माझे विचार…

विचारांना शब्दांत बांधायचा प्रयत्न !

SSKचे दिवस ! :D

Tags: , , , ,

ssk परवा मिथूशी फोनवर बोलताना अपरिहार्यपणे विषय ११वी – १२वी पाशी आला. मग कलमाडी  ज्युनियर कॉलेज, आ्मचा ग्रुप असा फिरत  फिरत  अपरिहार्यपणेच SSK पाशी आला…
SSK ? काय आहे हे SSK??  तर , ते आहेत आमच्या सरांचे नावाचे इनिशिअल्स. S.S.Kulkarni ! Sunil S. Kulkarni !

इंजिनिअरींगला ऍडमिशन घेतली. सगळी नव्याची नवलाई संपली आणि थोड्याच दिवसात काहीतरी भयंकर नावं कानावर पडू लागली! M1, Graphics, App-mech इत्यादी. या सर्व विषयांना क्लास मस्ट आहेत असे हुषार मैत्रिणींकडून समजले. काही तर चक्क जाऊ सुद्धा लागल्या होत्या! आम्ही (म्हणजे मी, मिथू वगैरे) , इंजिनिअरिंगला तेही आवडत्या Computer Engineering ला ऍडमिशन मिळाल्याच्या आनंदात आणि एव्हरेस्ट सर केल्याच्या आविर्भावात बसलो होतो. परंतू सुवीने ऑल्रेडी क्लासेस सुरू केलेत म्हटल्यावर आम्हाला पण टेन्शनच आले. व चौकशा करून आम्हीही पैसे घेऊन गेलो SSK सरांच्या क्लास मधे ! ( आधी वगैरे पैसे भरल्याचे मला आठवत नाहीये , डायरेक्ट पहील्या दिवशी पैसे घेऊन गेलो.. :) ) Read the rest of this entry »

Popularity: 90% [?]

वर्डप्रेसवर देखील गुगल फ्रेंड कनेक्ट!

Tags: , , , ,

वा.. हे छान झाले!

Google Official Webmaster Blog वाचत असताना कळले की आता कुठल्याही साईटवर तुम्ही गुगल फ्रेंड कनेक्ट टाकू शकता!मी लगेच ते टाकून पाहीले. २ मिनिटांचे काम होते फक्त!  पूर्वी फक्त ब्लॉगस्पॉटवरच टाकता येत होते. आता ते वर्डप्रेसवर टाकता आले.

गुगलच्या ऑफीशिअल ब्लॉगवर दिली आहे माहीती . तरी थोडक्यात इथे टाकते.

You will have to visit :  http://www.google.com/friendconnect and provide your information. It will generate an HTML code. You will have to add that code as a widget. I guess you can add HTML code in Text area. and that’s it! Smile

I hope it works for wordpress.com too..
Update : It does not work for wordpress.com blogs. :(

पूर्वी ब्लॉगरवर एकेकाळी ३९ फॉलोअर्स होते.. त्या सगळ्यांना गोळा केले पाहीजे इथे! :)
इथेच उजवीकडे आहे ते विजेट..  लोकहो, व्हा आता जॉईन त्याला! :)

-भाग्यश्री.

Popularity: 71% [?]

8 Movies I liked the Most

Tags: , , , , , , , , ,

आज मी माझे काही आवडते चित्रपट इथे नोंदवत आहे.. तशी लिस्ट खूप मोठी आहे. पण सद्ध्या इतकेच.

अगदी डिटेलवार Review लिहायला कधी वेळच नाही मिळाला आणि बेसिकली हे बरेचसे फेमस आहेत ! सो रिव्ह्यु लिहीण्यात काय पॉईंट ?

My Cousin Vinny :

आपल्या “कायद्याचे बोला” या मुव्हीचा ओरिजिनल ! अतिश्शय भारी आहे! माझ्या नवर्‍याला तर ह्याचे डायलॉग्स, त्या विनीच्या ऍक्सेंटसकट पाठ आहेत! माझेही होतील आता. इतक्या वेळेला लागतो टीव्हीवर, व आम्ही नेहेमी नेहेमी पाहतोच !! ( Rating : 5/5 )

Read the rest of this entry »

Popularity: 81% [?]

Page Not Found ! :)

Tags: , ,

काही दिवसांपूर्वी मी स्मॅशिंग-मॅगझिनवर ४०४ पेजेस बद्दल वाचले होते. तेव्हापासून हा विषय डोक्यात घोळत होता..
या विज्ञानयुगात ज्याला कंप्युटर, एचटीएमएल यांचे ज्ञान नाही त्या माणसालाही आता ४०४ पेज माहीत असेल.

404  Error : Page Not Found

Read the rest of this entry »

Popularity: 68% [?]

वेगळा ट्रॅक ..

Tags:

road1 [ I guess I have lost the tempo of writing about my East Coast trip,    which I was planning to finish ASAP.  त्यामुळे आता ती सिरीज कधीतरी नंतर  पूर्ण करीन मी..सद्ध्यातरी मी मनात येईल तसे लिहीणे फारच मिस करतीय! :D  त्यामुळे  आता काही दिवस मैदान मोकळे, विषयाचे बंधन नाही! :)]

ह्म्म… विषयाचे बंधन नाही ही चांगली गोष्ट आहे, पण एक तरी विषय पाहीजे ना डोक्यात? Read the rest of this entry »

Popularity: 60% [?]

Vonage World – एक सुवर्णसंधी !

Tags:

( शॉर्ट ब्रेक घेतीय जरा प्रवासवर्णनातून.. किटकॅट खाऊन घ्या तुम्ही तोपर्यंत  !!  :eat: )

भारताबाहेर राहणार्‍या लोकांना हे पोस्ट उपयोगी जास्त आहे.
भारतात कॉल करण्यासाठी तुम्ही काय वापरता? रिलायन्स, स्काईप, याहू वगैरे?
आम्हीही तेच करत होतो इतके दिवस. Read the rest of this entry »

Popularity: 58% [?]

अमेरिका पूर्वरंग – वॉशिंग्टन डीसी – कॅपिटॉल हिल ..

Tags: , , , ,

एअर अँड स्पेस म्युझियममधून बाहेर पडलो आणि बाहेर येऊन थांबलो. या भागातून एक हॉप ऑन हॉप ऑफ बस टूर फिरत असते. म्हणजे कुठेही बसा, कुठेही उतरा. तिच्या स्टॉपला आम्ही थांबलो. कारण आता वेळ कमी पडत चालला होता! टूरचे ५६ डॉलर्स जास्त वाटले खरं, पण पायांवर तेव्हढा विश्वास बसत नव्हता! त्यामुळे थांब थांब थांबलो.. एकदाची बस आली.. सरळ आत जाऊन बसायच्या ऐवजी आम्ही त्या गाईडला विचारले की भाऊ कशी जातीय ही बस? तर नेमकं त्यांचे व्हाईट हाऊस पाहून झाले होते.. आम्हाला तर ते पाहायचेच होते! मग आम्ही त्यालाच विचारले, बाबारे कसे जाऊ आम्ही? आजचेच ३-४ तास आहेत आमच्याकडे.. सगळं शक्यतो बघायचे आहेच. त्यानेच सांगितले, मेट्रोने फिरा. जास्त स्वस्त जाईल. या टूरमधे पैसे खूप जातील व व्हाईट हाऊस नाहीच! Read the rest of this entry »

Popularity: 34% [?]

अमेरिका पूर्वरंग – वॉशिंग्टन डीसी १

Tags: , , , ,

रविवार सकाळ, दिनांक ६ सप्टेंबर .. सकाळी तसे आरामातच उठलो. खरंतर आमचा सकाळी ८लाच निघायचा प्लॅन होता. पण आम्ही आपले उठून आरामात गप्पा, चहा, कॉफी, ब्रेड ऑम्लेटचा नाश्ता असे करत बसलो होतो. शेवटी निघू निघू म्हणत १०-१०.३० ला घराबाहेर पडलो. मामा आम्हाला मेट्रो स्टेशनवर सोडणार होता, आणि मग तिथून पुढे आम्ही जाणार होतो. Read the rest of this entry »

Popularity: 33% [?]

अमेरिका पूर्वरंग – बाल्टीमोर ..

Tags:

सकाळी ७  वाजता बाल्टीमोर एअरपोर्टवर आमचे विमान उतरले. विमान उतरायच्या आधी वरून दिसणारी हिरवळ पाहून नाही म्हटले तरी डोळे जरा विस्फारलेच गेले! कॅलिफॉर्निया म्हणजे तसा दुष्काळीच भाग! उजाड पिवळे डोंगर, पामची झाडं आणि सतत समुद्र.. त्यामुळे पिवळा व नीळ्या रंगांचेच अधिपत्य! इथे दूरवर पसरलेला हिरवागार रंग फार फार सुरेख वाटला त्यामुळे ! Read the rest of this entry »

Popularity: 48% [?]

अमेरिका पूर्वरंग : १ – पळापळा कोण पुढे पळे !!!

Tags: , , , ,

दिनांक ४ सप्टेंबर २००९ ..
मायबोलीचा गणेशोत्सव संपला ३ ला.. तरीही नंतरची कामं उरली होती.. ती व एकीकडे प्रवासाची तयारी करत होते… ४ ला रात्री ११ ची फ्लाईट होती .. थोड्यावेळाने माझ्या लक्षात आले की मी नुसतीच भराभरा इकडून तिकडे फिरतीय घरात.. पण काम काही उरकत नाहीये..
शेवटी गणेशोत्सवाच्या कामाचे नॉलेज ट्रान्स्फर केले व तो अध्याय संपवला..

आता फुल्टू बॅगा भरणे वगैरे काम करूया म्हणून लिस्ट करायला घेतली… हसू नका! मी अहोरात्र लिस्टा करत असते..

Read the rest of this entry »

Popularity: 40% [?]

Get Adobe Flash playerPlugin by wpburn.com wordpress themes

© 2009 माझे विचार…. All Rights Reserved.

This blog is powered by Wordpress and Magatheme by Bryan Helmig.