नमस्कार वाचकहो.. !
गेले दोन वर्ष तुम्ही हा ब्लॉग वाचत आहात. सुरवात जरा चाचपडत झाली, पण नंतर मात्र मी ही खूप ब्लॉगींग केले व व्हीजिटर्स, रेग्युलर रीडर्सही खूप मिळाले या ब्लॉगला.. ह्म्म, आता ब्लॉगींग केले म्हणजे फार काही दर्जेदार साहीत्य प्रसवले अशातला भाग नाही.. पण मनात येईल ते लिहीत गेले व लोकांना ते आवडले.. मी अशी ब्लॉगींग बंद करणार असल्याच्या थाटात काय बोलतीय ??
बंद करतीय़.. पण तो ब्लॉगरने होस्ट केलेला ब्लॉग.. ब्लॉगींग नाही.. :)
काही दिवसातच मी सेल्फ होस्टेड ब्लॉगवर स्थलांतर करत आहे. ऍक्चुअली ट्रान्स्फर जवळपास झालेही आहे. परंतू मला व्हीजिटर्सना धाडकन दुसर्या साईटवर आणून सोडायचे नाही, त्यामुळे ही पोस्ट..
काही महत्वाच्या सूचना :
- स्वत:चे डोमेन मिळाल्याने मी आता co.cc हे फुकटचे डोमेन वापरणार नाहीये. त्यामुळे हा ब्लॉग bhagyashree.co.cc या पत्त्यावर काही दिवसांनी उपलब्ध नसेल..
- परंतू, तो मूळ ब्लॉगरच्या पत्त्यावर नक्कीच असेल.. काही दिवसांनी नवीन साईटवर होणारे Redirect हे मूळ पत्त्यावरून होईल.. मूळ पत्ता : bhagyashreee.blogspot.com
काही घडामोडी :
- “माझे विचार” सुरू करायच्या आधी मला लिहीणे माहीत नव्हते.. ! मी स्वत:च्या दोन ओळी देखील कधी लिहू शकले नाही.. ते इथे सुरू झाले त्यामुळे मी ब्लॉगरची आजन्म ऋणी राहीन ! :)
- पहील्याच पोस्टला आलेल्या ३३ कमेंट्स ! हा आकडा नंतरच्या कुठल्याही पोस्टला आला नाही! :)
- आत्तापर्यंत झालेल्या व्हीजिट्स : ९,४५४ .. अजिबात रेग्युलर्ली लिहीत नसताना इतकी वाचक संख्या हे चांगले लक्षण वाटते..
- व्हीजिट्स जरी असल्या तरी बाउंस रेट कमी आहे(जवळपास ३०%) ही मूळ आनंदाची गोष्ट ! लोकं ब्लॉगवर क्लीक करून निघून जात नाहीएत तर त्यांना वाचण्यासारखे काही ना काहीतरी इथे मिळतंय ही सुखाची बाब आहे..
- Alexa Rank! : ही रॅंक तुम्हाला म्हणजे तुमच्या साईटला आख्ख्या जगात कितवा नंबर आहे हे सांगते.. जुन महीन्यापूर्वी असलेला नंबर होता : 6,634,000 च्याही पुढे ! मात्र केवळ २-३ महीन्यात तो आला : 1,530,460
- RSS Subscribers : सुरवातीला २५-३० वर स्थिरावलेला आकडा सद्ध्या ६४ वर नांदतोय!
- Google Page Rank : ही कायमच १ वर स्थिरावली होती ती अलिकडेच २ वर अपडेट झाली आहे!
- पण याही पेक्षा महत्वाचे मला खूप वाचक, त्यामुळे मित्र-मैत्रिणी भेटले या ब्लॉगमुळे ! :)
या सर्व नाही, पण बर्याच गोष्टींना मी आता मुकणार आहे..
SEO, Page-ranks,Alexa Ranks, Visitors.. बहुतेक!
मी शक्यतो काही मिस होऊ नये असा प्रयत्न करतेच आहे, परंतू You never know !
सगळे व्हीजिटर्स नवीन वेबसाईटवर येतीलच अशी खात्री आहे, ती खोटी ठरवू नका! :)
असो.. एव्हढं सगळं सांगूनही मी नवीन लिंक दिलीच नाही की! :)
कळेल, लवकरच!
तोपर्यंत तुम्ही आपल्या बुकमार्क्स मधे bhagyashree.co.cc च्या जागी,
bhagyashreee.blogspot.com टाका !
- भाग्यश्री!
Popularity: 29% [?]