परवा मिथूशी फोनवर बोलताना अपरिहार्यपणे विषय ११वी – १२वी पाशी आला. मग कलमाडी ज्युनियर कॉलेज, आ्मचा ग्रुप असा फिरत फिरत अपरिहार्यपणेच SSK पाशी आला…
SSK ? काय आहे हे SSK?? तर , ते आहेत आमच्या सरांचे नावाचे इनिशिअल्स. S.S.Kulkarni ! Sunil S. Kulkarni !
इंजिनिअरींगला ऍडमिशन घेतली. सगळी नव्याची नवलाई संपली आणि थोड्याच दिवसात काहीतरी [...]