सॅच्युरेशन… इंटरनेट, ब्लॉग्स, टेम्प्लेट्स,कमेंट्स, नवीन ब्लॉगपोस्टचा विषय… … अजीर्ण झालंय अगदी. हल्ली काही म्हणजे काहीच सुचत नाही लिहायला. अगदी “काहीही” सुद्धा नाही! जवळजवळ रोजच हे पान उघडून बसतीय. पण एक शब्द देखील उमटत नाहीये. विचित्रच फेज म्हणायची ही. अचानक असे वाटू लागलेय, डोक्यात येणारा प्रत्येकच विचार हा कागदावर लिहीण्याची गरज नसते. किंवा प्रत्येक गोष्ट, आवडती [...]
परवा मिथूशी फोनवर बोलताना अपरिहार्यपणे विषय ११वी – १२वी पाशी आला. मग कलमाडी ज्युनियर कॉलेज, आ्मचा ग्रुप असा फिरत फिरत अपरिहार्यपणेच SSK पाशी आला… SSK ? काय आहे हे SSK?? तर , ते आहेत आमच्या सरांचे नावाचे इनिशिअल्स. S.S.Kulkarni ! Sunil S. Kulkarni ! इंजिनिअरींगला ऍडमिशन घेतली. सगळी नव्याची नवलाई संपली आणि थोड्याच दिवसात काहीतरी [...]
काही दिवसांपूर्वी मी स्मॅशिंग-मॅगझिनवर ४०४ पेजेस बद्दल वाचले होते. तेव्हापासून हा विषय डोक्यात घोळत होता.. या विज्ञानयुगात ज्याला कंप्युटर, एचटीएमएल यांचे ज्ञान नाही त्या माणसालाही आता ४०४ पेज माहीत असेल. 404 Error : Page Not Found
अमेरिकेतल्या आणि एकंदरीतच रिसेशनवर, माझ्या आईने संक्रातीच्या दरम्यान केलेली कवीता.. आली आली संक्रांत आली..पण यावेळेला मात्र नेहेमीपेक्षा जरा लवकरच आली…कोणत्या देशावर आली .. कोणत्या बाजूने आली?कशावर आली?? अहो, अमेरिकेवर संक्रांत आली, लेहमनच्या दिशेने आली..Auto Industry वर संक्रांत आली..शेअर मार्केटवर संक्रांत आली..कित्येकांच्या नोकरीवर गदा आली..ज्या घरांचा भक्कम आधार होता, त्या घरांवर गदा आली..घर सोडून बाहेर राहायची [...]
आठवड्यावर दिवाळी येऊन ठेपली आहे.. इथे काय साजरी करणार? पण तरीही लोकांनी हॅलोविन साठी केलेलं लायटींग हे दिवाळीसाठीचे आहे असं समजून घेत आहे.. तेव्हढंच उत्सव आलाय असं वाटेल.. लग्नानंतरची पहिली दिवाळी म्हणजे तर मज्जाच असायला पाहीजे.. पण पडलो इथे, इतक्या लांब.. मग कसली मजा.. दिवाळी कशी सगळ्या गोतावळ्यात साजरी केली पाहीजे.. आई बाबा, नातेवाईक, नातेवाईकांचे [...]
बर्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर ब्लॉगवर काहीतरी लिहीतीय.. खरतर, परवा मराठीब्लॉग्स. नेट वर ब्लॉग वाचताना मला आठवलं की आपला पण एक ब्लॉग आहे.. आणि तिथे आपण काहीबाही खरडत असतो.. तुरळक कमेंट्स येतात्,त्या अर्थी काही लोकं तो ब्लॉग एकेकाळी वाचतही असत.. खरच, गेले काही महीने इतके धावपळीचे गेले की मी विसरून गेले होते ब्लॉग्-बिग.. (अर्थात, लग्न झाल्यावर कुणाला [...]
पहिले पोस्ट….. !! www.marathiblogs.com वरचे ब्लॊग्स पाहून आपणही ब्लॊग लिहावा अशी बरेच दिवस मनात इच्छा होती, पण धाडस होत नव्हतं. सगळेच इतकं सुरेख लिहीतात की आपलॆ पोस्ट कोण वाचणार ही शंका.. तरीही काहीतरी लिहायची इच्छा झाली तर असु द्यावा म्हणून हा खटाटोप.. लवकरच इथे काही (पब्लीश करण्याजोगं) लिहीता येईल अशी आशा करते ! तोपर्यंत टाटा.. [...]







