शनीवार उजाडला.. उजाडला कसलं उलटलाच म्हटले पाहीजे, तेव्हा आम्ही जागे झालो व आता कुठेतरी गेलेच पाहीजे भटकायला असे विचार सुरू झाले.. आधी विचार केला मस्त आवरून मालिबूला जाऊ, बीचवर वेळ घालवू व तेथील नेपच्युन’स नेट मध्ये जेवून भटकत भटकत परत येऊ. जसा प्लॅन तयार होईल तोच प्लॅन एक्झीक्युट करणे म्हणजे आमच्या दृष्टीने पाप असल्यासारखे वागतो [...]
आज मी खरंतर क्म्प्लीट वेगळ्या विषयावर लिहायला बसले होते. पॅशन्स, आवड्निवडी , माझी नाटकं, ऍक्टींग, डान्स, बॅडमिंटन, थ्रोबॉल.. हे सगळं आठवता शाळा आठवली.. मग अर्थातच माझे लहानपण असा आवडता विचार सुरू झाला.. मनातल्या मनात विचार करायचा कंटाळा आला, एकट्यानेच किती बडबडायचे ना? त्यामुळे म्हटलं (खोटा/व्हर्चुअल का असेना) कागद बराय. निदान मोनोलॉगच्या ऐवजी डायलॉग्स होतायत असे तरी [...]
फार सुंदर, अप्रतिम, संततधार, मुसळधार, धोधो वगैरे पाऊस पडतोय. रवीवारपासून शुक्रवार पर्यंत. रस्त्यावर तळी साचली आहेत.. जस्ट पुण्यातून परतल्यामुळे मला होमसिक वाटू नये म्हणूनच की काय असा पाऊस पडतोय. मी .. खिडकीपाशी बसून .. ते सर्व पाहतीय.. गेले ३ दिवस.. आणि पाहीन पुढील ३ दिवस.. पाऊस.. ! का मला वेड लागतं पाऊस पाहून काही कळत [...]
परवा मिथूशी फोनवर बोलताना अपरिहार्यपणे विषय ११वी – १२वी पाशी आला. मग कलमाडी ज्युनियर कॉलेज, आ्मचा ग्रुप असा फिरत फिरत अपरिहार्यपणेच SSK पाशी आला… SSK ? काय आहे हे SSK?? तर , ते आहेत आमच्या सरांचे नावाचे इनिशिअल्स. S.S.Kulkarni ! Sunil S. Kulkarni ! इंजिनिअरींगला ऍडमिशन घेतली. सगळी नव्याची नवलाई संपली आणि थोड्याच दिवसात काहीतरी [...]
’माझी भटकंती’ या विषयावर लिहायचे अशी जोर्रात दवंडी पिटवूनही बरेच दिवस काही लिहीणे झाले नाही.. कारण: प्रसिद्ध व तीच ती ठिकाणे टाळणे.. अमेरिकेवर इतक्या लोकांनी , इतकं लिहीलंय की पुढे कोणीच काही नाही लिहीले तरी चालेल खरं.. त्यामुळे पर्याय कमी जरी नसले तरी दुर्मिळ/कमी-प्रसिद्ध पर्याय शोधावे लागतात.. बर्याच दिवसांपासून खास मीना प्रभू स्टाईल फिरण्यासाठी ( [...]
आज एक फार वाईट गोष्ट घडली.. माझ्या ब्लॉगवरच्या निम्म्याहून अधीक विजेट्स आणि टुल्सना मला निरोप द्यावा लागला.. करणार काय दुसरं? खूप जणांनी सांगितलं.. थोडा स्लो झाला आहे ब्लॉग, लोड टाईम जास्त आहे इथपासून ब्लॉग लोड व्हायला तासन तास लागत आहेत अशा कमेंट्स आल्या मला.. मग निरोप दिलेलाच बरा.. मला स्वत:ला स्लो लोड होणार्या साईट्स बद्दल [...]
गायत्रीच्या ब्लॉगवर असं लक्षात राहीलेले/आनंदाचे क्षण असे पोस्ट पाहीले.. म्हटलं आपणही करावी यादी! फक्त आनंदाचेच असे नाहीत, लक्षात राहीलेले.. बघू किती आहेत असे क्षण! अगदी लहानपणापासून आठवायचे म्हटले, तर सगळ्यात आधी आठवते.. आई आणि बाबा मला सकाळी उठवायला यायचे तो क्षण! एकदम लाडाने उठवायला सुरवात व्हायची! काहीतरी लाडीक बोलत बसायचे.. तेव्हा मी जागी असूनही पडून [...]
ह्म्म.. कालच अमेरिकेतल्या माहेराहून घरी परतले..इतक्यात काही भारतात जायचे प्लॅन्स नसल्याने हे आगळे माहेरपण अनुभवले!जाम मजा आली.. आईबाबा, भाऊ-वहिनी बरोबर धमाल, गप्पा, भाच्याबरोबर दंगा-मस्ती-नाच-गाणी! , शॉपींग आणि खादाडी, दुपारच्या झोपा! एकदम पर्फेक्ट व्हेकेशन होती! का कोण जाणे, पण या वास्तव्यात मला सारखे माझे कॉलेजचे जीवनच आठवत होते!खूप दिवसांनी आई बाबांबरोबर होते म्हणून असेल..“माझे इंजिनिअरिंगचे दिवस!” [...]
सद्ध्या नॉस्टॅल्जिक होण्याचे दिवस आहेत बहुधा! मायबोलीवर फिरताना, आठवणीतले स्वर आणि सुगंध हा बुलेटीन बोर्ड दिसला.. आणि इतके वास आणि स्वर गर्दी करून दाटले!! सुगंध आणि आठवणींचे खरंच काहीतरी नातं आहे .. मागच्याच पोस्ट मधे मी ओल्या मातीच्या वासाने वेडी होऊन काहीबाही खरडले होते.. आता तोच वेडेपणा पुढे कंटीन्यु करते.. वास म्हटलं की मला आठवते [...]
पुण्यात वळीवाचा आणि आता मान्सूनचा पाऊस सुरू झाल्यापासून माझी इथे चलबिचल होत होती…पाऊस अत्यंत प्रिय.. आणि त्यातून पुण्याचा ! आणि मी पुण्यात नाही, असे पहील्यांदाच घडले.. ( खड्डे-बिड्डे नाही येत हो डोक्यात अशा वेळी!) इथेही वेळीअवेळी पाऊस पडत असतो.. पण रिमझिम.. एकदाच मुसळधार पाऊस झाला होता, माझा वाढदिवस होता तेव्हा.. काय आनंद झाला होता मला! [...]







