शनीवार उजाडला.. उजाडला कसलं उलटलाच म्हटले पाहीजे, तेव्हा आम्ही जागे झालो व आता कुठेतरी गेलेच पाहीजे भटकायला असे विचार सुरू झाले.. आधी विचार केला मस्त आवरून मालिबूला जाऊ, बीचवर वेळ घालवू व तेथील नेपच्युन’स नेट मध्ये जेवून भटकत भटकत परत येऊ. जसा प्लॅन तयार होईल तोच प्लॅन एक्झीक्युट करणे म्हणजे आमच्या दृष्टीने पाप असल्यासारखे वागतो [...]
एअर अँड स्पेस म्युझियममधून बाहेर पडलो आणि बाहेर येऊन थांबलो. या भागातून एक हॉप ऑन हॉप ऑफ बस टूर फिरत असते. म्हणजे कुठेही बसा, कुठेही उतरा. तिच्या स्टॉपला आम्ही थांबलो. कारण आता वेळ कमी पडत चालला होता! टूरचे ५६ डॉलर्स जास्त वाटले खरं, पण पायांवर तेव्हढा विश्वास बसत नव्हता! त्यामुळे थांब थांब थांबलो.. एकदाची बस [...]
रविवार सकाळ, दिनांक ६ सप्टेंबर .. सकाळी तसे आरामातच उठलो. खरंतर आमचा सकाळी ८लाच निघायचा प्लॅन होता. पण आम्ही आपले उठून आरामात गप्पा, चहा, कॉफी, ब्रेड ऑम्लेटचा नाश्ता असे करत बसलो होतो. शेवटी निघू निघू म्हणत १०-१०.३० ला घराबाहेर पडलो. मामा आम्हाला मेट्रो स्टेशनवर सोडणार होता, आणि मग तिथून पुढे आम्ही जाणार होतो.
दिनांक ४ सप्टेंबर २००९ .. मायबोलीचा गणेशोत्सव संपला ३ ला.. तरीही नंतरची कामं उरली होती.. ती व एकीकडे प्रवासाची तयारी करत होते… ४ ला रात्री ११ ची फ्लाईट होती .. थोड्यावेळाने माझ्या लक्षात आले की मी नुसतीच भराभरा इकडून तिकडे फिरतीय घरात.. पण काम काही उरकत नाहीये.. शेवटी गणेशोत्सवाच्या कामाचे नॉलेज ट्रान्स्फर केले व तो [...]







