची वही आत्ता इंडीया ट्रिपला मुद्दाम शोधून घेऊन आले..  ]

नववीच्या दरम्यान माझ्या शालेय मैत्र जीवनात एक पोकळी आली. सावनीला दुसरी मैत्रिण सापडली. व मी एकटी. केवळ एकच मैत्रीण जीवाभावाची करण्याची सवय महागात पडते हे तेव्हा समजायला हवे होते. पण समजले तर काय ना! चुका कशा होणार! प्रचंड एकटी पडले होते मी. [यात सावनीचा दोष अर्थात नाही. तो माझाच. ] पण मग नववी हे वर्ष फार विचित्र गेले. थोड्या काइंड ऑफ टवाळ बॅक-बेंचर्स मुलींशी  मैत्री करून मी अभ्यासाचे खोबरे केले. ते मला किती महागात पडले हे केवळ मलाच माहीत ! पण झाले खरे तसे. पण नशीबाने नववी संपता संपता मानसी मैत्रीण झाली [म्हणजे तीने स्वत:हून ओळख करून घेतली म्हणूनच. नाहीतर मी तेव्हढीच बुजरी तेव्हाही होते.. ] मानसी मैत्रिण झाली  ती झालीच.. अजुनही आम्ही घट्ट मैत्रिणी आहोत!

थोडा अभ्यास हळूहळू ट्रॅकवर येऊ लागला. व दहावीत अगदीच फजितवाडा होण्यापासून वाचले.

ही मानसी मला कशी भेटली बहुतेक मी मागे लिहीले होते. आमची मैत्री मायकेल जॅक्सनमुळे झाली! दोघींना (व बहुतेक आम्हा दोघींनाच) तो आवडायचा. व त्याच गाणी/कॅसेट्स/अल्बम्सची देवाण घेवाण करताना आमची मैत्री वाढली. केवळ जॅक्सन आवडतो या कारणामुळे तीनी मला भेटल्याच्या दुसर्‍याच दिवशी डेंजरस या अल्बमची ओरिजिनल कॅसेट आणून दिली होती! वॉव! हे म्हणजे सर्वात प्रेशस गोष्ट.. कशी काय माहीत नाही पण आमची मैत्री खूप टिकली. अजुनही.. किती वेगळ्या आहोत आम्ही. एकही विचार सारखे नाहीत म्हटले तरी चालेल! ती बरीच बंडखोर, खूपशी मॅच्युअर्ड, प्रॅक्टीकल तर मी बर्‍यापैकी कॉन्झर्व्हेटीव्ह, कंप्लिटली चाईल्डीश, इम्प्रॅक्टीकल व अती इमोशनल. धमाल होती.. रोज भांडायचो ! रोज ते मिटायचे. एकदा तर फालतू कारणावरून भांडल्यावर नंतर ती सॉरी म्हणायला आली -ते पण शाळेच्या ग्राऊंड समोरच्या प्लॅटफॉर्मवर आणि मी तीला माफ करायला तिला हसत हसत थोबाडीत मारली होती! शाळेतल्या सर्व मुला-मुलींसमोर..  अजुनही ती तो अपमान विसरली नसेल..  ))

हे आजचे असंबद्ध लिखाण शेवटी मानसी पुराणावरच येऊन थांबतंय असं दिसतंय. पण विचार केला तर ते तसंच आहे. ती माझी खरी पहीली जिवाभावाची मैत्रीण. शाळा – मैत्रीणी म्हटलं की तीच आठवते मला काय करू मी!    मला वाईट वाटते की मी पहिलीपासून गरवारे मध्ये नव्हते किंवा ती अभिनव मध्ये नव्हती. शाळेतला काळ सही असतो. तो नेमका आम्हाला १-१.५ वर्षंच मिळाला.. पुढे १०वीला आम्ही एकाच क्लासात नाव टाकलं. सिरियस्ली अभ्यास कसा करयचा हे बरचसं तिच्यामुळे कळ्लं. नाहीतर अस्मादिक जरा ’लक’ या गोष्टीवरच अवलंबून. एकदा वाचायचे व सोडून द्यायचे. परिक्षेत आठवेल ते आठवेल! तिच्यामुळे थोडा सिरीयस्ली अभ्यास केला. वेल थोडाच! त्याउलट मीच तिला अभ्यास सोडून फोनवर गप्पा मारायची सवय लावली !   अव्याहत गप्पा – बाबांनी फार पेशंस दाखवला त्या काळात! दर महिन्याचे फोनचे बिल पाहून नुसती मान हलवायचे !!  त्या आमच्या गप्पा नंतरही चालू राहील्या पुढे १०-१२ वर्षं!!  व नंतर मी लग्न करून USAला आले. किती रडली ती..

ओह गॉड.. इम्पॉसिबल आहे हे.. का अशी स्थित्यंतरं होतात माहीत नाही.. आत्ताच्या ट्रिपला मी २ महिने भारतात होते. पण आम्ही दोघी केवळ २ वेळाच भेटू शकलो.   दोघींची लग्न.. सासर.. जबाबदार्‍या.. uh.. या सगळ्या प्रकरणांमधून मैत्री तशीच ठेवणं किती अवघड आहे! अर्थात मैत्री राहतेच हो.. पण ते रेग्युलर बोलणं, गप्पा, बरोबर  टवाळक्या करत फिरणे ! कसं शक्य होणार काय माहीत..

असूदे.. म्हातार्‍या झाल्यावर फिरू एफ्सी रोडवर.. त्यात काय एव्हढं!

Cheers to childhood and friendship !

अमेरिका पूर्वरंग : १ – पळापळा कोण पुढे पळे !!!
दिनांक ४ सप्टेंबर २००९ ..

मायबोलीचा गणेशोत्सव संपला ३ ला.. तरीही नंतरची कामं उरली होती.. ती व एकीकडे प्रवासाची तयारी करत होते… ४ ला रात्री ११ ची फ्लाईट होती .. थोड्यावेळाने माझ्या लक्षात आले की मी नुसतीच भराभरा इकडून तिकडे फिरतीय घरात.. पण काम काही उरकत नाहीये..

शेवटी गणेशोत्सवाच्या कामाचे नॉलेज ट्रान्स्फर केले व तो अध्याय संपवला..

आता फुल्टू बॅगा भरणे वगैरे काम करूया म्हणून लिस्ट करायला घेतली… हसू नका! मी अहोरात्र लिस्टा करत असते..

ग्रोसरी काय आणायची, अभ्यास कसला करायचा, शॉपिंगसाठी कुठ्ल्या दुकानात जायचे, घर कसं आणि कुठून आवरायचे याचबरोबर मी नेहेमी प्रवासाला जायच्या आधी लिस्ट करते.. बॅगेत भरायच्या सामानाची लिस्ट. यात सबलिस्ट येते. बाहेर भटकायचे कपडे, घरात घालायचे कपडे त्यांची लिस्ट.. त्यानंतर येतात कॅमेरे, हॅंडीकॅम्स, त्यांचे व सेलफोन्सचे चार्जर्स .. अर्थातच सेलफोन्स सुद्धा! शिवाय टोप्या व गॉगल्स, सनस्क्रीन लोशन्स पाहीजेतच! त्यांना मोठा गोल – न विसरण्यासाठी..  आवरण्यासाठी लागणारे सामानाची वेगळी लिस्ट.. त्यातही सबलिस्ट करता येते.. माझे कॉस्मेटीक्स आणि नवर्‍याचे दाढीसामान,पर्फ्युम्स वगैरे वेगळंच..

असो.. मी इथेही बॅगच भरायला लागले की…

तर हे सगळं करताना एकीकडे कागदपत्रांची लिस्टही करणे जरूरी होते.. टोटल सहा दिवसांच्या मुक्कामात लागणारी हॉटेल बुकींग्स, रेंटल कार्स, उडणारी विमानं, पळणार्‍या बसेस सर्वांची कन्फर्मेशन्स..

आणि धडाम धूम! ४ तारखेला संध्याकाळी ४वाजता माझ्या लक्षात आले की अजुन न्युयॉर्क मधले हॉटेल, तिथे घ्यायच्या टूर्स शिवाय रेंटल कारचे काम बाकी आहे !! :O मग काय नुसती पळापळ.. एका साईडला फ्रिजमधे पेरिशेबल वस्तू नाहीयेत ना हे पाहायचे, तर दुसरीकडे हॉटेल कुठले हे शोधायचे.. हॉटेलं सगळीच महाग! मग निदान टूरला जवळ पडेल असं तरी शोधावं.. अरे देवा, टूर कुठे बुक केलीय अजुन! ओह तो आवडता टॉप बॅगेत टाकायचा राहीला.. नायगराला थंडी असेल, स्वेटरही टाकला पाहीजे.. टुर कुठली घ्यावी? महीन्याभरापूर्वी एक चांगले टूरचे पॅकेज सापडले होते.. आता कुठून शोधू मी? साईटचे नावही आठवत नाहीये.. हिस्टरीचे रेकॉर्ड्स पाहावेत.. अजुन डिलीट केली नसेल तर बरंय.. हा, हे हिस्टरीचे पान .. नेक्स्ट .. नेक्स्ट .. नेक्स्ट.. टॉप आणला… नेक्स्ट ..नेक्स्ट .. स्वेटर, टुथब्रश ठेवले.. नेक्स्ट .. नेक्स्ट.. ( आईगं किती ब्राउझिंग करते मी!! ) नेक्स्ट.. थोडा लाडू चिवडा आणि प्रिंगल्स ठेवावेत.. लागतात प्रवासात.. नेक्स्ट.. नेक्स्ट .. निनादचीही बॅग भरून ठेवावी, त्याला काय २ जीन्स ५ शर्ट्स.. बास होतात! मुली का नटतात इतक्या! .. नेक्स्ट.. नेक्स्ट..  हुश्श.. सापडली एकदाची! ह्म्म.. टूर करून टाकते बुक.. आता टूर कुठून निघतीय त्या रस्त्याच्या आसपासचे हॉटेल.. आईगं.. न्युयॉर्क पाहीले पण नाही आणि हे असले पत्ते शोधायचे! बर शोध.. किती वाजले.. ४.३० ? मायगॉड! ..

ओके हा रस्ता , इथून नाईट टूर निघतीय.. गुगल मॅप्स वर ब्रॉडवे आणि ऍव्हेन्युज टाकले तर मिळेल का जागा? होप सो! अर्रे रेस्टॉरंट मिळाले हे, खूण सांगितलीय टूरवाल्यंनी.. म्म म्हणजे हाच पत्ता.. आता हॉटेल्स.कॉम .. हा पत्ता टाकला, हॉटेलं कैच्याकै महाग देऊ नका! ११०-१२०$/पर नाईट पुष्कळ बख्खळ झालेत.. ह्म्म बरी दिसतायत की हॉटेल्स! अरे वा.. हॉलिडे इन.. चांगलेच असणार हे.. हरकत नाही.. ओह वेट.. रेंटल कार कुठे परत करायचीय ? ला गार्डीआ एअरपोर्ट.. तो कुठे आला आता? ४.५ माईल्स? सुपर्ब!! करून टाका बुक!

निनादला विचारून कन्फर्म केले सगळे , सर्व बुकींग्स झाली..

आता मिशन बॅग्स .. अर्ध्या तासात संपलंच पाहीजे.. पण किती अवघड आहे हे.. फार फिराफिरी करावी लागणार तीही सामान बरोबर ठेऊन म्हणून सोयीच्या बॅगपॅक्स आणल्या.. भल्या मोठ्या आहेत, पण तरी बॅगपॅक्सच ना त्या.. कितीसं सामान बसणार.. मला सगळे पातळ, कॉटन्चे वगैरे टॉप्स घ्यावे लागणार म्हणजे.. स्वेटर हातातच ठेवावा.. नशीब बॅगपॅक्स्ना रोलर व्हील्स आहेत.. हवे तेव्हा फरफटत न्यायची! … ह्म्म ही झाली माझी बॅग .. आता निनादची.. पटकन होते.. महत्वाची कागदपत्रं टाकली की झालं…

ओके फ्रीज व्यवस्थित आहे .. डिशवॉशरला काहिही लोड केले नाहीये. गॅस बंद .. घर पण जरा आवरून ठेवलंय.. जाताना पॅकींगचा पसारा होतो खरं, पण परत घरी येताना ते छान नीटनेटकंच बरं वाटतं.. मग तेही करून झाले.. हॅंडीकॅम चार्जिंगला लावून ठेवलाय तो ठेवला पाहीजे बॅगेत.. कॅमेर्‍याच्या बॅटर्‍या .. अरे किती वाजले… ६.४० ?? अजुन निनाद आला नाही! काय हे… ७ ला निघायचे होते.. तो LAX चा एअर्पोर्ट म्हणजे दिव्य आहे! ४ तास आधी निघालंच पाहीजे.. नशीब आला निनाद.. आता मी फ्रेश झाले की निघूयातच..

४ सप्टेंबर २००९ : ७.३५ मिनिटे .. अरे काय हे.. कधीपासून आवरतीय.. तरी साडेसात वाजले.. अजुन काही खाल्लं नही.. आय होप एअरपोर्टवर वेळ मिळेल खायला.. ह्म्म.. अरे वा आज गर्दी नाहीये नाही रस्त्याला! चक्क चक्क !! डॉट नऊला एअरपोर्ट पार्कींग्मधे ? गुड!

गाडी लावून जायचंय ना.. परत येताना बरं,आपलीच गाडी असली की.. मध्यरात्रीचे शटल कुठून करून जायचे…  आता हे एअरपोर्ट पार्कींग का सापडत नाहीये ? किती गोल फिरायचे!   हेच असेल अरे निनाद.. ऐक.. त्या बाईला विचारते.. हेच आहे.. परत जाताना क्न्फर्मेशन कोड दाखवायचाय.. ओके .. चला.. दुसर्‍या मजल्यावर मिळालं पार्कींग.. लिफ्टने आलो खाली.. निनाद विचारायला गेलाय बरोबरे ना ते? पण चुकलंच शेवटी.. लॉंग टाईम पार्कींग करायचे ३ ते ७ मजल्यावर! लिफ्ट यायला तयार नाही!! १० मिनिटं उभे आहोत जड बॅगा पाठीवर टाकून!! जाऊदे पळतच चढूया… बसलो गाडीत निनाद निघाला ७व्या वरच! नंतर टेन्शन नको.. लिफ्ट परत ढपली! ७ मजले उतरून खाली !! घड्याळ : ९:४५ रात्रीचे.. ठीके.. एक तास आधी आलो आहोत.. १०:५५ ची फ्लाईट ! आता शटलची वाट पाहू.. येईलच, मगाशी ४-५ आल्या डोळ्यादेखत…

पण आत्ता का येत नाहीयेत? आम्हाला एक मिनिटसुद्धा इतका महत्वाचा आहे आणि तुम्ही १५ मिन्टं झाली येत नाही म्हणजे काय ?? चालत जाऊया का? छे.. कुठाय एअरपोर्ट माहीत्तीय़ का? खात्रीनी विमान चुकवू आपण! थांबूया.. १०:१७ मिनिटं … आलं एकदांचं शटल.. पण नेमका आपला स्टॉप शेवटचा का?   अरे लवकर चल की सभ्य गृहस्था!!   विमान चुकवू नकोस… पुढचे सगळे प्लॅनिंग कोसळेल!! डेल्टा.. नाही… साउथवेस्ट.. नाही रे बाबा!! कधी येणार.. हा.. आलं.. सुटा पळत !!!!!

१०:२४ मिनिटं .. बोर्डींग पाशी .. समोरचा माणूस : huh talk about the timing ! if it was one minute later my system would not have allowed you!! goo run ! you will still make it!

परत पळा … सिक्युरिटीला लाईन दिसतीय.. देवा .. काय हा सस्पेन्स.. प्लीज प्लीज जमूदे …

ती बाई आली विचारत आमचे नाव. .. आहोत गं आम्ही.. आलोच एव्हढं सिक्युरीटी चेक करून.. विमानाला म्हणावं थांब!!

टींग.. अर्र.. माझा बेल्ट राहीला.. परत टिंग ?ह्म्म किल्ली राहीली खिशात .. तिकडे निनादच्या बॅगेत टिंग.. ओह.. शेव्हींग क्रीम कसं चालेल कॅरीऑन लगेजला! घ्या काढून.. काय खुष झाला होता तो समोरचा! फुकटात मिळालं ना!

अरे हे काय…

निनाद थांब!! मी अजुन शूज घालतीय.. ओह गॉड हा पळायला पण लागला.. कसा पळू शकतोय एव्ह्ढी बॅग पाठीवर टाकून ?? अरे माझे शूज का जात नाहीयेत… तसंच पळते.. केहढी जड आहे सॅक.. किती कपडे घेतले मी नेमके? धड पळता पण येत नाहीये शूज अर्धवट घातल्याने.. टाचा बाहेर आणि बोटं शूज मधे! काय फनी दिसत असेन मी..  ))

हा असा का पळतोय!! कुठे आहे गेट नक्कि?? अगदी जिना चढून झाला.. उजवीकडे वळलो..(शूज गेले पायात नीट, पळतापळताच!! हुश्श.. आता पळता येईल..  )  मग सरळ जऊन परत डावीकडे !! मग एक चौक लागला! आयमिन तिथे चारी बाजूला गेट्स होते… आमचं कुठलं? परत पळत जाऊन उजवीकडे!! अरे वा… विमान आहे अजुन !! धॅन्टॅन्डॅन !!!!

शेवटचे पॅसेंजर आम्ही .. ! हाफ हुफ करत बसावं तर बॅगांना जागा नाही.. अरे बसवा ना कसं तरी, चेक इन कशाला तेव्हढ्यासाठी.. बर चेक इनच करायचे असते तर निनादचे शेव्हींग जेल नसते का आले !!

हुश्श… सर्वात शेवटी आमच्या बॅग्स बसल्या एकदाच्या .. आणि आम्हीही बसलो !!

किती पळापळ ?? काही सुमार ? पाणी नाही अन्न नाही! ही लोकं काय दाणे देणार.. बर पाणी द्या आधी प्लीज..

आय होप मला विमान लागणार नाही!   हा निनाद मुद्दाम घाबरवतो.. हं ठीके झालं नीट टेक ऑफ.. पाणी प्यायले, दाणे खाल्ले..  आता झोपा.. पाय आखडून का होईना ! ५ तासांनी बाल्टीमोर !!

निरोप आणि रंगरंगिले छैलछबिले!! :)
आज एक फार वाईट गोष्ट घडली.. माझ्या ब्लॉगवरच्या निम्म्याहून अधीक विजेट्स आणि टुल्सना मला निरोप द्यावा लागला.. करणार काय दुसरं? खूप जणांनी सांगितलं.. थोडा स्लो झाला आहे ब्लॉग, लोड टाईम जास्त आहे इथपासून ब्लॉग लोड व्हायला तासन तास लागत आहेत अशा कमेंट्स आल्या मला.. मग निरोप दिलेलाच बरा.. मला स्वत:ला स्लो लोड होणार्‍या साईट्स बद्दल काही विशेष ममत्व वाटत नाही.. तेच इतरांना माझ्या ब्लॉगबद्दल नको वाटायला.. म्हणुन हा निरोप..

असो.. आजचे पोस्ट मी खरंतर केवळ निरोपसमारंभ नाही..

मला व्यसन लागलंय लिहायचे.. कुठेही गेले फिरायला की डोक्यात संवाद सुरू .. अरे हे मस्त ठिकाण आहे.. लिहीता येईल याच्यावर..फोटोज काढले की हा चांगलाय.. असला मॅक्रो कोणीच काढला नसेल.. टाकूया उद्या ब्लॉग/मायबोली वगैरेवर.. किंवा चक्क जोक झाला तरी मला तो पटकन ब्लॉगवर टाकावासा वाटतो..

तसं प्रत्येक वेळेला करता येत नाही, आणि होत नाही तेच बरं.. नाहीतर प्रत्येक महीन्याची मे सारखी परिस्थिती व्हायची!

पण काल हाईट झाली! म्हणजे खरंच हाईट.. मला मानसोपचारतद्न्याकडे जावं लागेल.. काल रात्री अर्धवट झोपेत मला या पोस्टचा विषय सुचला.. नुसताच विषय नाही! तर सगळं पोस्ट मी झोपेत फ्रेम केले.. सुरवात अशी.. मग असं लिहूया वगैरे…  मी लिटरली  (अर्धवट)झोपेतून जागी होऊन बघायला लागले.. काय होतंय नक्की?? मग मला पोस्ट सुचलं हे कळल्यावर तेव्हा उठून मी पोस्ट टाईप करणार होते.. पण जरा अतीच झाले असते ते.. मग राहीले…

आता आठवल्यावर लिहीले पाहीजे ना तसे.. पण सुरवात काही आठवत नाही आता.. इतकी छान होती ती झोपेतली सुरवात… आता जाऊदे…

तर … ते पोस्ट फार भारी नसून साध्या आपल्या रंगांवर होते.. येस्स… आठवली सुरवात! क्या बात है भाग्यश्री! त्वाडा ज्वाब न्नै.. ( वगैरे जे काय असेल ते.. मला मराठी धड येते.. बाकीच्या भाषा नाहीत! )

हां.. मी लहान असताना.. म्हणजे इयत्ता ४थी वगैरे.. तेव्हा दर उन्हाळ्याच्या सुट्टीत वेळ घालवायला (आणि आईच्या मागची भूणभूण कमी करायला ) मी आणि दादा एका नाट्य-शिबीराला जायचो.. झांबोकाका नामक माणूस ती शिबीरं घ्यायचा.. आय नो, नाव खूप कॉमेडी आहे… पण यात काहीही माझी क्रिएटीव्हीटी नाही! माझ्याकडे त्या शिबिरातून मिळालेली सर्फितिकिट्स सुद्धा आहेत! ( हो..  स-र-फि-ति-की-ट !! लहानपणचा माझा दावा असा, की फिकीट असा शब्द नसतो परंतू तिकीट असतो,  तेव्हा तो वर्ड सर्फितिकीट असाच आहे!!  )  तर ते झांबोकाका मस्तपैकी नाटकं लिहायचे, बसवायचे.. ती नाटकं मग भरत नाट्य मंदिरात सादर व्हायची.. इतक्या मुलांना घेऊन नाटक करणे म्हणजे खाऊ नाहीये… आदर वाटतो मला त्यांचा.. असो..

बरीच नाटकं केली.. हिमगौरी आणि सात बुटके, जसा राजा तशी प्रजा(ही नाटकाची थीम होती.. असं नाव नव्हतं.. श्या, नाव आठवतच नाहीए..   ).. आणि, रंग-रंगिले छैल छबिले !!

तर हे पोस्ट रंग-रंगिले छैल-छबिले बद्दल…

एकंदरीत असा प्लॉट होता.. (आईशप्पथ.. कसलं भारी वाटतंय.. एकदम कलाकार अभिनेत्री दिग्दर्शक वगैरे झाल्यासारखे!! )

प्लॉट असा होता , की एका चित्रकाराच्या रंगपेटीतले रंग एके दिवशी बोलायला लागले..  मग सगळे आपली महती सांगायला लागले.. त्याची मस्त गाणी रचली होती… हो, झांबोकाकांनी.. अजुन एक मुलगी होती मदतीला.. तिनेही रचली असावीत , कल्पना नाही…  तर सगळे रंग आपली महती सांगतायत.. बाकीचे त्याची थट्टा करतायत.. पांढर्‍याची जास्तच.. मग शेवटी चित्रकार(म्हणजे माझा दादा) येऊन सगळ्यांना लेक्चर देतो, की तुम्ही सगळेच महत्वाचे आहात.. मग देवी सरस्वती येऊन पांढर्‍याची बाजून घेऊन सगळ्यांना झापते.. प्रार्थना होते.. आणि नाटक संपते!!

आठवतील तशी करूनच टाकते पोस्ट.. काही दिवसांनी विसरीन.. खरं म्हणजे हेच नाटक मी परत आमच्या कॉलनीच्या गणेशोत्सवात केले होते.. इन-फॅक्ट आत्ता तेच डोळ्यासमोर आहे.. त्याची व्हीडीओ कॅसेटही केली होती.. पण व्हीसीआर न वापरल्यामुळे कॅसेट खराब.. सो लिहून ठेवते आता…

मी निळी झाले होते.. ड्रेस नवीन आणला होता निळा.. हेबरबॅंड म्हणजे आपला हेअरबॅंड तो निळा.. पायात मोजे निळे.. इतकेच काय? गालाला निळे रूज आणि केसात निळी चमकी ओतली होती!! मी पुढे येउन गाणं म्हटलं होतं!! (किती त्रास श्रोत्यांना!! )..

“आभाळ निळे, डोंगर निळे .. निळासावळा.. कृष्णकन्हैय्या.. लालालाअलाअ.. (आठवत नाही.. ) शिवशंकर.. तो ही निळा… ” (चाल: जीना यहॉं, मरना यहॉं.. इसके सीवा जाना कहा! म्हणून पहा! )

मग सगळ्या बाकीच्या कलर्सनी मला चिडवायचे.. for example , नीळू बाई नीळू नको आता पिळू! वगैरे…

मग लाल.. तो गजू होता.. त्याने तर काय कॉमेडी ड्रेस घातला होता.. त्याचा लाल टीशर्ट, माझीच लाल स्लॅक्स, वर लाल टोकाची टोपी , हातात लाल छ्डी आणि हो..गालाला लाल चमकी!  ) ..

गाणं होतं : “लाल टांगा घेऊन आला लाल टांगेवाला.. ऐसा लाला गाणे गातो, लल्लाल्ललालल्ला.. घोडा लालेलाल, त्याची शेपूट लालेलाल (आमचा कोरस : हेहॉ!” ) वगैरे… त्याला तांबड फुटलंवरून चिडवलं सगळ्यांनी!

पिवळा चिंटू.. त्याला गळ्यात सोनेरी कागदाचा केलेला हार.. बाय डिफॉल्ट येणारी त्या रंगाची चमकी.. आणि खाली चक्क काकूंची पिवळी जरतारी साडी, धोतर म्हणून ! तसा तो नाचत होता..

“पिवळा पितांबर नेसुनी लालालाला.. गरुडावर बैसोनी माझ्या कैवारी आला” वगैरे… काय होतं देव जाणे.. आरती टाईप होतं..

हिरवा ओंकार.. त्यालाही हिरवी टोपी, हिरवा टीशर्ट, हिरवी चमकी आणि  माझा हिरवा स्कर्ट! त्यावरून हिरवी अशोकाची पाने… हाता-पायावर हिरव्या रंगाने चट्टेपट्टे.. !

गाणं : “हिरवे हिरवे गार गालिचे.. हरिततृणांच्या मखमालिचे .. त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती!” याला काय चिडवलं आठवत नाहीये!

जांभळा : नचिकेत दादा.. त्याने कुठून तरी जांभळा पठाणी ड्रेस पैदा केला होता.. वर कोणाची तरी जांभळी ओढणी डोक्याला बांधली होती! गाणं अर्थातच ,

“जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कोणाचा वाजतो..हो हो हो ढोल..वाजतो, कोणाचा वाजतो!!”

त्याने जांभळ्याची महती सांगताना जांभूळ, करवंदं इत्याआडि टेस्टी प्रकार सांगितले होते ! आणि इतकी मस्त खायची ऍक्टींग करत..

काळा: आदित्य.. कॉस्चुम डिझाईनिंगला सगळ्यात सोप्पा रोल ! काळा टीशर्ट, काळी जिन्स.. संपलं! हो, ती चमकी आहेच…

“हम काले है तो क्या हुवा , दिलवाले है! (आमचा कोरस: अय्यो अय्यो!”)

काळा रंग काय महत्वाचा आहेच! काळी माती, काळा फळा, विठोबा काळा वगैरे !

पण त्याला काय रिडिक्युल केलं आम्ही(नाटकात म्हणजे!) .. तू काळा आहेस.. तू बाजूला हो..वगैरे ! हेहे..

स्नेहल पांढरी..  ती आपली इतकी बिच्चारी दाखवली होती.. तिच्याकडे काही बोलायला पण नव्हतं.. गाणं तिनेही म्हटले पण ती इतकी दुर्लक्षित की मला आता आठवत नाही! तिलाही नाटकात इतका त्रास दिला! तुला काही रंगच नाही.. कॅन्व्हासवर आम्ही सगळे कसे छान उठून दिसतो.. तूझा काय उपयोग वगैरे…

मग ती रडायला लागते.. मग सर/चित्रकार येऊन सगळ्यांना ओरडतो.. समजावतो..

मग सगळे रंग सरस्वती देवीची प्रार्थना करतात.. ती प्रसन्न होते.. थोडं लेक्चर देते.. त्या कॅन्व्हास वर प्रत्येक रंगाला उडी मारायला सांगते.. कॅन्व्हास सगळा खराब होतो… मग ती म्हणते तुमच्या सर्वांमुळे हा खराब झाला! तो परत पूर्वीसारखा करून द्या आता?? सगळे मान खाली घालतात! पण पांढरा खुष असतो.. मग सरस्वती म्हणते, तुम्ही खराब केलेला कॅन्व्हास हा पांढराच पूर्ववत करू शकतो! मग त्याने तसे केल्यावर सर्व रंगांना आपली चूक उमगते.. ते पांढार्‍याला आपल्यात घेतात, आणि गातात.. “रंग-रंगिले छैल-छबिले” !!

खरंतर शेवटीही गाणं होतं एक.. ते ही विसरले..

फार बालिश आहे हे.. पण माझं बालपण फार मस्त केलं या आणि अशा गोष्टींनी.. कॉलनीच्या गणेशोत्सवासाठी आईने बसवले होते हे नाटक.. तिला ते लिहीण्यासाठी मदत मी केली होती.. तेव्हा सगळी गाणी आठवत होती! त्यामुळे अगदी निर्मितीपासून भाग घेतलेले हे नाटक माझ्यासाठी फार आवडीचे !

तुम्हाला हे पोस्ट आवडल्यास जरूर कमेंट्स लिहा..

Zoo Zoo..!
तुम्ही जर zoozoos च्या शोधात आला असाल इथे, तर कसं फसवलं!!   हेहे.. ते झूझूज क्युट आहेतच! पण मी लिहीतीय़ ते नुस्त्याच झू बद्दल! Los angeles Zoo.. !

परवा होता लॉंग विकेंड.. कुठेतरी लांब जायची इच्छा होती, पण ती काही वर्काउट नाही झाली! शेवटी काहीच नाही तर निदान एले झू पाहावे म्हणून निघालो..
तिथे पोचल्यावर कळले की अशा विचाराने आख्खी जनता लोटलीय तिथे!  )

मी प्रचंड खूष होते! किती वर्षांनी ते पण नाही आठवत आता.. पण नक्कीच लहानपणी पेशवे पार्क पाहीले, त्यानंतर आजच प्राणीसंग्रहालयात गेले.. जाम मजा!

सुरवातीला पिटुकल्या प्राण्यांनी आणि पक्षांनी सुरवात झाली.. एक कुठलीतरी जंगली मांजर, Alligator (किती जवळची वाटली ती मगर! माझीच रास!  ), वाळवंटात राहणारे प्राणी इत्यादी पाहीले.. वाळवंटातले प्राणी तर अगदीच वेगळे होते.. काडीसारखा दिसणारा किडा, लिबलिबीत बेडूक, निवांत झोपलेल्या lizards, भला मोठा पाण्यात पहुडलेला अजगर!

LA मधेही पुणेरी पाट्या असतात बरं! नेमका माझा कॅमेरा नव्हता माझ्या सोबत.. नाहीतर काढणारच होते फोटो! प्रवेशद्वारालाच पाटी लावली होती! हीट वेव्ह आल्यामुळे सगळे प्राणी सावलीत /शेड मधे झोपले आहेत. काही व्हीजिबल नसतील..काहीतरी आवाज काढून प्राण्यांना उगाच घाबरवू अथवा दचकवू नये !

सुरवातीचे लिंबूटिंबू प्राणी पाहून फायनली मेन झू ला निघालो.. मला कधी पासून वाघ सिंह बघायचे होते…
पण समोर आला बर्ड शो! आता युनिव्हर्सल आणि सीवर्ल्डचा इतका अत्त्युत्तम शो बघितल्यावर हा सो सो च वाटला.. फक्त साद दिल्यावर खूप लांबून डोंगरावरून पक्षी येत होते.. ते फार भारी! एक सप्तरंगी पोपट लिटरली माझ्या डोक्यावर पाय ठेऊन गेला!  ))

तो शो झाल्यावर आम्ही साउथ आफ्रीकन विभागात गेलो.. कुठला तरी भला मोठा पक्षी होता! नाव बिव विसरले!   तो पाहील्यावर काही माकडं पाहीली.. हेहे फांद्याना लटकत होती.. आणि आम्हा प्रेक्षकांना वाकुल्या दाखवून खाणं चाललं होतं.. पलिकडे कुठला तरी बगळ्याच्या कॅटॅगरीतला, सोनेरी पाय आणि नाकावर तुरा असलेला पक्षी कॅटवॉक करत उगाच इकडून तिकडे जात होता!

सहज मागे पाहीलं तर मागच्या पिंजर्‍यात चक्क जग्वार!! आहाहा! कस्ला देखणा दिसत होता.. पण तसा छोटाच असावा.. आणि काळाही नव्हता! त्यामुळे बरंय.. मला काळ्या जग्वारची भयंकर भिती वाटते…(म्हणजे भिती वाटायला तो काही खेळायला येत नाही माझ्या घरी! apocalypto नावाच्या सिनेमात तसेच अजुन बर्‍याच सिनेमात त्याचे भितीदायक दर्शन घडलंय!)  हा छान सोनेरी, त्यावर काळे ठिपके आणि चौकोन असलेला होता! क्युट होता! नंतर तर तो बॉलशी खेळत बसल्याने अगदीच लहान बाळासारखा वाटला!  )
त्याच्याशेजारीच ते घाणेरडं व्हल्चर, गिधाड चक्क शांतपणे बसले होते.. रादर भेदरून… तेव्हा समजलं बच्चा असला तरी जग्वारचा बच्चा आहे ! मग आम्हीही तिथून सटकलो !

आगीतून फुफाट्यात म्हणतात ना, ते असं! बच्चा जग्वारच्या तावडीतून सुटून आलो तर समोर चक्क वाघ! मी तर पळतच सुटले.. वाघ या प्राण्याबद्दल मला भयंकर attraction आहे ! देखणा,तितकाच हिंस्त्र.. वाघोबाकाकांचा मूड अगदीच खराब होता! जरा वृद्ध होता किंचित.. पण तरी चेहर्‍यावर अती-हिंस्त्र भाव! किती लांबून बघत होतो आम्ही, तरी भेदरलो होतो! वाघ नुसता इकडून तिकडे अस्वस्थपणे फेर्‍या मारत होता! या टोकापासून त्या टोकापर्यंत.. उकाड्याने हैराण झाला अस्णार.. जिभ बाहेर काढून नुस्ता हाफ हुफ करत होता! नुसताच इकडून तिकडे फिरणार्‍या वाघाला पाहून लोकांनी पण दंगा करायला सुरवात केली.. जरा गप्पा, गोंधळ व्हायला लागला.. आणि वाघाने जी काही डरकाळी फोडली ना!!  Ohh Myy Godd !! थिजून जाणे कशाला म्हणतात ते कळले.. लागोपाठ ७-८ डरकाळया फोडल्यावर मग जरा वाघ शांत झाला.. आणि… आमच्या समोर येऊन थांबला क्षणभर ! मी त्याच्या पर्फेक्ट समोर होते.. मधे तसं म्हटलं तर काहीच नव्हतं! पाण्याचा ओढ्याटाईप होतं.. आणि जरा चढावर गवत.. वाघाच्या अन माझ्या नजरेची एक क्षण नजरानजर झाली.. ! ऐकलं होतंच, अनुभवलेही… वाघाच्या नजरेत नजर मिळवली की तुम्ही एक क्षण संमोहीतच होऊन जाता! काय देखणा प्राणी! म्हातारपणीही हॅंडसम दिसत होता!

जागोजागी ब्रेक म्हणून माकडं होती.. इतकी माकडं पाहीलीयेत बापरे ! जगात माकडांची संख्या काही कमी नाहीये म्हणजे ! पुढे माउंटन तापिर नावाचा डुक्कर प्लस अस्वल असा दिसणारा प्राणी दिसला.. गलिच्छ वाटला!   (सॉरी तापिर !! )

नंतर स्नो चिताह खिडकीत आपल्या कमी होणार्‍या लोकसंख्येचा विचार करत ध्यानमग्न असा बसला होता! तो इतका दुख्खी वाटला की काय विचारायची सोय नाही! २००० च उरलेत आता आख्ख्या जगात!
त्याच्याशेजारी अस्वल होतं.. त्याचं काय चालले होते ते शेवटपर्यंत कळले नाही! इकडून तिकडे.. मग गुहेत.. मग परत भिंतीच्या कडेकडेने! काय बोर होत असेल ना प्राण्यांना तिथे ??

अस्वलाच्या शेजारी तळं होतं… आणि त्यात दोन पक्षी उगाच फिरत होते ! म्हटलं यांच्या साठी आख्खं तळं?? मग नंतर दिसला.. भिंतीला टेकून पहुडलेला हिप्पो !! आईग.. किती ते वजनदार प्रकरण! नाक,तोंड फार बेक्कार असतं ब्वॉ हिप्पोचे ! जरा नीट पाहीले तर त्याच्या डोळ्यातून पाणी येत होते!   काय कारण असेल हिप्पो रडण्याचे ???  I could not think of any reason..  शेवटी त्याला Don’t cry, be happy असं म्हणून निघाले ! त्याच्याकडे बघून कझिनचा नवरा म्हटला शरद पवारांची आठवण येतीय !! लोल !!

मग नंतर ..अरे देवा ! चिंपांझी! त्यांचा मोठ्ठा पिंजरा होता! आणि त्यात आधी आम्हाला ३ चिंप्स दिसले.. नंतर एक एक वाढून चक्क १०-१२ चिंपांझी आले ! केसाळ बुटकी माणसं जमल्यासारखीच वाटत होती.. नंटर काय झालं माहीत नाही, ते सगळे माणसांसारखेच भांडू लागले! २ जण बहुतेक बाकीच्यांना घाबरवत असावेत ! कोणीही खेळायच्या एरिआत आले की ते २घं त्यांना पळवून लावायचे आरडा-ओरडा करून! बापरे… तो फार्स अर्धा तास बघत बसलो आम्ही!! मजा आली! त्यांची भाषा समजली असती तर भांडणाचे कारणही कळले असते! .. असो…

मग पुढे जिराफांची फॅमिली पाहीली… उंचच उंच… उंच लोकांना एक superiority complex अस्तो.. तसाच त्यांनाही वाटला.. सगळे इतके शायनिंग मारत फिरत होते ना मान ताठ ठेऊन !! त्यातल्या त्यात एक जिराफ-पिल्लू बुटकं होतं! मला मग तेच आवडलं!!  )

नंतर सफारी शटल मधून उगाच चकरा मारल्या.. ऑस्ट्रीच, उंट, कांगारू , हरणं इत्यादी प्राणी पाहीले आणि आलो घरी!!

संपला माझा “प्राणीसंग्रहलायातील एक दिवस” वरचा निबंध!!

तुम्हाला हे पोस्ट आवडल्यास जरूर कमेंट्स लिहा..

भुकंप .. !
लॉस एंजिलिस मधे काल दुपारी ११.४५ च्या दरम्यान ५.४ रिश्टर स्केलचा भुकंप झाला.. (आधी ५.८ म्हटले, नंतर ५.६,५.४ करत आता ५.४ म्हणत आहेत.. हे कसे, माहीत नाही!)  जीवितहानी काही झाली नाही, तसेच काही ठीकाणी तुरळक वित्तहानी झाली.. कमीत कमी नुकसान होण्याचे श्रेय नक्कीच इथल्या ’अर्थक्वेक रेझिस्टंट’ घरांना जाते..
मिपा वर पिडाकाकांनी हा भुकंपावर लेख लिहीला.. त्याप्रमाणेच मी ही इथे माझ्या शब्दात तो अनुभव मांडते..

माझा इथलाच काय आयुष्यातला पहीला धरणीकंप..    भारतात व्हायचे तेव्हा अस्मादीक झोपलेले असल्यामुळे कधिही कळला नाही.. इथे आज, सकाळी मस्त उशीरा उठून मिपावर टीपी करत बसले होते तर तासाभरात धबधब्धब आवाज्,सोफा,खिडक्या,दारं,झुंबरं, दिवे सगळं काही हलतंय , उठून उभी राहीले तर माझ्यासकट खालची जमीन, आख्खं घर हलतयं हा अनुभव अतिशय स्केरी होता!! असा भुकंप मी भारतात नाही अनुभवला.. कदाचित लाकडाची घरं असल्यामुळे असेल, पण सगळं घर लोकल मधे ठेवल्यासारखं हलत होते.. मी थरथर कापत होते लिटरली..प्रचंड सैरभैर झाले.. त्यातुन वरून्,शेजारून लोकं बाहेर येण्यासाठी पळत सुटली होती, त्याचाही आवाज होत होता.. कशी बशी दारा पर्यंत आले, तर तोपर्यंत भुकंप बंद झाला होता.. मग बसले घरातच.. नवर्‍याला फोन करायचा प्रयत्न केला.. पण नेटवर्क ढपलं होतं.. अजुन १०-१५ सेकंद्स जरी चालू राहीला असता भुकंप तर मी रडायला लागले असते फॉर श्युअर.. पण नशिबाने नवरा पण ऑफीसातून लगेच घरी आला.. आणि एकदाचे हुश्श वाटले.. पुढे अर्धा तासतरी मी कापत होते.. आयुष्यात प्रथम मी इतकी घाबरले.. घर कोसळतंय की काय सुद्धा वाटलं.. पण ठीके, आता एकदा इथला भुकंप कळल्यावर नेक्स्ट टाईम नाही काही टेन्शन येणार.. पिडाकाकांसकट सगळ्या कॅलीफॉर्निया-स्थित आप्तेष्टांनी प्रेमानी हेच सांगितलं ‘वेल्कम टू कॅलिफॉर्निया’.. त्यावरून हे असं होतंच राहतं असं दिसतं!    तेव्हा पुढल्या वेळेस पहील्याप्रथम बाहेर पळीन!

तुम्हाला हे पोस्ट आवडल्यास जरूर कमेंट्स लिहा..

कंटाळा..
मी आत्तापर्यंत खूप वेळा दुपारी एकटी राहलीय घरात.. एस्पेशिअली दादा अमेरीकेला गेल्यावर जास्तच.. आधी आमचा धिंगाणा चालायचा दुपारी,आई-बाबा ऑफीसमधून येईपर्यंत .. नंतर मी आणि आज्जीच… मला आठवतंय तेव्हापासून, साधाराण आमच्या शाळा सुरू झाल्यापासून आज्जी दुपारी एकटीच असायची घरी.. बरीच वर्ष कान-डोळे ठीक असे पर्यंत आज्जी टीव्ही पाहायची, रेडीओ ऐकायची.. काही बाही वाचत बसायची सतत.. अभंग, भजनं वगैरे.. नाहीतर शिवणकाम असायचंच.. नंतर मोतीबिंदूचे ऑपरेशन झाले, कानही जरा दगा द्यायला लागले तसे आज्जीनी टीव्ही,रेडीओ बंद केले.. वाचनही कमी केलं.. ह्म्म, स्वयंपाक मात्र कायम असायचाच .. अजुनही आज्जी स्वयंपाक करायच्या उत्साहात असतेच, पण आता मात्र बर्‍याच गडबडी होतात दिसत नसल्यामुळे.. असो.. तर सांगायचा मुद्दा हा, की ती सतत एकटी असते , निदान दुपारी.. तरी एकदादेखील कंटाळली नाही.. सतत काहीतरी चालू असते तिचं.. मी तिथे होते तेव्हा आमच्या गप्पा चालायच्या बर्याच.. दुपारचा चहा पिताना ती मला माहीत असलेल्या/नसलेल्या गोष्टी सांगायची.. कित्येकदा इतक्या जुन्या गोष्टी, की मला संदर्भच लागायचे नाहीत.. पण तेव्हा वेळ छान जायचा…

आता दुपारी ती तिथे एकटी असते , न मी इथे एकटी असते… पण मला खात्री आहे,की ती काहीतरी काम काढून व्यस्त राहात असेल.. मी मात्र इथे कंप्युटर समोर बसून काहीतरी कारण शोधते बिझी राहण्याचं.. पण कंटाळते.. आज्जीसारखी सतत कामात राहायची आवड नाही.. or mayb सवय नाही…(केली पाहीजे आता!)मला कमाल वाटते त्या पिढीतल्या लोकांची… माझे maternal आजोबा देखील एकटे राहात होते शेवटचे ४-५ वर्ष.. ऐकू जवळपास यायचे नाही, त्यामुळे लोकांशी गप्पा वगैरे जवळपास नाहीतच.. पण किती आनंदी,आणि बिझी असायचे.. क्रिकेट म्हणजे त्यांचा जिव की प्राण.. match असली की आजोबा जाम खूष.. मग आपण जिंकलो की मस्त पार्टी करणार… एकंदरीत समाधानात राहणार..
हे जमणं किती अवघड आहे ते कळतंय आता… मला माहीती आहे की आज ना उद्या मला काम असणारे.. खूप बिझी रुटिन होईल माझं… नवीन गोष्टी शिकायला आहेत.. स्वयंपाकघर तर प्रयोगशाळाच आहे.. कितीही प्रयोग केले तरी न पुरणारे आहेत.. कंप्युटर,एखादं छान पुस्तक वाचायला डोळे शाबूत आहेत.. मग हा कंटाळा का येतो? किंवा मी येऊ देते त्याला.. थोडतरी आज्जी-आजोबा किंवा आईबाबां सारखा होता आलं तर किती बरं होईल…!!

तुम्हाला हे पोस्ट आवडल्यास जरूर कमेंट्स लिहा..

लायब्ररी !!
फायनली इतक्या दिवसांच्या गॅप नंतर मी परत लायब्ररी चालू केली. लग्नाच्या गडबडीत कोण वाचणार म्हणून पुण्यातली लायब्ररी बंदच केली होती.. आणि इथे आल्यावर सुद्धा, सुरवातीचे दिवस सेटल होण्यातच गेले.. पण गेले काही दिवस अगदीच बोर व्हायला लागलं होतं.. नेटवर तरी किती वाचणार.. बरं, जे चांगलं लिहीतात ते काय ब्लॉग रोज अपडेट नाही करत.. आणि मायबोली,मनोगत,उपक्रम वर तर, काहीच वाचावसं सापडत नाही आजकाल! म्हणजे वाचणेबल असतं बरच काय काय.. पण बहुधा मला नेट वर वाचायचा कंटाळा आलाय.. शेवटी नवर्‍याला लायब्ररीमधे घेऊन जाण्याचा तगादा लावला.. ( काय ना.. ड्रायव्हींग येत नसेल तर अमेरीकेत अगदी भजं होऊन जातं तुमचं!!   माझी स्कुटी पाहीजे होती इथे…  )
एकदाचं लायब्ररी मधे आलो !! काय सुंदर आणि प्रचंड आहे इथली लायब्ररी.. ऐकुन होतेच पण आता प्रत्यक्ष पाहायला मिळालं.. कार्ड घेण्यासाठी रांगेत उभी राहीले, तर १ मिनिटार सगळी प्रोसिजर खतम..! कार्ड हातात, आणि अन्लिमिटेड पुस्तकं , ३ आठवड्यांसाठी… wow !! घाईने पुस्तकांच्या सेक्शन मधे गेले, आणि लिटरली वेड लागलं.. आख्खा मजला भरून फक्त fiction.. त्याच्या वरच्या मजल्यावर non-fiction आणि reference books..अधे मधे बसायला टेबलं होतीच.. बाकी सगळ्या सुविधा होत्याच.. पण मला आवडलं ते पुस्तकांचे कलेक्शन आणि लायब्ररीचं इंटेरियर ! काय अफलातून होतं ते.. दिवसच्या दिवस तिथे बसून , कॉफी पीत पुस्तक वाचत बसावं…

अधाशासारखी पुस्तकं घ्यायला गेले.. पण असल्या अजस्त्र कलेक्शन मधून काय घ्याव न काय नको होत होतं.. पुस्तकांची लिस्ट असायला हवी होती बरोबर… त्यामुळे डॅन ब्राऊन चे angels and demons आणि Da vinci code ची special illustrated edition आणि अशीच आधीच वाचलेली अजून २-४ पुस्तकं घेऊन आले.. आता काही दिवस तरी वेळ कसा घालवावा हा प्रश्न नाही!! (नवर्‍याला तर हसूच येत होतं माझा उत्साह पाहून॥)

पण एक प्रश्न पडलाय.. चांगल्या पुस्तकांची यादी कुठे मिळेल मला? कोणी सजेस्ट करू शकाल का, कुठली पुस्तकं वाचू? इथे कमेंट्स मधे प्लिज तुमची आवडती पुस्तकं लिहा.. इंग्लिशच..   इथे मराठी नाही मिळत.. thanks in advance!

तुम्हाला हे पोस्ट आवडल्यास जरूर कमेंट्स लिहा..

तारे जमीन पर ! :)
काल नवऱ्याबरोबर बाहेर जाताना आकाशात काहीतरी चमकल्यासारखं दिसलं.. विमानतळ जवळच आहे, त्यामुळे पहील्यांदा विमान वाटलं. पण तरी विमान काही इतक्या वेगानी जात नाही.. आणि त्या प्रकाराला धुमकेतू सारखी धुसर शेपुट पण होती..! लाईट ब्लु कलरचा तो प्रकार म्हणजे करण जोहर स्पेशल ’टुटता सितारा’ होता असा आम्ही निष्कर्श काढला!! आयुश्यात पाहील्यांदा असं काहीतरी पाहात होते! ( काही वर्षांपुर्वी पुण्यात उल्का वर्षाव पाहीलाय..ते पण भारी होतं).. पण हिंदी पिक्चरवाल्यांनी या falling star ला जरा जास्तच ग्लॅमर दिलं आहे.. आणि म्हणे तो पडताना पाहीला की मनात जी इच्छा घेऊ ती पुर्ण होते.. आता मला सांगा… तो तारा बिचारा इतका जोरात पडत असतो.. तो आपल्याला दिसायची मारामार.. आणि त्या एका क्षणात विश कसली करायची?? आणि ती विश केलीच, तर पुर्ण कोण करणार .. तो तारा??   ( मुव्ही मधे काहीही दाखवतात दुसरं काय… !)
काहीही असो.. पण फार सुंदर द्रुश्य होतं ते.. इथे अमेरीकेमधे, निदान आमच्या गावात आकाश फार व्यवस्थीत दिसतं.. सगळी घरं बंगलेवजा आहेत, आणि झाडं पण काही आपल्या अशोकासारखी उंच नाहीत.. त्यामुळे सहज पाहीलं तरी आकाशाचा विस्तार दिसतो.. आणि म्हणूनच काल मला हा प्रकार दिसला.. माहीत नाहीय नक्की, की तो तुटणारा ताराच होता.. पण मी समजून चालले आहे.. नंतर विश पण बोलून घेतली, खोटं कशाला बोला.. झाली खरी तरी बरंच आहे ना!

( btw, वरचं लिखाण केवळ tp आहे.. तो तारा नसतो आणि meteoroid असतो हें लेखिकेला माहित आहे)
http://en.wikipedia.org/wiki/Falling_star

तुम्हाला हे पोस्ट आवडल्यास जरूर कमेंट्स लिहा..

hmmm… nostalgia !!!
आज सकाळ पासून कॉलनीच्या देवळातून कसले तरी फेकल्याचे, आणि बांधाबांधीचे आवाज आले, आणि एवढा आनंद झाला.. गणपती आले !! कायम आदल्या दिवशी दिवसभर हे मांडव घालायचे काम, वर्षानुवर्षे चालत आले आहे.. लहानपणी शाळेतून आले की समोरच्या बिल्डींगमधे हा मांडव तयार होताना दिसायचा.. तेव्हा कॉलनीमधे देऊळ , ती मोकळी जागा झाली नव्हती.. तो मांडव पाहून होणारा आनंद खरच अवर्णनीय असे.. संध्याकाळचे खेळ सगळे सोडून त्या मांडववाल्यांचे काम तासन-तास निरखत बसायचे, एव्ह्ढाच उद्द्योग ! बर्‍याचदा त्याच दिवशी, संध्याकाळपासून मॅचेस चालू व्हायच्या.. कॅरम, बॅडमिंटन, चेस वगैरे.. मी नेहेमी प्रमाणे कॅरम आणि बॅडमिंटन मधे भाग घ्यायचे.. आणि बर्‍याचदा हरून यायचे.. पण तरी ते खेळण्यातला आनंद जबरी असायचा.. अधून मधून जिंकल्यावर तर फारच छान वाटायचे…

दुसर्‍या दिवशी दुपारपासून आरास करणार्‍यांची, प्रसादाचे काम असणार्‍यांची, आणि अर्थात आमची मिरवणुकीची गडबड चालू व्हायची ! ती नेहेमीची लाल व्हॅन दारं उघडी ठेवून कॉलनीच्या रस्त्यावरून जायला लागली की अक्षरशः हातातलं काम टाकून पळत सुटायचो आम्ही! त्या गाडीमधून गणपतीच्या सुंदर मुर्तीची इतकी वाजत-गाजत मिरवणुक निघायची.. सगळी पोरं-टॊरं जमून आपले घसे साफ करून घेणार.. त्या घोषणा.. मुलांचे नाचणॆ.. बायकांच्या फुगड्या.. तो उत्साह !   सगळ्यात शेवटी मग ती मुर्ती देव्हार्‍यात विराजमान होणार.. Artist लोकांनी नेहेमीप्रमाणेच उत्कृष्ट सजावट केलेली असायची.. मुर्ती बसेपर्यंत आमच टाईमपास चाले.. मग आरती च्या वेळेला मात्र न चुकता हजर ! तेव्हा आरत्या पण येत नव्हत्या.. पण जाऊन जाऊन पाठ पण झाल्या.. आणि सगळ्या जमावाबरोबर आरती म्हणण्यातलं थ्रिल अनुभवलं.. अजुनही एकत्र आरती म्हणताना काटे येतात अंगावर.. !! आरती संपली की हमखास होणारी बेहेरे काकांची आणि गुरुजींची मंत्रपुष्पांजलीच्या वेळेची जुगलबंदी!.. फार हसू यायचे तेव्हा..   आरती झाली की मुख्य आकर्षण! प्रसाद….   कुट-साखर.. आंब्याची बर्फी.. शिरा( प्रसादाचा आणि तो पण!! umm…. yummy !! ) …

रात्रीची जेवण कशीबशी आटोपून लग्गेच पळायचं.. बरोब्बर ९ वाजता कार्यक्रम चालू व्हायचे.. बर्‍याचदा त्यात अस्मादीकांचा सक्रीय भाग असायचाच.. त्यामुळे ती वेगळीच धावपळ.. नाटका-नाचाचे वेगळे कपडे.. मेकप-गेटप… मॅकड्रॅप ची ती नेहेमीची ड्रेपरी!! कपडे सुद्धा ओळखीचे झाले होते!   दर वेळेला भाग घेऊनही स्टेजवर जातानाची भिती अजुनही आठवतीय… पुर्वी लोकं सुद्धा सगळी यायची कार्यक्रम पाहायला आणि कार्यक्रमही चांगले असायचे..   नाटक वा नाच झाला की रात्री ११-११.३० ला मोठ्यांकडून मिळणारा बटाटावडा, किंवा सॅंडविच…! भूक तरी असायची का! पण ते कौतुकाचे एक स्वरूप होते.. आमच्या कॉलनी मधे कायम कला-गुणांना वाव मिळाला.. माझ्यासारखी बुजरी मुलगी .. आणि वर्षानुवर्ष न घाबरता इतक्या लोकांसमोर perform करत होते, यातच कॉलनीचे यश म्हणायचे!!

कार्यक्रमांचे स्वरूप पण ठरलेले असायचे.. पहील्या दिवशी गणेश स्तवन म्हणून गाणं… मग एखादं भरतनाट्यम.. :। काय बोर व्हायचे ते !! ते झाले की मग खर्‍या कार्यक्रमांना सुरवात! विविध डान्स, कथाकथन, नाट्यछटा, नाटकं… आणि डान्स मधे देखील किती प्रकार! सर्वप्रकारची लोकंनृत्ये.. कोळीनृत्यं, नवरात्रावरच्या गाण्यांवरचा नाच.. रेकॉर्ड डान्स असायचेच पण त्यातही creativity… एकदा आम्ही छायागीत सादर केले होते.. बापरे.. केव्हढी ती गाणी,प्रॅक्टीस… पण प्रोग्रॅम इतका सुंदर झाला.. तसेच आधुनिक रामायण वगैरे… सगळी लोकं अफाट मेहेनत घ्यायचे.. नाटकं पण इतकी विनोदी.. अगदी नावापासून… रंगरंगिले छैलछबिले, शूर राजूची चड्डी ओली वगैरे…       पण ही सर्व नाटकं कॉलनीमधल्या लोकांनीच लिहीलेली असायची… direct केलेली असायची.. आणि आम्ही मुलंच त्यात काम करायचो..
दुसर्या दिवशी असाच प्रोग्रॅम असायचा, आणि तिसर्‍या दिवशी व्हायचा आम्च्या कॉलनी मधल्या मुलांनी बसवलेला ऑर्केस्ट्रा… !! सर्व वादक,गायक,निवेदक म्हणजे आमचेच दादा अन ताई लोकं!! काय गाजायचा ऑर्केस्ट्रा!! अगदी १ वाजे पर्यंत चालायचा.. ( तेव्हा वेळॆचं बंधन नव्हतं!)
४थ्या दिवशी याच लोकांचे ३ अंकी विनोदी नाटक..!! काय टॅलंत होतं या लोकांमधे… ! शांतेच कार्ट, गेला माधव कुणीकडे, लग्नाची बेडी ई.ई. नाटकं मी प्रथम या लोकांची पाहीली… ! फारच सुपर्ब!
आणि शेवटच्या दिवशी, म्हणजे संध्याकाळी व्हायचं फन-फेअर.. ! फुल्टू धमाल… भरपुर खाण्याचे आणि खेळण्याचे स्टॉल्स.. मस्त म्युझीक! आणि मित्र-मैत्रीणींचा गोंधळ… २-३ तास एकदम मजा असायची! फन-फेअर झाले की व्हायची तयारी बाप्पांच्या मिरवणुकीची…   खरंच घरातलं कुणीतरी सोडुन चालल्याची जाणीव व्हायची तेव्हा… ५ दिवस चाललेला गोंधळ संपल्याची जाणीव व्हायची!
रात्री व्हायचा बक्षिस-समारंभ.. १०-१२वि झालेल्यांना बक्षिसे असायची.. प्लस, खेळामधे जिंकलेल्या लोकांना, तसेच सगळ्यात जास्त कार्यक्रमात भाग घेतलेल्या मुलाला/मुलीला ही बक्षिस असायचे.. ते बर्‍याचदा वंदनालाच मिळायचं!   आम्ही आपले वाट पाहायचो हा समारम्भ संपायची… ! कारण त्यानंतर असायचे कॉफीपान..   आख्ख्या वर्षभरात कॉफी न मिळाल्यासारखे आम्ही लोकं कॉफी प्यायचो तेव्हा! पैजाही लागायच्या कोण जास्त कॉफी पितो.. needless to say, त्या मीच जिंकायचे!
hmmmmm………..
आता यातलं काय उरलं?? जवळपास काहीच नाही.. कारण दादा लोकांच्या पिढीतले आता इथे कुणीच नाही, even आमच्या देखील… सगळी चिल्ली-पिल्ली आहेत आता… त्यांचे ते काहीही सिन्क्रो नसलेले डान्स पाहायला, आणि जवळपास सगळे डायलॉग्स अं..अं… करत म्हटलेली नाटकं पाहायला काही उत्साह नाही राहीला… ते केवळ त्यांच्या आई-बाबांच्या कौतुकाचा विषय! तसेच, त्यांचे ते वयाला नं शोभणारे नाचही पाहावत नाहीत..
कार्यक्रम हळुहळु संपतच आलेत म्हणा.. कोण जाणे अजुन काही वर्षांनी इतपत तरी काही होईल का?
असं काहीही असलं तरी आमच्या कॉलनीचा गणेशोत्सव हा सगळ्यांचाच वीक-पॉईंट आहे… [ यंदाचे तर गणेशोत्सवाचे २५वे वर्ष आहे!   ] त्यात आख्खं कुटुंब सहभागी असायचे.. लोकमान्य टिळकांचा हेतू किती चांगला होता हे कळते.. सगळे १५०-२०० फ्लॅट्स एकत्र येऊ शकत.. njoy करू शकत…
असो… मराठी माणूस हा जरा अतीच nostalgic होत असतो हे पटते अशावेळेला.. पुढच्या वर्षीपासून मी हे सगळं वाईट्ट मिस करणारे.. ते वातावरण.. तो उत्साह ! US of A मधे अजुनतरी इतकं कुणी celebrate नाही करत… चालायचंच…
आज हे सगळं आठवलं आणि चक्क माझ्या ब्लॉग वर नविन पोस्ट आलं! हेहे… आठवणींचे हा एक फायदा आहे.. त्या लिहून ठेवल्या की नंतर वाचायला मस्त वाटतात!!
i hope, अशाच आठवणी येतील, आणि मी काहीतरी लिहीन…. ( नाहीतरी मला लिही काहीतरी, लिही काहीतरी असं काही लोकं म्हणतंच होती… भोगा आता आपल्या कर्माची फळं!!       ) !!

तुम्हाला हे पोस्ट आवडल्यास जरूर कमेंट्स लिहा..

मागचा आठवडा फारच मस्त गेला!
आठवड्याच्या सुरवातीलाच Junior College च्या Principal सत्यनारायण मॅडम भेटल्या.. खरंतरं, दिसल्या… पण चक्क चक्क त्यांनी मला ओळखलं.. आणि आम्ही कितीतरी वेळ गप्पा मारल्या!! कॉलेज चालू असताना मी कधी बोलले नव्हते… तरी त्यांनी मला ओळखलं,बोलल्या… सही वाटलं.. (तेव्हा कधी वाटलं नव्हतं सत्तूला पाहून,बोलून मला एव्हढा कधी आनंद होईल…   किती त्रास द्यायचो आम्ही त्यांना!!! )
फक्त एवढंच नाही.. तो आठवडाच वेगळा होता! Junior collegeचे एक सर, MIT मधले chemistry चे कोकाटे सर, आणि साठे मॅडम सुद्धा दिसल्या.. !!
जबरी वाटलं…..आणि जबरी वाटलं म्हणून आश्चर्य सुद्धा ! मी कधीच फार sincere/fav student नव्हते.. (हम्म्म.. black list मधे पण नव्हते बरका…) पण तरी या शिक्षकांनी आपली आठवण ठेवली, मला त्यांना भेटून आनंद झाला(आणि त्यांना मला भेटून!) यामुळे मजा वाटली!
एकंदरीतच जुन्या आठवणींमधे किती रमतो ना आपण? जुने दिवस, शाळा-कॉलेज मधले शिक्षक,मित्र-मैत्रिणी….त्यांना भेटल्यावर आपल्याला तो काळ आठवतो.. एकदम tension free,मस्त life होतं ते..  तेव्हा कदाचित तितकं जवळचे कुणी वाटत नसेलही, परंतू नंतर त्यांना भेटल्यावर आनंद होतो खरा! किंवा कदाचित मी आता इथे(म्हणजे पुण्यात,भारतात!) काही दिवसंच आहे, म्हणून होत असेल… माहीत नाही… पण मस्त feeling !!

तुम्हाला हे पोस्ट आवडल्यास जरूर कमेंट्स लिहा..