माझे विचार... » Uncategorized

SSKचे दिवस ! :D
परवा मिथूशी फोनवर बोलताना अपरिहार्यपणे विषय ११वी – १२वी पाशी आला. मग कलमाडी  ज्युनियर कॉलेज, आ्मचा ग्रुप असा फिरत  फिरत  अपरिहार्यपणेच SSK पाशी आला…

SSK ? काय आहे हे SSK??  तर , ते आहेत आमच्या सरांचे नावाचे इनिशिअल्स. S.S.Kulkarni ! Sunil S. Kulkarni !

इंजिनिअरींगला ऍडमिशन घेतली. सगळी नव्याची नवलाई संपली आणि थोड्याच दिवसात काहीतरी भयंकर नावं कानावर पडू लागली! M1, Graphics, App-mech इत्यादी. या सर्व विषयांना क्लास मस्ट आहेत असे हुषार मैत्रिणींकडून समजले. काही तर चक्क जाऊ सुद्धा लागल्या होत्या! आम्ही (म्हणजे मी, मिथू वगैरे) , इंजिनिअरिंगला तेही आवडत्या Computer Engineering ला ऍडमिशन मिळाल्याच्या आनंदात आणि एव्हरेस्ट सर केल्याच्या आविर्भावात बसलो होतो. परंतू सुवीने ऑल्रेडी क्लासेस सुरू केलेत म्हटल्यावर आम्हाला पण टेन्शनच आले. व चौकशा करून आम्हीही पैसे घेऊन गेलो SSK सरांच्या क्लास मधे ! ( आधी वगैरे पैसे भरल्याचे मला आठवत नाहीये , डायरेक्ट पहील्या दिवशी पैसे घेऊन गेलो..   )

आयडिअल कॉम्प्लेक्स !

आमच्या MIT कॉलेजच्या अगदी जवळ , आजूबाजूला भरपूर कट्टे, चहा, कॉफ्या प्यायच्या टपर्‍या, शेजारी ’झेस्ट’ नावाचे अतिशय उच्चभ्रू कॉफी हाउस आणि कॉम्प्लेक्सच्या खालीच “आई गं… ! “   नाही, मी नाही ओरडते.. आई गं , नावाचे चाट -जॉईंट होते ते.. चाट – जॉईंट ? फार मोठं नाव झाले.. त्याला आई गं च म्हणूया! तेच बेस्ट ! इतके सगळे पथ्यावर पडणार्‍या गोष्टी दिसल्यावर क्लास आवडायलाच पाहीजे ! मग सर कसे शिकवतात वगैरे राहीलं बाजूला ! पैसे भरून क्लास पक्का करून टाकला. पण बॅच कुठली मिळावी ? सकाळी ६.३० !! अरे देवा.. सकाळी ६.३० वाजता कोण्तरी इंजिनिअरिंग मॅथ्स १ शिकले असेल का? पण पर्याय नव्हता. आणि होकार भरला..

क्लासला जाण्यासाठी मिथू दुसर्‍या दिवशी सकाळी ६.१०ला वगैरे माझ्याकडे आली, तेव्हा मी झोपले होते !!   बाबांच्या हाकांना दाद न देत ढाराढूर झोपणे हा माझा जन्मसिद्ध हक्क असल्यासारखा बजावायचे मी! शेवटी  कसेतरी घाईत आवरून घराबाहेर पडायलाच वाजले ६.२५ ! संपलं.. पहील्याच दिवशी उशीर ? सर महाशिस्तीचे असले तर काही खरं नाही ! घाईघाईने पोचलो आयडिअल कॉम्प्लेक्सला.. तर खाली मोठ्ठा घोळका गाड्यांवर बसलेला..  जवळ जवळ पावणे सात वाजले तरी सर आलेच नव्हते. हुश्श, वाचलो बुवा आज ! असं म्हणायच्या आतच कळले की This is very normal !   SSK सर कधीच वेळेवर येत नाहीत !! आता आम्ही आ च वासला! म्हणजे काय? मग एव्हढं टाईट शेड्युल, सतराशेसाठ ब्रॅंचेस, सगळी कडचा पोर्शन संपवतात कसे सर ?? उत्तर मिळाले : That’s SSK !!

जरावेळात खरंच सरांची मरून स्कॉर्पियो आली. ड्रायव्हर दिसला, मागे कोणीच दिसेना ? म्हटलं म्हणजे काय आता? ड्रायव्हरसारखे दिसणारे सद्गृहस्थच एसेस्के आहेत की काय ? पण नाही! ते मागच्या सीटवर झोपले होते ..  )) बिल्डींगपाशी आल्यावर ताडकन उठून केस बिस नीट करून सर उतरले आणि मुलांमुळेच क्लासला उशीर होत असल्याच्या अविर्भावात कोणाएका कडे किल्ली देऊन सर्वांना वर क्लासरूममधे पिटाळले!!  ) क्लासरूममधे बसल्यावर चक्क  त्यांनी माईक काढला आणि बोलू लागले !!    पहीला धक्का हा! मॅथ्स शिकवायला माईक? बर्र… ते झालंच.. पुढचा धक्का म्हणजे चक्क विनोदी बोलत होते ते! आम्ही आपले हसतोय! तेव्हाच समजलं भारी मजा येणार या क्लासला!

सरांचे उशीरा येणं अगदी रोजचंच. सुरवातीला आम्ही दोघी वैतागायचो! पण उशीराच जावं म्हटलं तर नेमके त्या दिवशी सर वेळेत हजर ! वर काहीतरी कॉमेडी टोमणे ऐकून घ्या!   त्यापेक्षा लवकरच जाऊन गप्पा मारूया असा चांगला निर्णय आम्ही घेतला! त्यातून आमच्या ११-१२वीच्या गृपलाही सांगितले, एसेस्केलाच या, आयडियलच्या सकाळच्या बॅचलाच या! पण माझ्या घराच्या जवळ राहणारे योगिता,विशाल आणि वरूणच आले. बाकी लोक्स दुसरीकडे गेले. मग तर काय ! रोजच्या भरपूर गप्पा! सकाळच्या थंडीत कुडकुडत गॉसिपिंग करायला काय धमाल येते ते सांगूच नाही शकणार मी!   तरी आम्ही फार सज्जन मुलं. की बावळट म्हणायचे माहीत नाही! पण त्या गप्पांना बरोबर चहा असता तर अजुन मजा आली असती. पण असले खर्च निदान तेव्हा तरी व्हायचे नाहीत. आणि त्यातून एसेस्के नक्की कधी येतायत कोणाला ठाऊक??चहा प्यायला जायचो आणि नेमके यायचे ते..

खरं आता विचार केल्यावर वाटतं, एसेस्केंचे फक्त उशीरा येणंच लक्षात राहतंय. पण मुळात किती उत्तम शिकवायची कला होती त्यांच्याकडे?? माईक घेऊन, समोरच्या पहिल्या बाकड्यावर बसून, अमिताभाअरखी पांढरी फ्रेंच दाढी असलेले ते काहीतरी जोक्स टाकायला लागले की हशा उसळायचा अगदी ! त्यांची बरीच वाक्यं मी आता विसरले. पण एखाद्याने फालतू मिस्टेक केली की ते अगदी साधूच्या थाटात शाप देणार, तेही माईकवरून : “ए इंजिनिअर/टोणग्यांनो शाप देऊ का रे??” , ” तुझा एम१ ४ वेळा राहणार बघ!!”, “(फळ्यावर गणित सोडवत) एक-दोन-तीन-चार स्टेप्स मधे गणित पूर्ण!”  किंवा “हे मूल माठ आहे! “ कधी म्हणणार: ” कळतंय का टोनीलाल? की आयवा जातंय?” [ आयवा जातंय म्हणजे टॅन्जंट जातंय!!  ) ]

एरवी क्लासला उशीर झाला म्हणून फोन केला की सर म्हणणार : “अरे फ्लायोव्हरपाशीच आहे बघ, ५ मिनिटात येतो!” (येतात पाऊण तासानी).  बाकी बरीच या ओर्कुटच्या कम्युनिटीत आहेत. जरूर वाचा!  )

त्यांच्यामुळे मला एम१ कधीच अवघड वाटला नाही! अगदी हसत खेळत क्लास पार पडला, गप्पा-गॉसिपिंग झाले, क्लासमध्ये विनोद झाले, कधी कधी ते आम्ही गणित सोडवत असताना गाणंही  गुणगुणायचे!! I mean, I have never seen any teacher like this! VIT ला शिकवायचे वाटतं! आम्ही कायम म्हणायचो काय धमाल येत असेल कॉलेजमधे! त्यांच्याकडे किती गाड्या असतील हा आमचा नेहेमीचा कोड्यांचा प्रश्न!

खूप आनंदी दिवस होते ते! बघा ना, “मला” गणित कधीही न आवडलेल्या मुलीला कधीही एम१-एम२-एम३ ची भिती बसली नाही, एव्हढंच काय मी त्यात फक्त ४०वर पास न होता चक्क स्कोरही करू शकले म्हणजे काय म्हणायचे आता?? तेहि परिक्षेच्या आधी फक्त एसेस्केंची क्लासची वही वाचून जायचे! दॅट्स इट ! एव्हढं सोपं झाले होते.. हा आता कधी कधी अगदी रडकुंडीला आणायचे सर. पोर्शनच कम्प्लीट करायचे नाहीत. मग आम्ही मुलंच दमदाटी करणार, सर धावपळ करत सर्व ठिकाणांचा पोर्शन संपवू पाहणार. नेहेमी तो पूर्ण व्हायचाच असेही नाही! बरेच जण वैतागायचेही , पण आम्हाला राग असा कधी आला नाही! बहुतेक आम्ही ९०+ मार्कांची स्वप्नं पाहीली नाहीत ,त्यामुळे आमचे काही बिनसले नाही!

धम्माल होती पण! अजुनही आयडियल कॉम्प्लेक्स दिसले की हे सगळं आठवतं, इथे बसून तर त्या आठवणी येतातच! [ अजुनच मजा म्हणजे ग्राफीक्सचा क्लास आमचा तिथेच व्हायचा! व ते सर होते  JVK  !  J.V. Kulkarni ! पण त्यांच्याबद्दल नंतर कधीतरी! ]

Page Not Found ! :)
काही दिवसांपूर्वी मी स्मॅशिंग-मॅगझिनवर ४०४ पेजेस बद्दल वाचले होते. तेव्हापासून हा विषय डोक्यात घोळत होता..

या विज्ञानयुगात ज्याला कंप्युटर, एचटीएमएल यांचे ज्ञान नाही त्या माणसालाही आता ४०४ पेज माहीत असेल.

404  Error : Page Not Found

जेव्हा युझर आपल्या वेबसाईटवरील अस्तित्वात नसलेल्या लिंक्स टाईप करतो, किंवा सर्च इंजिन्स त्यांच्या कॅशमधून पूर्वी अस्तित्वात असलेल्या परंतु आत्ता नसलेल्या पानावर युझरला आणून ठेवतो, तेव्हा ही एरर दिसते. कस्टमाईझ न केलेल्या पेजवर नुसतीच एरर आणि ’पेज रिफ्रेश करा’ असा हुकूम असतो. परंतू चांगल्या वेबमास्टरने आपला युझर कोणत्याही परिस्थिती गमवू नये, त्याला कशात ना कशात तरी गुंतवून ठेवावे. त्यामुळे इंटरेस्टींग आणि क्रिएटीव्ह 404 पेजेस उदयास आली.

इथे अशी काही क्रिएटीव्ह उदाहरणे आहेत :

Smashing Magazine(1)     :  Wanted: Your 404 Error Pages

Smashing Magazine(2)     :  404 Error Pages: Reloaded

DollarShower.com            :  Custom 404 pages for WordPress theme

मी आज हे सगळं का लिहीतीय़??

कारण आज मी माझे या ब्लॉगचे 404 पेज डिझाईन केले. And I love it !

तुम्ही कुठलीही असंबद्ध लिंक टाकून चेक करू शकता उदा: www.swapnavishwa.com/mazevichar/rrr

किंवा येथे स्क्रिनशॉट पाहू शकता ..

तुम्हाला कसे वाटले हे पेज ?

तुम्ही जर ४०४ पेज कस्टमाईझ करू शकत असाल, तर ते कसे कराल ? काही कल्पना?

आईची कवीता.. संक्रांत..
अमेरिकेतल्या आणि एकंदरीतच रिसेशनवर, माझ्या आईने संक्रातीच्या दरम्यान केलेली कवीता..

आली आली संक्रांत आली..
पण यावेळेला मात्र नेहेमीपेक्षा जरा लवकरच आली…
कोणत्या देशावर आली .. कोणत्या बाजूने आली?
कशावर आली??

अहो, अमेरिकेवर संक्रांत आली, लेहमनच्या दिशेने आली..
Auto Industry वर संक्रांत आली..
शेअर मार्केटवर संक्रांत आली..
कित्येकांच्या नोकरीवर गदा आली..
ज्या घरांचा भक्कम आधार होता, त्या घरांवर गदा आली..
घर सोडून बाहेर राहायची वेळ त्यांच्यावर आली..

मोठी मोठी स्वप्नं त्यांची सत्यात नाही आली..
हा जय मग कोणाचा? श्रीमंतांचा की गरिबांचा?
आम्हाला केक मिळत नाही, मग तुम्हीही खाऊ नका म्हणणार्‍यांचा..
ओ! बा आणि माच ठरवतील भविष्यकाळ तुमचा..
समृद्धीचा देश तुमचा Currency सतत फिरवणार्‍यांचा..
पार्टीसाठी सुद्धा कर्ज काढणारा, पण चैनीत कमी नाही पडणारा!
सांभाळून रे बाबांनो..
एकवेळ जेवणाचे ताट द्या पण बसायचा पाट देऊ नका तुम्ही..
४ पैसे गाठीला ठेवा, टुकीने तुम्ही संसार करा..
मने तुम्ही साफ ठेवा.. मनाची श्रीमंती सांभाळून ठेवा..
आपल्याकडे आपण संक्रांत म्हणजे संक्रमण समजतो..
वाईट विचार हेवे दावे कटुता विसरून आपण जातो..
तीळाचा स्नेह गुळाची गोडी जपून आपण ठेवतो..
आणि म्हणूनच,
तीळगूळ घ्या थोडंतरी बोला..
तीळगूळ घ्या गोड-गोड बोला..
तीळगूळ घ्या खूप खूप बोला..

तुम्हाला हे पोस्ट आवडल्यास जरूर कमेंट्स लिहा..

एक उनाड पोस्ट! :D
माझ्या आख्ख्या ब्लॉग आयुष्यात मी अशी पोस्ट लिहायला कधी बसले नव्हते. म्हणजे, आज लिहायचं म्हणजे लिहायचचं करून! ते जे नेहेमीचं लिहीण्याबद्दल आतून वाटणं असतं त्या वाटण्याची फार वाट पाहीली. मग म्हटलं जाऊदे.. नेहेमीच असं कसं वाटेल. एकदा या ही वाटेला जाऊन पाहूया(वाट लावूया?  )

बरं, एक डिस्क्लेमर : डोक्यात काहीही ठराविक विषय नाहीए. मी आज काय घडलं, दिवस किती बोर गेला वगैरे सुद्धा लिहीण्याचे चान्सेस आहेत.. लोकांच्या रोजनिशी/दैनंदिनी वाचायला न आवडणार्‍यांनी आत्ताच एग्झिट घेतलेला बरा..  ) हा अती आगाऊपणा नसून नंतर मला जी मुक्ताफळं बसतील ती वाचवण्याचा प्रयत्न आहे!

ह्म्म.. वरच्या एग्झिट नंतरही काही वाचक असावेत असा एक गोड गैरसमज किंवा ओव्हर कॉन्फिडन्स मधे अजुनही लिहीतीय.. हरकत नाही.. निदान मी आणि माझी एक बहीण तरी नक्की वाचतील ही पोस्ट याची खात्री! म्हणजे झाले २ वाचक.. नॉट बॅड!

ही बहीणही माझी भारी आहे! नेहेमी मला विचारत असते की काय लिहीलंस, अजुन का नाही लिहीलंस.. आईशप्पथ काय भारी वाटतं राव! एकदम महान लेखिका झाल्याचं फिलींग येतं..  ))

तसं, कुणीही म्हटलं की हो तू लिहीलं होतंस त्यावर.. की झालं! मला खरंच वाटत नाही.. चक्क माझा ब्लॉग वाचतं कुणी??? माझं ना नेहेमीच कन्फ्युजन आहे हे.. म्हणजे, तसं पाहायला गेलं तर माझ्या प्रत्येक पोस्टला काय २०-३० कमेंट्स येत नाहीत. येतात २-४ त्यावर माझे रिप्लाय असं धरून ५-६ फार्फार्तर.. मग असं वाटतं , ह्यॅ: तसंही कुणी वाचत नाही.. मग लिहा काहीही! तसंही नाही करता येत.. मधूनच कुणीतरी मैत्रिण, आई बाबा, नाहीतर चक्क नवर्‍याचा चुलत भाऊ, नाहीतर काकू येऊन सांगते की छान लिहीतेस..    आता आली का पंचाईत! लिहायचं तर आहे.. लोकांनी वाचलं पण पाहीजे आणि खरंच वाचलं की कानकोंडं होतं! याला काय म्हणायचं ?? सगळा गोंधळ!

आज आम्ही एका कामानिमित्त १००० ओकची झाडं असलेल्या गावी गेलो होतो. तर तिथे जायचा आणि ओव्हरऑल आमचा सगळीकडे जायचा मेन रस्ता  US 101 मस्त ब्लॉक झालेला.. मग त्याच्या वाटेलाच न लागता सॅन्ता रोझा नी सिमिला गेलो.. तिथून बाहेर पडून दिसोटो ऍव्ह. घेतला.. तिथून शर्मन वे शोधायला अर्धा तास.. त्या मेन ऑफीस मधे आम्हाला लाईन मधून काउंटर वर जायला पाऊण तास..पुढे आम्हाला एंटरटेन केलं २० मिनिटांनी.. आणि एव्हढं करूनही काम झालं नाहीच!! आता बोला….

१ तासाच्या कामाला आख्खा दिवस गेला, आणि काम झालच नाही.. अस्सलं डोकं सरकलं होतं ना.. आम्ही दोघांनीही अशक्य चिडचिड केली… आणि मग बसलो शांत.. करणार काय नाहीतरी!

बाकीअसा दिवस गेल्यावर अजुन काही काम कधी होतं का..!?! बरेच दिवस काही वाचावं म्हणतीय.. (म्हणजे जरा अभ्यास कसा असतो ते आठवेल या दृष्टीने..) तर शक्यच होत नाहीये.. कॉन्सन्ट्रेशन नावाची चीज कुठे मिळेल? आणि ती कशी वापरायची? हे कुणीतरी मला सांगायची फार वेळ आलीय. एक तर हे नेटवरील पेपर/साईट्स वाचनामुळे, सलग, एकसंध भरपूर वेळ वाचायची सवयच गेली आहे हे मला एव्हढ्यातच लक्षात आलंय.. ! बाकी हे नेटवरील वाचनाचंही काही खरं नाही! पेपर एकवेळ ठीक आहे हो.. पेपर मधून राजकारण येणारच! पण आजकाल जे मराठी साईट्स वरून राजकारणाचे रंग दिसायला लागलेत.. ते पाहून माझी इंटरनेटवरील मराठी विरक्ती* जवळ आलीय हे समजतंय मला..  च्यामारी या लोकांना काय उद्योग आहेत की नाहीत? गपगुमान लिहा काहीतरी, कमेंट्स टाका.. इत्यादी करायचं सोडून.. हे संकेतस्थळ असंय, ते तसंय.. हा असं बोलला वगैरेसारखी इयत्ता पहीली तुकडी ब सारखी भांड्णं करतंय पब्लीक!

इंट्रेस्टच गेला.. आता खरंच काहीतरी क्रिएटीव्ह, किंवा निदान फ्रुटफुल असं एखादं काम करावं असं वाटतं.. त्याच मूडात येऊन या ब्लॉगचे डोमेन नेम चेंज केलं.. अजुन एक ड्रुपलवर आधारीत साईट काढली.. वेल, या संकेतस्थळांच्या गर्दीत नाही येणार ती नक्कीच.. ती माझी पर्सनल साईट असेल.. तसं ’मी’ ऍज सच काही केलं नाही पण लई भारी वाटतंय.. वेब होस्टींग,ड्रुपलचे सगळे कन्ट्रोल्स, थोडंफार पीएचपी शिकले..  खूप खूप दिवसांनी माय एस्क्युएल मधे काम केलं..

सो, ह्म्म.. जर्रा बरं वाटतंय.. ’काहीतरी’ केलं!  वर्षाची सुरवात चांगली झाली म्हणायची..!

अजुन खूप गोष्टी आहेत डोक्यात.. एखादं जाहीर पोस्ट लिहावं का संकल्पांवर? म्हणजे लाज वाटून पूर्ण होतील ते??  ) नॉट अ बॅड आयडीआ!

असो.. पुष्कळ बाष्कळ बडबड केली.. आता कल्टी.कॉम.. पुन्हा भेटू मंड्ळी.. (आय होप मी पुढ्च्या वेळी इतकं असंबद्ध पोस्ट नाही लिहीणार!  )

-भाग्यश्री..

* त.टी :  हा वाक्प्रचार हल्लीच वाचला एका साईटवर.. फुल्टू फिदा झालीय मी! म्हणून वापरलेला आहे.

आली दिवाळी!!!
आठवड्यावर दिवाळी येऊन ठेपली आहे.. इथे काय साजरी करणार? पण तरीही लोकांनी हॅलोविन साठी केलेलं लायटींग हे दिवाळीसाठीचे आहे असं समजून घेत आहे..   तेव्हढंच उत्सव आलाय असं वाटेल.. लग्नानंतरची पहिली दिवाळी म्हणजे तर मज्जाच असायला पाहीजे.. पण पडलो इथे, इतक्या लांब.. मग कसली मजा..

दिवाळी कशी सगळ्या गोतावळ्यात साजरी केली पाहीजे..  आई बाबा, नातेवाईक, नातेवाईकांचे फोन.. मित्रमैत्रिणी..

दिवाळीची सुट्टी लागली रे लागली की मी,स्नेहल,आदित्य,गजु-चिंटू असं आम्हा ५ जणांची तपासणी सूरू व्हायची.. कुठे चांगली माती आहे?? बांधकाम चालू आहे त्या बिल्डींगचे..  तिथे वीटा चांगल्या दिसतायत का कुठे? मी सगळ्यात लहान.. त्यामुळे आमचं काम लिंबू टिंबू.. उगीच आपलं मागे मागे फिरायचे..  ) मेन काम हीच लोकं करणार..
मग माती मिळाली मनासारखी की माझं काम सुरू.. चाळणी पैदा करायची घरातून , आणि चाळत बसायचं! काय छान मातीत लोळायला मिळायचं!
मग इकडे आमचे आर्किटेक्ट लोकं किल्ल्यांची रूपरेषा ठरवायचे.. मग हळु हळू २-३ दिवसात किल्ला साकारला जायचा.. कुणी डॉक्टर असेल तर त्यांच्या कडून इंजेक्शनची सिरींज मिळवून त्याचं कारंजं करायचे.. मावळे साठवलेले असायचेच मागच्या वर्षीचे.. दरवर्षी त्यात भर पडायची मग.. मोहरी टाकून पाणी घालून ठेवायचं.. ( हे प्रकरण आम्हाला कधी नीट जमलं नाही! नीट सलग उगवायचीच नाही!   ) मग नंतर, शिवाजी महाराजांना स्थानापन्न केलं जायचं.. नेहेमीचे घोळ व्हायचेच.. शिवाजी महाराजांपेक्षा शेतकरी किंवा कुत्रा मोठा वगरे.. पण तेव्हढं चालायचंच !

किल्ला छान तयार झाला की मग कॉलनीमधून चक्कर मारायची.. कुणाचा किल्ला बेक्कार आहे.. कुणाचा अज्जुन झाला पण नाही.. कुणाचा फार छान झाला तर म्हणायचं, मोठ्यांनी मदत केलीय वगैरे.. असं छान सगळ्या किल्ल्यांना निकालात काढून शेवटी आपलाच लै भारी करत घरी यायचो..  )

लहानपणी मी खूप झोपाळू होते.. (आत्ताही आहे.. फक्त आता ’खूप जास्त झोपाळू’ आहे!   )
मला सगळे माझे मित्र-मैत्रिणी चिडवायचे, की नरक चतुर्दशीला काही तू पहाटे उठणार नाहीस !
दरवर्षी आदल्या रात्री मी ’पण’ करायचे उद्या लवकर उठायचे.. आई बाबांना सांगायचे , मला ४ ला उठवा! मी सगळ्यात आधी फटाके लावणार..!

कसलं काय? कशी-बशी ६ ला उठायचे, आणि आवरून, अभ्यंग स्नान,ओवाळून, नट्टा पट्टा करून फटाके फोडायला ७.३० वाजायचे!  ) पण सगळ्यात धीट मी.. आदित्य तर फार घाबरायचा फटाक्यांना!  )  त्यामुळे मी येई पर्यंत कुणी सुतळी-ऍटम बॉंब फोडलेले नसायचे.. त्यातल्या त्यात स्नेहल आपली लवंगी आणि लक्ष्मी फटाके फोडणार..   फारफार तर माळ..
मस्तपैकी २तास फटाके फोडायचे.. मग आईच्या हाका सुरू.. सगळ्यांचं आवरून झालेले असायचे. मग कॉलनीतल्या विठोबाला आणि दशभुजा गणपतीला सहकुटुंब जाऊन यायचे.. छान नवीन कपडे घातलेले.. सक्काळी सक्काळी तो फटाक्यांचा टीपीकल वास.. रांगोळ्या, दिवे,आकाश-कंदील.. वाह.. काय वातावरण असायचे.. मग दर्शन झाले की हमखास शेजारच्या स्टॉलवर डोकावायचे..  खूप लहान असताना, चंपक,ठकठक, किशोर हे ठरलेले असायचे.. मोठं झाल्यावर काही आई-स्पेशल माहेर-मेनका तसेच भविष्यवाले दिवाळी अंक , आजोबांसाठी स्पोर्ट्स-स्पेशल दिवाळी अंक अशी खरेदी व्हायची!..

मग घरी येऊन मी निवांत झोपाळ्यात बसून पुस्तकं संपवायचे काम करायचे.. आतमधे आई फराळाची ताटं करायची.. बर्‍याचदा नरक चतुर्दशीला शेजारी असायचेच बरोबर.. एकत्र फराळ आणि कॉफी..
मग काय फुल्ल टीपी.. ! पण हे फक्त १२वी पर्यंतच.. मेल्या त्या इंजिनिअरींगवाल्यांना परिक्षा दिवाळी नंतर ठेवायला कुणी सांगितल्या गॉड नोज.. तेव्हा ते एक टेन्शन.. मला नाही आईला..

संध्याकाळी परत फटाके..! काय दिवस होते राव.. फुल मजा करा.. काही त्रासच नाही.. संध्याकाळपासून फटाके उडवायला सुरवात.. मग जरा फराळ-जेवणासाठी ब्रेक.. मग ते झालं की परत रात्री आतिषबाजी पाहायला गच्चीवर जमायचे..

नम्तर लक्ष्मीपूजन म्हणजे दुपारपासून गडबड.. ! माझी गडबड म्हणजे काय घालायचे.. कसं नटायचं!  ) आई आपली आवरतीय.. सगळं सामान काढून, कशी सजावट करायची वगैरेचा विचार करण्यात बिझी.. दर वर्षी आईचं वेगळं डिझाईन असायचं.. कधी फुलांच्या रांगोळीने सजवलंय तर कधी धान्यांच्या.. कधी देवीचा मुखवटा काढलाय तर कधी साधी ठीपक्यांची.. छान सगळे चांदीचे देव,भांडी बाहेर काढून ठेवलेली.. मग पूजा सुरू.. आरतीची वेळ आली की परत आमची फटाके फोडायची घाई.. तेव्हा आवर्जुन अगदी आत्ता-आत्ता पर्यंत मी भुईनळा नाहीतर भुईचक्र लावून यायचेच!
मग सगळ्या बिल्डींगमधे आमंत्रण करायला जायचं.. पूजा झाली, प्रसादाला या.. (हळदी-कुंकूच असतं ना ते?)
मग सगळ्या काकवा(काकूज) येणार.. मग आम्ही दोघी सगळीकडे जाणार.. सगळीकडचा फराळ तर खाल्लाच पाहीजे.. !
त्यातच पोट भरून जायचं.. मग रात्री दमून लवकर झोपून जावं म्हटलं तर सगळीकडे फटाक्यांची माळ लागलेली.. कधी कधी असह्य  व्हायचं.. ( आम्ही किती त्रास दिला असेल लहानपणी??)

मग पाडवा.. आई जाम खुष !   बाबांनी मस्त साडी घेतलेली असायची आईला.. मलाही काहीतरी.. मग बाबांना छान तेलानी चोळून चोळून मसाज करायचा.. काय ते छान सुवासिक तेल असायचे.. संध्याकाळी आजी -आजोबा बोलवून काहीतरी घेऊन देणार.. ठरलेला कार्यक्रम!
मग भाऊबिज!!!   मी खुष… दादा होता भारतात तोपर्यंत तो खूप खूप त्रास द्यायचा ओवाळणी द्यायला.. कधी कधी तर हातावर नुस्ताच सव्वा रुपया..   मग नंतर हळूच एखादा छान फ्रॉक(लहानपणी), सायकल्ची किल्ली(थोडं मोठं झाल्यावर), किंवा स्कुटीची किल्ली,अंगठी (इंजिनिअरींगला)  ठेवायचा!!
संध्याकाळी मामाकडे जायचं.. तिथेही कपिलला लुटायचं!   खादाडी करून घरी..

घरी आलं की सगळ्यात वाईट काम असायचं.. किल्ल्याच्या बोगद्यात ऍटम-बॉम्ब लावून तो फोडणं.. तेव्हा मात्र वाईट वाटायचं.. संपली दिवाळी…   उद्या-परवापासून सुरू तेच तेच रुटीन… किल्ला नाही, फटाके नाहीत,फराळ नाहि.. नवीन कपडे घालून मिरवणं नाही…मुळात सुट्टी नाही! म्हणजे सुट्टीमधलं कॅरम,पत्ते,व्हीडीओ गेम्स सगळं कटाप?? श्या दिवाळी अजुन मोठी का नसते वगैरे विचार …

काय छान दिवस होते ते.. आता काय, तो उत्साहच नाही राहीला.. मित्र-मैत्रिणीही जवळ नाहीत.. मुळात भारतातच नाही मग काय मजा? भारतात असते तरी ती मजा राहीली नाही हे खरंच.. गेल्या ४-५ दिवाळ्या अशाच गेल्या.. लहानपणच्ं फटाके उडवणे कमी झालं.. बंदच रादर.. मित्र-मैत्रिणीही पसरले.. मग काय मजा?

ह्म्म.. असो.. असं असलं तरी दिवाळी आहे ही!! आनंदाचा उत्सव..! छान फराळ करायला घेतलाय.. बेसनाचे लाडू करून संपत आले..   अजुन जमेल तसं करणारच सगळं..! लायटींगच्या माळा, पणत्या, दिवे सगळं आणून ठेवलं.. घर स्वच्छ करून ठेवलंय.. दिवाळीच्या स्वागताला छान तयार झालेय..

तुम्ही झालात?
तुम्हा सर्वांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!! ही दिपावली तुम्हा सर्वांना आनंदाची,भरभराटीची,सुख-समृद्धीची जावो!!

तुम्हाला हे पोस्ट आवडल्यास जरूर कमेंट्स लिहा..

पुनश्च हरि ओम!
बर्‍याच दिवसांच्या विश्रांतीनंतर ब्लॉगवर काहीतरी लिहीतीय.. खरतर, परवा मराठीब्लॉग्स. नेट वर ब्लॉग वाचताना मला आठवलं की आपला पण एक ब्लॉग आहे.. आणि तिथे आपण काहीबाही खरडत असतो.. तुरळक कमेंट्स येतात्,त्या अर्थी काही लोकं तो ब्लॉग एकेकाळी वाचतही असत..   खरच, गेले काही महीने इतके धावपळीचे गेले की मी विसरून गेले होते ब्लॉग्-बिग.. (अर्थात, लग्न झाल्यावर कुणाला आठवेल ब्लॉग वगैरे! )
हे ब्लॉग म्हणजे ओढवून घेतलेलं संकटच आहे! आता बघा ना, रोज काय कमी कटकटी आणि प्रश्न आहेत का? पोळ्यांचा आकार कसा सुधरायचा? .. मीठाचा अंदाज कसा बरोबर येईल..तसेच, गाडी चालवताना समोरून गाडी आल्यावर हॉर्न मारू की ब्रेक मारू? … समोरचा अमेरीकन काय बडबडतोय कधी कळेल? ….. याबरोबरच आता ब्लॉगवर काय लिहायचं हा प्रश्न आला.. बा़कीच्या प्रश्नांची उत्तरं कधी ना कधी तरी मिळतीलच( हो, मी इतकी वाईट नाहीय स्वयपाकात.. येईल हळू हळू.. ) पण ब्लॉगवर काय लिहायचं याचं उत्तर मला तरी कधीच मिळत नाही.. ( “मग लिहायचा कशाला?” म्हणू नका.. असं उगवत्या लेखिकेला नाऊमेद करू नये…!)
असो.. तर दिसामाजी काहीतरी लिहीत जावे.. निदान महीन्याकाठी तरी काहीतरी(काहीतरी’च’ नाही.. ) लिहीण्याचा संकल्प सोडला आहे मी… बघू किती फळाला येतोय.. निदान सुरवात तर झाली… अच्छा मंडळी…! भेटू परत…

तुम्हाला हे पोस्ट आवडल्यास जरूर कमेंट्स लिहा..

॥ श्री ॥
पहिले पोस्ट….. !!

www.marathiblogs.com वरचे ब्लॊग्स पाहून आपणही ब्लॊग लिहावा अशी बरेच दिवस मनात इच्छा होती, पण धाडस होत नव्हतं.   सगळेच इतकं सुरेख लिहीतात की आपलॆ पोस्ट कोण वाचणार ही शंका.. तरीही काहीतरी लिहायची इच्छा झाली तर असु द्यावा म्हणून हा खटाटोप.. लवकरच इथे काही (पब्लीश करण्याजोगं) लिहीता येईल अशी आशा करते ! तोपर्यंत टाटा..

तुम्हाला हे पोस्ट आवडल्यास जरूर कमेंट्स लिहा..