माझे विचार…

विचारांना शब्दांत बांधायचा प्रयत्न !

टॅग – टॅग ..

TAGS: None

नमस्कार वाचकहो..

सद्ध्या भारतवारीवर असल्यामुळे ब्लॉगिंग अगदी बंदच आहे. तिथे अमेरिकेत केव्हढाल्ला रिकामा वेळ असतो आणि  इथे कसा वेळ जातो हेच कळत नाही!  :)

असो..

आता भारत वारी संपतही आली त्यामुळे जिवश्च-कंठश्च मैत्रिणीची आठवण यावी तशी ब्लॉगची आठवण आली ! पेंडिंग कमेंट्स पाहताना लक्षात आले की , मंदार आणि अनिकेत* या दोघा ब्लॉगर्सनी मला एका प्रश्नावलीसाठी टॅग केलं आहे त्यामुळे ते कळल्याबरोबर व वेळ मिळाल्याबरोबर लगेचच ब्लॉग उघडला..

* एक छोटी मिस्टेकची दुरूस्ती .. मंदार आणि विरेंद्र या दोघांनि टॅग केले होते. कमेंट्स पाहून लेख लिहायला घेईपर्यंत नावांचा गोंधळ केला.. :(

८-१० दिवसांत नियमित ब्लॉगिंग सुरू होईलच असे दिसते आहे.. :)
तेव्हा भेटू परत..

तोवर ही माझी उत्तरं ! Read the rest of this entry »

Popularity: 31% [?]

Szła dzieweczka आणि बरेच काही !? ..

Tags: ,

युट्युबवर फिरताना ही मजा सापडली!

आधी हा व्हीडीओ पाहा..

ओळखली चाल? :) Read the rest of this entry »

Popularity: 100% [?]

SSKचे दिवस ! :D

Tags: , , , ,

ssk परवा मिथूशी फोनवर बोलताना अपरिहार्यपणे विषय ११वी – १२वी पाशी आला. मग कलमाडी  ज्युनियर कॉलेज, आ्मचा ग्रुप असा फिरत  फिरत  अपरिहार्यपणेच SSK पाशी आला…
SSK ? काय आहे हे SSK??  तर , ते आहेत आमच्या सरांचे नावाचे इनिशिअल्स. S.S.Kulkarni ! Sunil S. Kulkarni !

इंजिनिअरींगला ऍडमिशन घेतली. सगळी नव्याची नवलाई संपली आणि थोड्याच दिवसात काहीतरी भयंकर नावं कानावर पडू लागली! M1, Graphics, App-mech इत्यादी. या सर्व विषयांना क्लास मस्ट आहेत असे हुषार मैत्रिणींकडून समजले. काही तर चक्क जाऊ सुद्धा लागल्या होत्या! आम्ही (म्हणजे मी, मिथू वगैरे) , इंजिनिअरिंगला तेही आवडत्या Computer Engineering ला ऍडमिशन मिळाल्याच्या आनंदात आणि एव्हरेस्ट सर केल्याच्या आविर्भावात बसलो होतो. परंतू सुवीने ऑल्रेडी क्लासेस सुरू केलेत म्हटल्यावर आम्हाला पण टेन्शनच आले. व चौकशा करून आम्हीही पैसे घेऊन गेलो SSK सरांच्या क्लास मधे ! ( आधी वगैरे पैसे भरल्याचे मला आठवत नाहीये , डायरेक्ट पहील्या दिवशी पैसे घेऊन गेलो.. :) ) Read the rest of this entry »

Popularity: 90% [?]

वेगळा ट्रॅक ..

Tags:

road1 [ I guess I have lost the tempo of writing about my East Coast trip,    which I was planning to finish ASAP.  त्यामुळे आता ती सिरीज कधीतरी नंतर  पूर्ण करीन मी..सद्ध्यातरी मी मनात येईल तसे लिहीणे फारच मिस करतीय! :D  त्यामुळे  आता काही दिवस मैदान मोकळे, विषयाचे बंधन नाही! :)]

ह्म्म… विषयाचे बंधन नाही ही चांगली गोष्ट आहे, पण एक तरी विषय पाहीजे ना डोक्यात? Read the rest of this entry »

Popularity: 60% [?]

माझी भटकंती – सोल्वॅंग – California’s Little Denmark !

Tags:

कशुमा लेक नंतर आम्ही निघालो सोल्वॅंगला ! तसं अगदीच जवळ.. १४ माईल्स..
जाताना रस्त्यात सुंदर हिरवी-पोपटी कुरणं लागली.. आणि सोल्वॅंगच्या डॅनिश शब्दाचा अर्थ कळला! Sunny Fields ! Read the rest of this entry »

Popularity: 23% [?]

माझी भटकंती – कशुमा लेक ( Cachuma Lake )

Tags:

’माझी भटकंती’ या विषयावर लिहायचे अशी जोर्रात दवंडी पिटवूनही बरेच दिवस काही लिहीणे झाले नाही.. कारण: प्रसिद्ध व तीच ती ठिकाणे टाळणे.. अमेरिकेवर इतक्या लोकांनी , इतकं लिहीलंय की पुढे कोणीच काही नाही लिहीले तरी चालेल खरं.. त्यामुळे पर्याय कमी जरी नसले तरी दुर्मिळ/कमी-प्रसिद्ध पर्याय शोधावे लागतात.. senyum

बर्‍याच दिवसांपासून खास मीना प्रभू स्टाईल फिरण्यासाठी ( म्हणजे लिखाणासाठी फिरणे.. :) ) जागाही शोधून ठेवली.. मात्र जाणं होईना! एकदाचे काल ठरले.. सोल्वॅंग .. ( Solvang – Danish word meaning ‘ sunny field’ ) Read the rest of this entry »

Popularity: 25% [?]

मी टिपलेली काही फुले!

Tags:

फोटोंचे अल्बम पाहता लक्षात आले, की बरीच फुलं जमली आहेत माझ्याकडे.. त्यांचे हे कलेक्शन..

Please go through my Flickr Link..

Popularity: 17% [?]

Wish List..

Tags:

या काही गोष्टी, ज्या मला जमत नाहीत.. किंवा जमवून बघायच्या आहेत!

  1. कुठेही न धडपडता चालणे.. किंवा स्वयपाक करताना एकही भांडं न पडणे..
  2. सर्व रस्ते नीट बरोबर नावानिशी लक्षात राहणे.
  3. कुठल्यातरी मोठ्ठ्या ट्रेकला यशस्वीरित्या जाणे..
  4. गाडीचे , दाराचे लॉक पहील्या झटक्यात उघडणे. त्यात माझा लेफ्टी असण्याचा ’हात’ असणारे पण! Read the rest of this entry »

Popularity: 19% [?]

Zoo Zoo..!

Tags:

तुम्ही जर zoozoos च्या शोधात आला असाल इथे, तर कसं फसवलं!! :D हेहे.. ते झूझूज क्युट आहेतच! पण मी लिहीतीय़ ते नुस्त्याच झू बद्दल! Los angeles Zoo.. !

परवा होता लॉंग विकेंड.. कुठेतरी लांब जायची इच्छा होती, पण ती काही वर्काउट नाही झाली! शेवटी काहीच नाही तर निदान एले झू पाहावे म्हणून निघालो..
तिथे पोचल्यावर कळले की अशा विचाराने आख्खी जनता लोटलीय तिथे! :))

मी प्रचंड खूष होते! किती वर्षांनी ते पण नाही आठवत आता.. पण नक्कीच लहानपणी पेशवे पार्क पाहीले, त्यानंतर आजच प्राणीसंग्रहालयात गेले.. जाम मजा!

सुरवातीला पिटुकल्या प्राण्यांनी आणि पक्षांनी सुरवात झाली.. एक कुठलीतरी जंगली मांजर, Alligator (किती जवळची वाटली ती मगर! माझीच रास! :D), वाळवंटात राहणारे प्राणी इत्यादी पाहीले.. वाळवंटातले प्राणी तर अगदीच वेगळे होते.. काडीसारखा दिसणारा किडा, लिबलिबीत बेडूक, निवांत झोपलेल्या lizards, भला मोठा पाण्यात पहुडलेला अजगर!

LA मधेही पुणेरी पाट्या असतात बरं! नेमका माझा कॅमेरा नव्हता माझ्या सोबत.. नाहीतर काढणारच होते फोटो! प्रवेशद्वारालाच पाटी लावली होती! हीट वेव्ह आल्यामुळे सगळे प्राणी सावलीत /शेड मधे झोपले आहेत. काही व्हीजिबल नसतील..काहीतरी आवाज काढून प्राण्यांना उगाच घाबरवू अथवा दचकवू नये ! :D

सुरवातीचे लिंबूटिंबू प्राणी पाहून फायनली मेन झू ला निघालो.. मला कधी पासून वाघ सिंह बघायचे होते…
पण समोर आला बर्ड शो! आता युनिव्हर्सल आणि सीवर्ल्डचा इतका अत्त्युत्तम शो बघितल्यावर हा सो सो च वाटला.. फक्त साद दिल्यावर खूप लांबून डोंगरावरून पक्षी येत होते.. ते फार भारी! एक सप्तरंगी पोपट लिटरली माझ्या डोक्यावर पाय ठेऊन गेला! :)))

तो शो झाल्यावर आम्ही साउथ आफ्रीकन विभागात गेलो.. कुठला तरी भला मोठा पक्षी होता! नाव बिव विसरले! :( तो पाहील्यावर काही माकडं पाहीली.. हेहे फांद्याना लटकत होती.. आणि आम्हा प्रेक्षकांना वाकुल्या दाखवून खाणं चाललं होतं.. पलिकडे कुठला तरी बगळ्याच्या कॅटॅगरीतला, सोनेरी पाय आणि नाकावर तुरा असलेला पक्षी कॅटवॉक करत उगाच इकडून तिकडे जात होता! :)

सहज मागे पाहीलं तर मागच्या पिंजर्‍यात चक्क जग्वार!! आहाहा! कस्ला देखणा दिसत होता.. पण तसा छोटाच असावा.. आणि काळाही नव्हता! त्यामुळे बरंय.. मला काळ्या जग्वारची भयंकर भिती वाटते…(म्हणजे भिती वाटायला तो काही खेळायला येत नाही माझ्या घरी! apocalypto नावाच्या सिनेमात तसेच अजुन बर्‍याच सिनेमात त्याचे भितीदायक दर्शन घडलंय!) हा छान सोनेरी, त्यावर काळे ठिपके आणि चौकोन असलेला होता! क्युट होता! नंतर तर तो बॉलशी खेळत बसल्याने अगदीच लहान बाळासारखा वाटला! :))
त्याच्याशेजारीच ते घाणेरडं व्हल्चर, गिधाड चक्क शांतपणे बसले होते.. रादर भेदरून… तेव्हा समजलं बच्चा असला तरी जग्वारचा बच्चा आहे ! मग आम्हीही तिथून सटकलो ! :)

आगीतून फुफाट्यात म्हणतात ना, ते असं! बच्चा जग्वारच्या तावडीतून सुटून आलो तर समोर चक्क वाघ! मी तर पळतच सुटले.. वाघ या प्राण्याबद्दल मला भयंकर attraction आहे ! देखणा,तितकाच हिंस्त्र.. वाघोबाकाकांचा मूड अगदीच खराब होता! जरा वृद्ध होता किंचित.. पण तरी चेहर्‍यावर अती-हिंस्त्र भाव! किती लांबून बघत होतो आम्ही, तरी भेदरलो होतो! वाघ नुसता इकडून तिकडे अस्वस्थपणे फेर्‍या मारत होता! या टोकापासून त्या टोकापर्यंत.. उकाड्याने हैराण झाला अस्णार.. जिभ बाहेर काढून नुस्ता हाफ हुफ करत होता! नुसताच इकडून तिकडे फिरणार्‍या वाघाला पाहून लोकांनी पण दंगा करायला सुरवात केली.. जरा गप्पा, गोंधळ व्हायला लागला.. आणि वाघाने जी काही डरकाळी फोडली ना!! Ohh Myy Godd !! थिजून जाणे कशाला म्हणतात ते कळले.. लागोपाठ ७-८ डरकाळया फोडल्यावर मग जरा वाघ शांत झाला.. आणि… आमच्या समोर येऊन थांबला क्षणभर ! मी त्याच्या पर्फेक्ट समोर होते.. मधे तसं म्हटलं तर काहीच नव्हतं! पाण्याचा ओढ्याटाईप होतं.. आणि जरा चढावर गवत.. वाघाच्या अन माझ्या नजरेची एक क्षण नजरानजर झाली.. ! ऐकलं होतंच, अनुभवलेही… वाघाच्या नजरेत नजर मिळवली की तुम्ही एक क्षण संमोहीतच होऊन जाता! काय देखणा प्राणी! म्हातारपणीही हॅंडसम दिसत होता! :)

जागोजागी ब्रेक म्हणून माकडं होती.. इतकी माकडं पाहीलीयेत बापरे ! जगात माकडांची संख्या काही कमी नाहीये म्हणजे ! पुढे माउंटन तापिर नावाचा डुक्कर प्लस अस्वल असा दिसणारा प्राणी दिसला.. गलिच्छ वाटला! :( (सॉरी तापिर !! )

नंतर स्नो चिताह खिडकीत आपल्या कमी होणार्‍या लोकसंख्येचा विचार करत ध्यानमग्न असा बसला होता! तो इतका दुख्खी वाटला की काय विचारायची सोय नाही! २००० च उरलेत आता आख्ख्या जगात!
त्याच्याशेजारी अस्वल होतं.. त्याचं काय चालले होते ते शेवटपर्यंत कळले नाही! इकडून तिकडे.. मग गुहेत.. मग परत भिंतीच्या कडेकडेने! काय बोर होत असेल ना प्राण्यांना तिथे ??

अस्वलाच्या शेजारी तळं होतं… आणि त्यात दोन पक्षी उगाच फिरत होते ! म्हटलं यांच्या साठी आख्खं तळं?? मग नंतर दिसला.. भिंतीला टेकून पहुडलेला हिप्पो !! आईग.. किती ते वजनदार प्रकरण! नाक,तोंड फार बेक्कार असतं ब्वॉ हिप्पोचे ! जरा नीट पाहीले तर त्याच्या डोळ्यातून पाणी येत होते! :( काय कारण असेल हिप्पो रडण्याचे ??? I could not think of any reason.. शेवटी त्याला Don’t cry, be happy असं म्हणून निघाले ! त्याच्याकडे बघून कझिनचा नवरा म्हटला शरद पवारांची आठवण येतीय !! लोल !!

मग नंतर ..अरे देवा ! चिंपांझी! त्यांचा मोठ्ठा पिंजरा होता! आणि त्यात आधी आम्हाला ३ चिंप्स दिसले.. नंतर एक एक वाढून चक्क १०-१२ चिंपांझी आले ! केसाळ बुटकी माणसं जमल्यासारखीच वाटत होती.. नंटर काय झालं माहीत नाही, ते सगळे माणसांसारखेच भांडू लागले! २ जण बहुतेक बाकीच्यांना घाबरवत असावेत ! कोणीही खेळायच्या एरिआत आले की ते २घं त्यांना पळवून लावायचे आरडा-ओरडा करून! बापरे… तो फार्स अर्धा तास बघत बसलो आम्ही!! मजा आली! त्यांची भाषा समजली असती तर भांडणाचे कारणही कळले असते! .. असो…

मग पुढे जिराफांची फॅमिली पाहीली… उंचच उंच… उंच लोकांना एक superiority complex अस्तो.. तसाच त्यांनाही वाटला.. सगळे इतके शायनिंग मारत फिरत होते ना मान ताठ ठेऊन !! त्यातल्या त्यात एक जिराफ-पिल्लू बुटकं होतं! मला मग तेच आवडलं!! :))

नंतर सफारी शटल मधून उगाच चकरा मारल्या.. ऑस्ट्रीच, उंट, कांगारू , हरणं इत्यादी प्राणी पाहीले आणि आलो घरी!!

संपला माझा “प्राणीसंग्रहलायातील एक दिवस” वरचा निबंध!! :D

Popularity: 10% [?]

कॉलेजचे भन्नाट दिवस!

Tags:

ह्म्म.. कालच अमेरिकेतल्या माहेराहून घरी परतले..
इतक्यात काही भारतात जायचे प्लॅन्स नसल्याने हे आगळे माहेरपण अनुभवले!
जाम मजा आली.. आईबाबा, भाऊ-वहिनी बरोबर धमाल, गप्पा, भाच्याबरोबर दंगा-मस्ती-नाच-गाणी! :) , शॉपींग आणि खादाडी, दुपारच्या झोपा! एकदम पर्फेक्ट व्हेकेशन होती! :)

का कोण जाणे, पण या वास्तव्यात मला सारखे माझे कॉलेजचे जीवनच आठवत होते!
खूप दिवसांनी आई बाबांबरोबर होते म्हणून असेल..

“माझे इंजिनिअरिंगचे दिवस!” :) गाथा होईल याची लिटरली!

अस्मादिक तसे डोक्याने बरे असण्यापेक्षा नशिब बलवत्तर असल्यानेच बर्‍याच गोष्टी मिळवू शकले..
त्यातली एक इंजिनिअरिंगची डिग्री! :D
(मैत्रिणींना हे पटायचे नाही! त्यांना वाटायचे मी ’भयंकर’ अभ्यासू आहे! आणि त्यांना न सांगता मी रात्र रात्र अभ्यास करते वगैरे! lol.. )
खरं सांगायचे तर मी कधीच अभ्यास केला नाही!! नाही म्हणायला आई आवर्जून मी पहिलीत असताना कशी स्वत:हून अभ्यासाला बसायचे, कवीता म्हणायचे इत्यादी सांगते.. अर्थातच ती तिथेच थांबते.. बहुदा मी नंतर अभ्यास केला नसावा! हेहे..

शाळेत मी तशी बडबडी आणि शांत(किंवा शिष्ठ!) अशी दोन्ही अर्थांनी प्रसिद्ध.. म्हणजे जे ओळखीचे आहेत त्यांच्याशी अखंड बडबड करणार! पण नव्याने ओळखी करून घेण्याच्या नावाने बोंब.. तो एक फॉल्ट माझ्यात अजुनही आहे! मी संवादामधे खूप कमी पडते.. पण कोणी स्वत:हून आले माझ्याशी बोलायला की यूहू! स्वारी खुष! मग अगदी घरी बोलवणार त्या व्यक्तीला.. असो..
तर शाळेत मी अशीच प्रसिद्ध (असावे कदाचित).. हुषार वगैरे काही संबंध नाही! :)

तिथून मग ११वीला आले शेजारच्याच कर्नाटक शाळेत.. हो, ती ११वीलाही शाळाच होती! आख्ख्या ११-१२वीमधे मी १किंवा २ दा लेक्चर्स बंक केले.. :( फारच वाईट झाले! जाऊदे..
शाळा असली तर ढिंक्च्यॅक होती एक्दम! सगळे फाड फाड विंग्रंजी, डायरेक्ट तर्खडकरांच्या घरून आल्यासारखे बोलायचे! :| मराठी मिडीयम (समाधानासाठी म्हणायचे सेमी इंग्लिश मिडीयम! ) मधून आलेली मी.. जाम बावचळले होते! कसं होणार या ठिकाणी, सतत चिंता.. पण तिथेही मजाच झाली!
पहील्याच दिवशी कॉलेज सुटल्यावर .. चिखल लागलेल्या जिन्यावरून धडधडत धपाक्कन मी खाली! अशा रितीने माझी , माझ्या बॅचमेट्सशी ओळख झाली! हेहेहे.. काय पण फिल्मी!
तेव्हा अजुन एक किस्सा झालेला.. माझे केस अतिशय कुरळे आहेत.. तेव्हा माझा शॉर्ट मश्रुम कट असायचा.. मी प्रचंड सडपातळ होते! (हाय रे देवा तशीच का नाही राहीले! :( ) जीन्स टीशर्ट शिवाय दुसरे कपडे मी कधीच घालत नाही! तेव्हाही नाही, आजही नाही.. तर, मला कोणीतरी चक्क मुलगाच समजले होते! धमाल आली होती! आख्खा क्लास हसून लोटपोट.. ! करमणूकच होते बहुतेक मी! :D

असो.. तर सांगायचा मुद्दा हा की, अभ्यास जरा दुय्यमच प्रकार माझ्यासाठी.. पण येस.. नशिबाने मला जोरदार साथ दिली! जे मी वाचायचे ते १००% लक्षात राहायचे.. त्यातलेच ७०-८०% पेपरमधे यायचे.. झाले ना ७०-८०% मार्क्स! :)) अशा रितीने १२वी संपली!
१२वी नंतर मी खूप म्हणजे खूपच कॉन्फिडंट होते.. इंजिनिअर होणार! तेही कंप्युटर! ११-१२वीला व्होकेशनल म्हणून कंप्युटर्सच होते म्हणून बरे.. बरेच काय काय शिकले.. तो एक विषय आवडीने शिकले बुआ.. बेसिक पास्कल सारख्या भाषा शिकले होते! त्या बाईंचा चेहरा आठवतोय , नाव विसरले.. पण त्यांनी क्लासला फ्लॉपी कशी चालवायची इथपासून शिकवल्याचे आठवतंय! Lol.. ! १०वी पासून माझ्या घरात इंटरनेट असल्याने त्या क्लासला मात्र मला जरा पुढे पुढे करता आले! :D
एकंदरित.. ११-१२वी हा सुवर्णकाळ होता! मला कधीही न मिळालेल्या जीवाभावाच्या मैत्रिणींचा ग्रुप मिळाला! मी,प्री,मिथू,अमृ,योगी आणि स्मि! आम्ही ६ जणींनी जी काय धमाल केली आहे त्याला तोड नाही! २-३ वर्षं नुस्ता धिंगाणा केला होता! नंतर अमृ गेली रशियाला, मिथु US ला, प्री.. गा-य-ब ! मग स्मि,योगी आणि मी प्रत्यक्ष कॉन्टॅक्टमधे राहीलो.. तर मिथू अन माझी मैत्री ३०-४०Kb च्या इमेल्समधून बहरली! :) माझ्याच कॉलनीत राहणारी ही मुलगी मला कर्नाटकला ११वी मधे भेटली! :)) असो.. तिच्यावर,माझ्या प्रत्येक मैत्रिणीवर स्वतंत्र पोस्ट होईल.. !

१२वी झाल्यावर बाबांना काही केल्या खात्री वाटत नव्हती की मला इंजिनिअरींगला ऍडमिशन मिळेल.. ते सारखे मागे लागले.. BCS ची एन्ट्रन्स तरी देऊन ठेव.. मग शेवटी मी म्हटलं ठीके.. पण तेव्हा (परत )
नशिबानेच स्मि,रम्या,आणि सुवी या माझ्या मैत्रिणी फर्ग्युसन मधे बीसीएसच्या क्लासला जाणार होत्या! मीही मग पळत त्यांना जॉईन झाले! ते २ महीने आहा होते ! तसा अभ्यास होता.. पण त्या परिक्षेला काही माझ्या दृष्टीने महत्व नसल्याने अभ्यास (तिथेही) नाही केला.. नुस्ती धमाल! सकाळी ८ ला बाबा सोडायचे फर्ग्युसन मधे.. दुपार पर्यंत लेक्चर्सला बसून थोडा अभ्यास जास्त टाईमपास.. मग ३ का ४ वाजता आधी फर्ग्युसन पासून डेक्कन पर्यंत चालत.. मग तिथून कर्वे रोड पर्यंत टमट्मने.. आणि कर्वे रोड पासून घरी परत चालत!
एव्हढे कष्ट मी एरवी नक्कीच घेतले नसते… केवळ फर्ग्युसन म्हणून! काय क्रेझ होती फर्ग्युसनची! माय गॉड!

असो.. यथावकाश नशिबानेच BCS एन्ट्रन्सला उत्तम मार्क पडून देखील मी इंजिनिअरिंगला MIT मधे दाखल झाले.. अंहं.. MIT Womens! फर्ग्युसन मधून मुलींच्या कॉलेजमधे म्हणजे जामच अधोगती! हेहे.. चालायचेच.. इंजिनिअरिंगसाठी वाटेल ते!

- क्रमशः ..

———————————————————————–——
हे क्रमशः उगीच ! जनरली मला सगळं एकटाकी लिहून काढायला आवडते.. पण हे फारच मोठे होतेय.. वाचायला कंटाळा येतो .. त्यामुळे इंजिनिअरिंगच्या गमती-जमती नंतर !
—————————————————————————–

Signature2

Popularity: 14% [?]

Get Adobe Flash playerPlugin by wpburn.com wordpress themes

© 2009 माझे विचार…. All Rights Reserved.

This blog is powered by Wordpress and Magatheme by Bryan Helmig.